रॉबीनहूड यांचे रंगीबेरंगी पान

कायदे बदलण्याची आवश्यकता.....

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

सहज सुचले म्हणून प्रतिक्रिया वादी पोस्ट टाकली. ती वाहून जाऊ नये म्हणून दुसरीकडे टाका अशी सूचना आली तर कुठे टाकावी कळेना मग माझ्याच रंगीबेरंगी पानावर टाकतोय......

थोडेसे अवान्तर...
गुन्हेगारी वाढते ती कायद्याचा धाक नसल्याने हे जगभर फिरत असलेल्या मायबोलीकराना मान्य व्हावे. कायद्याचा धाक नसल्याचे कारण रेट ऑफ कन्विकशन .. शिक्षेचे प्रमाण अतिशय कमी असल्याने. शिक्शेचे प्रमाण कमी असल्याचे कारण गुन्हा सिद्ध करणारी तपास पद्धती आणि ती ज्याच्यावर अवलम्बून आहेत ती क्रिमिनल प्रोसेजर कोड आणि एव्हिडन्स अ‍ॅक्ट ही बायबले अत्यन्त सदोष आहेत हे,

विषय: 
प्रकार: 

नववर्ष २०११

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या भयंकर शुभेच्छा....
जख्खी साहेबांनाही Proud
... .. .. .. .. ... .. ..

विषय: 
प्रकार: 

छत्रपती घराणे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

महाराजांचे पूर्वज आणि वंशज..

करवीर शाखेचे शेवटून दुसरे छ. शाहू महाराज म्हणजे प्रसिद्ध पुरोगामी विचारवन्त कोल्हापूरचे शाहू महाराज !
सातारा शाखेचे सध्याचे छ. उदयन महाराज आणि करवीर शाखेचे सध्याचे छ. राजाराम महाराज सर्वाना परिचित आहेतच...

व्यंकोजी राजे म्हणजे तंजावर शाखा.

shivaji.jpg

इथे फॅमिली ट्री टाकायला अडचण येते आहे. म्हणून रनिंग मजकूर लिहीत आहे.

बाबाजी भोसले (जन्म १५३३) (वेरुळचे पाटील भोसले.)

विषय: 
प्रकार: 

ग्रामव्यवस्था...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

(गम्भीर मोड ऑन , च्यायला हेबी वरडून सांगावा लागतय )वाहून जाईल जाऊद्या. खरे तर सगळे कुळकरणीच. पूर्वी ग्रामव्यवस्थेत जमीनेचे सर्व रेकॉर्ड शिक्षणाची परम्परा असल्याने ब्राम्हण कुळकरणी ठेवत . ज्या ब्राम्हणाला हे कुळ्करणीपद मिळालेले असे ते ट्रॅडिशनल असे.जमिनीवर लागलेल्या कुळाची नोन्द व तत्सम जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे हे त्यांचे काम. त्याबद्दल त्याना वेगळी जमीन उपजिवीकेसाठी मिळे त्याला कुळकरणी इनाम म्हणत. मुलकी पाटील हे दुसरे वतनदार. त्यांचे काम शेतसार्‍याची वसूली करून सरकारात भरणे. आणि तिसरे पोलीस पाटील गावातील तंटे मिटवणे. गुन्ह्यांची खबर पोलीस स्टेशनला देणे, प्रेतांचे पंचनामे इ.

विषय: 
प्रकार: 

गणपती पुळे.....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

याच महिन्यात गणपती पुळ्याला जाऊन आलो. मनात भक्तिभाव नव्हताच पण 'इस घरमे रहना है तो....' बर्‍याच गोष्टी कराव्या लागतात.

त्याची निवडक प्रकाश चित्रे...

हा मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी असणारा पितळेचा उन्दीर. त्याच्या कानात लोक आपल्या इच्छा सांगतात...

undir1.JPG
देवळाचे रंगकाम चालू आहे.
deul1.JPGdeul2.JPGdeul3.JPG

विषय: 

लगता नहीं है दिल मेरा , उजडे दयारमें ........

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दि. १२ डिसेम्बर २००९
रत्नागिरीत तिथल्या कलेक्टरांच्या मुलीच्या लग्नासाठी आलो होतो. गणपती पुळ्याहून सकाळी निघालो तर प्रवासातच विचार करता करता 'लाल किला' चित्रपटातल्या गझलने सकाळीच 'ताबा' घेतला. गझलकार(आणि चित्रपट विषयही) आहे शेवटचा मुगल सम्राट बहादूरशाह 'जफर'.

