ग्रामव्यवस्था...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

(गम्भीर मोड ऑन , च्यायला हेबी वरडून सांगावा लागतय )वाहून जाईल जाऊद्या. खरे तर सगळे कुळकरणीच. पूर्वी ग्रामव्यवस्थेत जमीनेचे सर्व रेकॉर्ड शिक्षणाची परम्परा असल्याने ब्राम्हण कुळकरणी ठेवत . ज्या ब्राम्हणाला हे कुळ्करणीपद मिळालेले असे ते ट्रॅडिशनल असे.जमिनीवर लागलेल्या कुळाची नोन्द व तत्सम जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे हे त्यांचे काम. त्याबद्दल त्याना वेगळी जमीन उपजिवीकेसाठी मिळे त्याला कुळकरणी इनाम म्हणत. मुलकी पाटील हे दुसरे वतनदार. त्यांचे काम शेतसार्‍याची वसूली करून सरकारात भरणे. आणि तिसरे पोलीस पाटील गावातील तंटे मिटवणे. गुन्ह्यांची खबर पोलीस स्टेशनला देणे, प्रेतांचे पंचनामे इ. फौजदारी स्वरूपाची कामे . या तिघानाही पगार नसे. जमिनी इनामस्वरूपात मिळत आणि ही पदे त्या घराण्यात वंश परम्परेने चालत. पुढे नवीन प्रशासकीय बदलात ही पदे शासनाचे नोकर या स्वरूपात बदलण्यात आली ते पगारी नोकर झाले आहे . जमीनीचे रेकॉर्ड आता तलाठी ठेवतात आणि त्यांच्या बदल्याही होतात त्याना पगार मिळतो. मउलकी पाटील गेले आता वसूलीचे काम तलाठीच करतात. पोलीस पाटील आहेत पण त्यांची नेमणूक जाहिरात देऊन रिक्रुटमेन्ट रुल्प्रमाने होते त्यात आरक्षणे वगरे आहेत. महिला पोलीस पाटीलही आहेत. जुन्या कुलकरण्यांचे व पाटलांचे इनाम अल्प पैसे भरून घेऊन म्हनजे २००-३०० रुपये भरून घेऊन त्यांच्या घराण्याना कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यात आल्या आहेत.

तात्पर्य जमीनींच्या कुळाचे रेकॉर्ड ठेवणारा तो कुळकरणी . पुढे इन्ग्रजीच्या व प्रादेशिक प्रभावाने त्याचे कुलकर्णी झाले एवढेच....

सीकेपी कुळकएणी पदावर असू शकतील त्या भागात...

पाटील, देशमुख, कुलकर्णी ही सगली ऑफिसेस आहेत. आडनावे नव्हेत . पण इतर सामान्य मराठे(खरे तर कुणबीच), ब्राम्हण यापासून वेगळेपणा ठसविण्यासाठी किंवा मिरविण्यासाठी म्हणा ते मुदाम नावापुढे लावण्याची पद्धत सुरू होऊन शेवटी आडनावातच रूपान्तर झाले. यांची मूळ आडनावे आणखी वेगळीच असतात. शिवाय पुढे तर ज्यांच्या घरात पाटीलकी अथवा कुळकर्ण असेल त्यांचे भाऊ विभक्त झाल्यावर सन्मानदर्शक आडनावही 'वाटपा'त घेऊन ही आडनावे लावू लागले
माझ्या कामाचा भाग म्हणून मला जातीव्यवस्थेचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्यात जुन्या रेकॉर्डाचा अभ्यास करावा लागतो. मोडी शिकणे भाग आहे. दुसर्‍या कुठल्या तरी बीबी वर कुणीतरी मुस्लीमात जातीव्यवस्था नसते असे अज्ञान मूलक विधान केले आहे. त्यात ह्या आडनावांचा बर्‍याच्दा उपयोग होतो. पाटील, देशमुख्,देशपान्डे ही नावे मुसलमानांच्यात देखील आहेत. कारण एकच. ही नावे नसून ऑफिसची नावे आहेत. खानदेशात ह्या पिढीत देखील जातीवाचक आडनाव लावण्याची पद्धत आहे. ऊदा. माळी, सोनार, न्हावी,भावसार्,तेली इत्यादी.

