माफिया

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

तीन-चार वर्षांपुर्वी एका न्यु ईयर पार्टीला कोणीतरी हा खेळ शिकवला .. सुरुवातीला काहीच कळलं नाही पण हळू हळू इतका आवडला की दर वेळी खेळायला आणखी मजा येते .. तर माफिया कसा खेळायचा त्याचं सध्याचं आमचं 'working' version द्यायचा प्रयत्न करतेय ..

या खेळात एकाला मॉडरेटर होणे आवश्यक असते .. त्याव्यतिरिक्त एक guardian angel असतो आणि बाकी उरलेल्या लोकांच्या संख्येच्या प्रमाणात mafia आणि villagers ठरवायचे (उदा. बाकी उरलेले ८ जण असतील तर मी दोन किंवा तीन माफिया आणि उरलेले villagers असं ठरवेन) .. पत्ते किंवा चिठ्ठ्या टाकून ठरवायचं खेळाच्या सुरुवातीला कोण guardian angel, mafia आणि villagers होणार ते .. आम्ही सहसा पत्ते वापरतो -- ace = mafia, queen = guardian angel आणि बाकी कुठलेही पत्ते म्हणजे villagers .. (दोन माफिया असतील तर दोन एक्के आणि एक राणी ठेवायची आणि बाकीचे ईतर पत्ते) .. खेळात अनेक राउंडस् होतात आणि शेवटी माफिया किंवा व्हिलेजर्स् जिंकतात .. खेळाच्या सुरुवातीला पत्ता सिलेक्ट करून आपल्याला जे पान येईल तो आपला रोल .. म्हणजे माफिया असेल तर व्हिलेजर्स् ना मारायचं (खेळापुरतं :p), गार्डियन एंजल असेल तर व्हिलेजर्स् ना माफिया ओळखायला मदत करायची आणि व्हिलेजर असेल तर गार्डियन एंजल आणि खेळात जी काही मारामारी होत असेल त्यावरून क्लू घेऊन माफिया ना ओळखून मारायचं (खेळातून बाद करायचं) ..

तर लोकांनां आपापले रोल्स् (पता/चिठ्ठी बघून) कळले (anonimity राखणे आवश्यक) की मॉडरेटर ने सगळ्यांना डोळे बंद करायला सांगायचे .. मग माफियांनां डोळे उघडायला सांगायचे .. यातून (पहिल्या राउंड ला त्यांना) फेलो माफिया कोण आहे ते कळतं आणि प्रत्येक राउंड ला कोणत्या व्हिलेजर ला मारायचं ते ठरवता येतं .. आणि ते खूणेने मॉडरेटर ला सांगतात त्यांनी कोणाला मारलंय ते .. मग मॉडरेटर त्यांनां डोळे बंद करायला सांगतो आणि नंतर गार्डियन एंजल ला डोळे उघडायला सांगतो .. आधीच्या राउंड च्या शेवटी सगळ्यांनी ठरवून ज्या व्यक्तीबद्दल चौकशी करायचं ठेरवलेलं असतं त्या व्यक्तीबद्दल गार्डियन एंजल मॉडरेटर ला विचारतो, अर्थातच खूण करून .. मग मॉडरेटर गार्डियन एंजल ला डोळे बंद करायला सांगतो आणि मग त्यानंतर सगळ्यांना डोळे उघडायला सांगतो .. हे एव्हढं झाल्यावर खर्‍या राउंडला सुरुवात होते .. सगळ्यांत आधी मॉडरेटर त्या राउंडला माफियांनीं कोणाला मारलं त्याचं नाव सांगतो .. ज्याला मारलेलं असेल तो त्यापुढच्या खेळातून बाद .. मग गार्डियन एंजल ने विचारलेल्या व्यक्तीबद्दलचं उत्तर मॉडरेटर देतो .. म्हणजे विचारलेली व्यक्ती माफिया आहे अथवा नाही (फक्त हो किंवा नाही हे उत्तर देतो, त्या व्यक्तीचं नाव न घेता) .. ह्यानंतर मग आधी राउंडस् झाल्या असतील तर त्यावरून आणि कोणाला मारलंय, उत्तर हो किंवा नाही या आधारावर सगळ्यांनी मिळून कोण माफिया आहे हे ओळखायचं आणि ज्या व्यक्तीवर सगळ्यांचं एकमत होईल त्या व्यक्तीला मारायचं .. तसंच पुढच्या राउंडला गार्डियन एंजल ने कोणाबद्दल मॉडरेटर ला विचारायचं हेही ठरवायचं .. कोणाला मारायचं, कोणाबद्दल विचारायचं ह्याविषयी चर्चा करत असताना, माफिया ने अशा प्रकारे युक्तीवाद करायचा की ज्याने त्यांच्याबद्दल कोणाला शंका येऊ नये आणि गार्डियन एंजल ने आपली identity disclose न करता व्हिलेजर्स् ना मदत करायची मॉडरेटर च्या हो किंवा नाही या उत्तरावरून आणि ईतर क्लूज वरून माफिया कोण आहे ते ओळखायला ..

मला खात्री आहे की हे description वाचून कोणीही गोंधळात पडेल .. जेव्हा आम्हाला हा गेम नव्याने सांगितला होता तेव्हा आम्हालाही पहिल्या तीन-चार वेळेला कळतच नव्हतं नक्की कोणाला मारायचं, माफिया कोण ते कसं ओळखायचं ते पण मग इतके वेळा खेळलो की त्याचे rules सुद्धा evolve होत गेले .. जसं की, माफिया ने पहिल्या राउंडला कोणालाही मारायचं नाही .. ह्याचं कारण हे की एका व्यक्तीला काहिही न करता खेळातून बाद व्हावं लागतं ..