विषय: 

भारत एक खोज

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इन्डिया वर आधारित वैदिक काळापासून भारताचा प्रवाह दर्शविणारी 'भारत एक खोज ' नावाची एक विलक्षण मालिका १९८५ च्या दरम्यान दूरदर्शन वर येऊन गेली. ५३ भाग होते तिचे. दिग्दर्शक शाम बेनेगल. शिवकालावरही एक एपिसोड होता. दूरदर्शनच्या सर्वोत्कृष्ट मालिकापैकी ही एक. दर रविवारी सकाळी या ऋग्वेदातल्या ऋचा गम्भीरपणे सुरू होत आणि भाग सुरू होई. स्वतः नेहरू येऊन निवेदन करत. (रोशन सेठ म्हणजे अगदी नेहरूच.).
एपिसोडच्या सुरुवातीस व शेवटी या ऋचा असत. यातील शेवटचा काही भाग मालिका सम्पताना शेवटच्या म्हणजे ५३ भागातला आहे.

नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमापरो यत |

प्रकार: 

मी तुला नक्कीच भेटेन.....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मी तुला नक्कीच भेटेन,
कुठे ? कशी? माहीत नाही!

कदाचित,
तुझ्या मानसीचे चित्र होऊन कॅनवासवर उतरेन.....
आणि कदाचित,
तुझ्या कॅनव्हासवरच्या चित्रातली
एक अमूर्त रेषा बनून तुला नजरेत साठवीत राहीन!

कदाचित,
सूर्याची तिरीप होऊन तुझ्या रंगात मिसळून जाईन,
नाहीतर रंगांच्या बाहुपाशात तुझ्या कॅनवासवर विसावेल...

काय सांगू, कुठे, कधी
पण तुला नक्कीच भेटेन...

नाहीतर,
अवखळ झरा होऊन तुझ्या अंगावर तुषार उडवीन,
आणि त्या तुषारानी तुझं सर्वांग भिजवून टाकीन,
एक गार शिरशिरी होऊन तुझ्या छातीला कवटाळीन..

मला बाकी काही माहीत नाही
पण एवढं कळतय की,
काळाने काहीही केलं तरी

प्रकार: 

मै तेनुं फिर मिलांगी.....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मै तेनुं फिर मिलांगी....
कित्थे? किस तरह? पता नहीं..
शायद तेरे तखियुल की चिणग बनके.
तेरे कॆनव्हास ते उतरांगी.
जा खोरे तेरे केन्व्हास दे उत्त
एक रहसमयी लकीर बणके
खामोश तेनुं तकदी रवांगी...

जहां खोरे सूरजदी लू बणके
तेरे रंगाविच घुलांगी..
या रंगा दियां बाहवा विच बेठके
तेरी कॆनवासनु वलांगी...

पता नही किस तरह, कित्थे
पर तेनुं जरूर मिलांगी.....

जा खोरे एक चश्मा बनी होवांगी
ते जीवें झरनेया दा पानी उड्ड दा..
मै पानी दिया बून्दा ,तेरे पिन्डेते मलांगी...
ते ही एक ठण्डक जही बनके
तेरी छातीदे नाल लगांगी...
मै हौर कुछ नही जाणदी
पर एन्ना जाणदी हां
की वक्त जो भी करेगा

प्रकार: 

बाप मरतो तेव्हा...........

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझा बाप मरतो तेंव्हा ...
सारखं वाढणारं व्याज बघून, बाप बसला चेहरा पाडून

सावकाराचा पडण्या अगोदर घाला, फाशी घेतो बोलून गेला ॥

माझ्या काळजावर झाला आघात , आईचे अश्रू मावेना डोळ्यात

म्हटलं बघावं तरी जाउन, कोणी मदत करेल का हे ऐकून ॥

पहिले भेटले एक पुढारी, चालले होते सांभाळत ढेरी,

म्हटलं साहेब बाप मरतोय, 'कसं होणार'? म्हणून आत्महत्या करतोय ॥

साहेब म्हणाले जात सांग, किती मतदान घरात सांग,

विचारून घेइन एकदा मॅडमला, नाहितर येउच शेवटी सांत्वनाला ॥

मरू नकोस सांग त्याला, एक नोट देइन मी एका मताला,

त्याला म्हणाव भागव त्यात, स्वप्न सुद्धा पाहवित की रे आपल्या आवाक्यात.. ॥

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - रॉबीनहूड यांचे रंगीबेरंगी पान