विषय: 
प्रकार: 

>>>>> यापासून वेगळेपणा ठसविण्यासाठी किंवा मिरविण्यासाठी म्हणा ते मुदाम नावापुढे लावण्याची पद्धत सुरू होऊन शेवटी आडनावातच रूपान्तर झाले.
आयला, अस हे होय, तरीच
तरीच हल्लीच्या पद्मश्र्या वगैरे पदव्या नावाच्या "अलिकडेच" लावायला लावतात! Wink

हूडा, याव्यतिरिक्त जी आडनावे आहेत (गावाची गावे नसलेले) ती कशी पडली असावीत?? शासकीय धोरणात फर्स्ट नेंम्/मिडल नेम्/ सरनेम असा फॉरमॅट ब्रिटिशांनी आणला का??

माझ्या माहीतीप्रमाणे सर्वसाधारण १९३० पर्यंत सरकारी दस्ताऐवजात आडनावाऐवजी जातीचाच वापर केला जात असे.
स्वतःचे नाव , बापाचे नाव आणि शेवटी आडनावाऐवजी जात असेच लिहीले जायचे.
आडनावे कशी पडली असावी याबाबत माझेजवळ भरपुर माहीती आहे. लिहिल कधितरी.

माझ्या आजोबांचा जन्म १९०१ चा आहे. त्यांचे वडील सुद्धा रत्नपारखी हे आडनाव लावीत. १९३० हे साल बरोबर आहे का ? तुमची माहिती नक्की लिहा.

<<माझ्या आजोबांचा जन्म १९०१ चा आहे. त्यांचे वडील सुद्धा रत्नपारखी हे आडनाव लावीत.>>
१९३० हे साल नक्की नाही मागे पुढे होऊ शकते.
मात्र महसुलखात्याच्या नोंदी तशा आहेत.

आधी बहुतांश नाव अशी असत

दत्तो भिकाजी
खंडोजी खोपडा
अण्णाजी दत्तो,
श्यामराव निळकंठ,
दादोजी कोंडदेव

पण तसेच मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर, शिवाजी भोसला, रघुनाथपंत हणमंते अशीही असत, त्यामुळे हिच पद्धत होती, हि नव्हती असे ठामपणे सांगता येईल असे वाटत नाही.
(तसेच ब्राह्मण ज्ञातीत सर्वचं लोक आडनाव लावित नसत. बहुतांश आपले अन बापाचे नाव, अन सोबत गोत्र, कुळ असे सांगीतले की झाले. हिच पद्धत कदाचित तत्कालिन क्षुद्रात असावी*) पण नंतर कदाचित त्यांनी गावाचे नाव लावायला सुरु केले असावे. मुटे साहेब वेळ काढून नक्की लिहा. वाचायला आवडेल.

*अदांज आहे ठोकने नाही. Happy

१९६० पर्यंत पाच गावचे दप्तर (महसुल ची कागदपत्रे) आमच्या वाड्यावरच असे, असे वडिल सांगतात. माझे आजोबा पाटील होते. आम्ही आडनावापुढे पाटील लावतो. उदा. विखे-पाटील! Happy

१९६० ला राज्यात ग्रामपंचायती स्थापन झाल्या अन दप्तर पंचायतीत गेले. पंचायत वाड्याच्या समोरच होती Happy माझे चुलते पुढे २५ वर्षे सरपंच होते. मग पाच गावची गृप ग्रामपंचायत फुटली अन प्रत्येक गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. आता पंचायत चे ऑफीस वाड्यासमोर नाही!

जुनी कागदपत्रे वाचणे खुप मजेशीर असते!

रॉबिनहूड, चांगली माहिती दिलीत.

आता 'सखाराम संगणक प्रणालीकार',' विनायक विपणक', 'गुणाजी गुरुजी', 'प्रकाश प्राध्यापक' अशी नावे यायला हरकत नाही.