खेळताना लक्षात ठेवायच्या काही महत्वाच्या गोष्टी ..
१. प्रामाणिकपणा महत्वाचा (:p)
२. हे डोळे बंद करा, उघडा प्रकरण उगीच childish, किचकट वाटेल पण ते नाही केलं तर anonymity रहाणार नाही .. फक्त मॉडरेटर लाच कळायला हवं कुठली व्यक्ती कोण ते (एकापेक्षा जास्त माफिया असतील तर त्यांनांही फेलो माफिया कोण ते माहित असेल) ..
३. खेळताना वाद-प्रतिवाद संपतच नाहीत कधी कधी .. किंवा टोकाला जाऊ शकतात ... मॉडरेटर चा रोल critical आहे ..
४. एकदा बाद झालेल्या व्यक्तींनीं खेळातल्या वादात सहभागी होऊ नये .. बाद म्हणजे बाद ..
५. पहिल्या राउंडला गार्डियन एंजल ने त्याच्या चॉईस ने कोणाबद्दलही विचारायचं पण त्यानंतरच्या राउंडस् मध्ये मात्र आधीच्या राउंडला सगळ्यांनी मिळून ज्या व्यक्तीबद्दल विचारयचं ठरवलंय त्याच व्यक्तीबद्दल विचारावं ..
६. पहिली राउंड सोडून दर राउंडला दोन व्यक्ती खेळातून बाद होतात - राउंडच्या सुरुवातीला माफिया ने मारलेली व्यक्ती आणि राउंडच्या शेवटी सगळ्यांनी 'माफिया' समजून खेळातून बाद केलेली व्यक्ती .. ह्याला अपवाद फक्त पहिल्या राउंडच्या सुरुवातीचा जेव्हा माफिया कोणालाही मारत नाहीत .. तसंच प्रत्येक राउंडच्या शेवटी एक अशी व्यक्ती सर्वानुमते ठरवायची ज्याच्याबद्दल सर्वांना तो माफिया असण्याची शंका आहे आणि गार्डियन एंजल ला मॉडरेटर ला त्या व्यक्तीबद्दल विचारता येईल ..
७. माफिया ने गार्डियन एंजल ला मारलं तरी खेळाचे सोपस्कार चालूच ठेवायचे पण मॉडरेटर चं उत्तर मात्र 'नाही' हे असेल .. म्हणजे ईतर व्हिलेजर्स् ना कळणार नाही गार्डियन एंजल खेळातून बाद झाला आहे हे ..

मी आठवून सगळे नियम, सूचना लिहायचा प्रयत्न केला आहे .. अजून काही आठवलं तर update करेन ..

प्रकार: 

सशल पोस्ट दिसतय. मी डोळे उघडे ठेवून वाचलय. Happy
सध्या हे वाचून फार गोंधळ झालाय. परत एकदा वाचेन. उदाहरणासह स्पष्टीकरण केलेस तर कळायला सोपे जाईल असे वाटतय.

सशल आत्ता दिसला माफिया.
मला वाटले १९९६ मधल्या माफियाबद्दल स्वाती तुला विचारत होती की काय Proud
असो परत एकदा वाचून बघतो.

सशल या वर्षी येणार्‍या मायबोली व.वि.ला खेळुन बघितला पाहिजे तुमचा हा खेळ. मला अर्धवटच समजला आहे.

गेल्या वर्षी खेळलो होतो पन्नाच्या इथल्या न्यू इयर पार्टीला.समजयला कठीण वाट्ला, निदान मला तरी.

धन्यवाद, सशल. Happy
(मला काहीच कळलं नाही हा भाग निराळा. पण पुन्हा प्रयत्न करते. नाहीतर सायो आहेच एवेएठिला.) Proud

हो, उदाहरण सांग.. म्हणजे वाद-विवाद म्हणजे नक्की कसले? हो/नाही/कोणती व्यक्ती चवकशीसाठी ठरवली गेलिये हे बाकी व्यक्तिना कधी समजते वगैरे.. पण छान वाटतय (थोडस समजले त्यावरुन). HH चा दुवा पाहिला नाही अजुन.

आम्ही नेहमी खेळतो पण आताशा कंटाळा यायला लागलाय, तेच ते तेच ते! दम शेरांज, रमी, नाहीतर माफिया ,,,,,,,
नेट वरुन नवे नवे गेम हुडकुन काढते मग मी दरखेपेस , एखाद्या जीटीजी मध्ये करु या ट्राय Happy

सशल, आम्ही पार्टीसाठी नवीन गेम शोधतो आहोत. माफिया खेळायची इच्छा तर आहे पण हे वाचून आणि हहने दिलेली लिंक वाचूनही काही समजत नाहीये नीट. म्हणजे बाकी सगळे समजले तरी एखाद्याला ( खेळातून ) मारण्यासाठी नक्की काय वाद झडतील हे नाही समजत.
कुठे व्हिडिओ लिंक नाही मिळणार का खेळाची ?

अगं त्या लिंकमध्येही लिहूनच समजावलं आहे. व्हिडिओ लिंक नाही. यू-ट्यूबवर थोडं शोधून पाहिलं. एक दोन व्हिडिओ सापडले पण त्यात आरडाओरडाच जास्त वाटला. नीट काही समजले नाही.