बोवाजी तशी नावे आजही आहेत विशेषतः पारश्यांत .इन्जीनीअर, मर्चन्ट, कॉन्ट्रॅक्टर्,डॉक्टर,ब्रोकर इ.गुजरात्यांतही अशी आडनावे आहेत. दलाल, तलाठी,

चम्पूलाल. १९६० नन्तर फक्त जन्ममृत्युचे रेकॉर्ड ग्रामपंचायतीकडे गेले. जमिनीचे रेकॉर्ड तलाठ्याकडे आहे. अगदी मुम्बैतही आजही आहे. मुम्बईतले जीन्स पेहेरणारे तलाठी पाहिल्यावर माझ्या तलाठ्याच्या पारम्परिक प्रतिमेचा एकदम चक्काचूर झाला Proud

इरावती कर्वे बाईंनी आपली जातीव्यवस्था यावर खूप संशोधन करुन लिहिलेले आहे त्याची आठवण झाली. बहुतेक गंगाजल मधे आणि एक ईंग्रजी पुस्तक देखील आहे.

रॉबीन, शेवटचे दोन उतारे छान वाटलेत.

मस्त माहिती रॉबिनहुड Happy

आता कोल्हापुर साईड्ला.. जवळ जवळ प्रत्येक गावात जोशी, कुलकर्णी ,पाटील ही कुटुंब असायचीच.. देशपांडे, इनामदार वैगेरे त्या मानाने कमीच.. पण या गावचा पाटील, त्या गावचा जोशी करत बर्‍याच लोकानी गावाचीच नावे आडनावे म्हणुन लावली.. काहीनी वतनच कायम ठेवली..

आता कोल्हापुर्-बेळगाव साईड ला जैन धर्मीय लोक पण खुप आहेत.. त्यांची बहुतेकांची आडनावे पाटीलच असतात.. किंवा गौडा (कन्नड मधे पाटील).. मग त्यानी सुद्धा गावाचे नाव आडनाव म्हणुन घेतले.. पण ते बहूतेक करुन गावानंतर कर लावत नाहीत.. त्यांच्यात मालगावे, शिरोळे, कागले अशी आडनावे जास्त आढळतील..

बी, इरावतीबाईंचे काम मुख्यतः मानववंशशास्त्रावर आहे. म्हणजे अतिप्राचीन . ती कवट्यांची मापे वगैरे.
त्यानी जातीव्यवस्थेवर लिहिलेले माझ्या पाहण्यात नाही आले.

तो विषय तर आहेच त्यांचा रॉबीन पण अधूनमधून त्यांनी भारतीय जातीव्यवस्थावर पण लिहिलेले आहे. उदा:
१) Kinship Organization in India (1953)
२) Maharashtra -Land and People (1968)

मी मराठेवाड्यातील भूकम्पामध्ये पुनर्वसनाच्या कामासाठी गेलो असता तिथे एका गावात बाजीराव कुलकर्णी नावाचे पोलीस पाटील भेटले. ते चक्क मराठा असल्याचे आढळून आले. (आता या कुलकर्ण्यांचे काय करावे हा प्रश्न मंत्र्याला विचारला पाहिजे.) काम्बळे नावाचे ब्राम्हण आहेत. साठे हे नाव सगळ्या जातीत आहे. विशेष्तः मातंग आणि ब्राम्हणांत जास्त आहे. सोनारांच्या बहुतेक रेकॉर्ड्स मध्ये ब्राम्हण अशा नोन्दी आढळतात. पण त्याना 'देव ब्राम्हण' म्हणतात.

आडनावांचाच विषय निघाला आहे तर...

बरीच इंग्रजी आडनावं आपल्या मराठीशी मिळतीजुळती असतात. उदा: व्हाइट्-गोरे, ब्लॅक्-काळे, ग्रेव्हज्-मसणे, फ्लॉवर्-फुले, फॉक्स्-कोल्हे इ. काहिंची तर स्पेलिंग्ज सुद्धा जुळतात; उदा: Gore, Rane, Date
तर हा इंग्रजांच्या १५० वर्षांच्या राजवटीचा परिणाम कि निव्वळ योगायोग. Happy

बरीचशी आडनावे विशेषणावर आधारीत आहेत.
रंगावर आधारित- काळे,गोरे,लाखे,ढवळे,पिंगळे,हिवरे(हिरवे),जांभळे,धामणे,भोंडे,भोंडवे वगैरे.

पशू व पक्षी संबधित आडनावे.
कोल्हे,लांडगे,खेकडे,मुजबैले,गायधनी,वासरे,कलवडे,गोर्‍हे,
वाघे,डूकरे,गव्हानकर,शेळकर,मेंढे,माणुसमारे,कुत्तरमारे,मांजरेकर,
उंदिरवाडे,कावळे,पोपट,घारे वगैरे.

आमचं कोठावळे आडनाव आमचे पूर्वज कोठी सांभाळायचे त्यावरून आलं, असं ऐकिवात आहे
(ती म्हण आहे ना "जाणार्‍याचं जातं आणि कोठावळ्याच्या पोटात दुखत")

आईच्या माहेरचं "कापरे" आडनाव - कर्पूरेश्वराचे भक्त म्हणून कापरे (आधी जोशी होतं!)

नवर्‍याचं "हसबनीस" (हिशोबनीसचा अपभ्रंश??)
बहिणीचं "मठाधिकारी": पूर्वज राघवेंद्र स्वामींचा मठ सांभाळायचे त्यावरून.

(वंशावळच सांगितली ना मी माझी? Wink )

फळे व फुले यावर आधारीत आडनावे.
फुलकर,वांगे,भेंडे,बोरकर,बोरावके,जांभुळकर,केळकर,आंबेकर,
आंबावडेकर,मोगरे,कचरे,कन्नेरकर,धोत्रे,चिंचकर,बाभळे,सागरे,बाभुळकर,पळसकर.
काही आडनावे.
लांबे,लांबट,बुटके,ठेंगणे,ठेंगडी,बारके,

हूड,
ही सगळी माहीती ऐकीव किंवा एकदोन गावात बघितलेली सांगताय की काही अभ्यासाच्या आधारावर?
पदांच्या संदर्भात पदवी किंवा पद आडनाव म्हणून केवळ कुलकर्णींनीच नाही लावले.

पाटील(मराठा व देशस्थ), देसाई(मराठा,देशस्थ,सारस्वत), सावंत(मराठा), वर्तक(कोब्रा, पाचकळशी), राउत (पाचकळशी), फडणवीस(कोब्रा), पेशवे(कोब्रा), पेशवा(देशस्थ)
अशी बरीच उदाहरणे देता येतील. मिळालेला मान मिरवण्याची हौस ही मानवाच्या कुठल्याही गटात सारखीच असते. त्यात नवल काही नाही आणि चूक तर त्याहून काही नाही.
तसेच बरीच सारस्वत आडनावे गावांवरून असतात. बरीच देशस्थ आडनावे पदांवरून असतात. बरीच कोब्रा आडनावे ही भिक्षुकी आणि पुजाअर्चांसंदर्भातल्या तपशीलाप्रमाणे असतात. बर्‍याचश्या मराठा आडनावांना ऐतिहासिक संदर्भ आहेत. अनेक मराठा आडनावे ही राजपूत किंवा उत्तरेतल्या क्षत्रिय आडनावांशी मिळतीजुळती किंवा थोडीशीच वेगळी आहेत. उदाहरणार्थ पवार, चौहान-चव्हाण, यादव-जाधव.
हे नियम नाहीत, असंच असतं असं नाही पण बर्‍याच प्रमाणात हे दिसून येतं.

इरावतीबाईंनी कोकणस्थ ब्राह्मणांच्या जनुकीय वेगळेपणाबद्दल मानववंशशास्त्राच्या दृष्टीकोनातून काही महत्वाचे लिखाण केले आहे.

राज यांनी काढलेला मुद्दा ग्रामव्यवस्थेशी संबंधित नसून ज्याला इंडो-युरोपियन भाषाभ्यास म्हणतात त्यातला आहे.

बाकी ग्रामव्यवस्था या संदर्भात ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी
गावगाडा - लेखक आत्रे
शिवकालीन व पेशवेकालीन महाराष्ट्र - डॉ. शारदा देशमुख

अशी काही महत्वाची पुस्तकेही चाळावीत.

नावावरुन ग्रामव्यवस्था म्हणजे मला वाटल जुन्या काळातील ग्रामव्यवस्थी कशी होती आणि काळानुरुप तीत कसे बदल होत गेले याबद्दल चर्चा असेल. इथे तर आडनावांची चर्चा दिसते.

Pages