माहिती

द ग्रेट बॅरियर रीफ अ‍ॅट रिस्क!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

द ग्रेट बॅरियर रीफ अ‍ॅट रिस्क!

विषय: 
प्रकार: 

पुस्तक परिचय : उदगीरचा इतिहास

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

माझ्या वडिल व्यवसायाने सर्जन. व्यवसायाव्यतिरीक्त प्रचंड वाचन आणि अधुन मधुन लिखाण.
महाराष्ट्र टाईम्स, सुधारक इ. मधुन त्यांचे लेख येत असतात. त्यांची काही पुस्तके पण प्रकशित झाली आहेत.

पहिले पुस्तक हे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी होते. (Surgery for Undergraduate Students)
दुसरे पुस्तक हे हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या आठवणी वर आधारीत होते, त्यांनी फक्त संपादित केले.
मागच्या वर्षी 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याला राज्यशासनाच्या २००९ च्या उत्कृष्ठ वाडग्मय निर्मितीचा पुरस्कार पण मिळाला. ह्या पुस्तका बद्दल नंतर कधीतरी लिहीन.

प्रकार: 

लाहोरवर कब्जा (ले० निनाद बेडेकर, दै० पुढारी, २८ फेब्रु० २०१०)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

“अब्दालीने अफगाणिस्तानमध्ये परत जाताना शिखांचे सुवर्ण मंदिर उद्ध्वस्त केले होते. सरोवर मातीने भरून टाकले होते. ८ मार्च १७५८ला मराठी फौजा सरहिंदला आल्या. मराठे येताहेत हे पाहिल्यावर अब्दालीचा मुलगा लाहोरहून पळाला. जाताना त्याने अनेक गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले. मराठी फौज मोठ्या दिमाखाने लाहोरात आली. मानाजी पायगुड्यांच्या अधिपत्याखाली मराठी फौजांनी लाहोरचा ताबा घेतला. मराठी विजयाचे डंके लाहोरात झडू लागले. “

विषय: 
प्रकार: 

हेमलकशाचे श्रमसंस्कार शिबिर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

बाबा आमट्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली आणि त्यातूनच आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ यां ठिकाणी प्रकल्प उभे राहिले. 'श्रम हि है श्रीराम हमारा' हा त्यांचा नारा होता. 'अपंग, कुष्ठरोगी जर असे आदर्श प्रकल्प उभारू शकतात, तर तुम्ही मागे का?', असा सवाल ते नेहमी तरुणांना करत. तरुणांनी श्रमाला महत्त्व द्यावं, घाम गाळावा, हा त्यांचा आग्रह असे. त्यातूनच बाबांनी सोमनाथला श्रमसंस्कार शिबिर सुरू केलं. स्वतः श्रम केल्याशिवाय कष्टकर्‍यांची दु:खं कळत नाहीत, श्रमाचं महत्त्वही पटत नाही, हे जाणून बाबांनी ही शिबिरं दरवर्षी घेतली जाऊ लागली. या शिबिराला दरवर्षी भारतभरातून लहानमोठी मंडळी हजेरी लावतात. श्रमदान करतात.

प्रकार: 

इको यणचि, रावणवध, गूगल बुक्स वगैरे

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आमच्या गुरुवारच्या संस्कृत वर्गामध्ये अष्टाध्यायीची काही सूत्रे एकत्र शिकण्याचा विचार सुरु होता. त्यादृष्टिने योग्य सामग्रीचा शोध आंतरजालावर करत होतो. पाणिनीकृत अष्टाध्यायी हा कोणत्याही व्याकरणावरचा सर्वोत्कृष्ट खजीना आहे याबद्दल दुमत असु नये. इको यणचि (6.1.77) हा त्याचाच एक सुंदर नमुना आहे. इको म्हणजे इक् म्हणजे इ, उ, ऋ, ऌ (माहेश्वर सूत्र 1 व 2) या नंतर जर अच् (म्हणजे स्वर - माहेश्वर सूत्र 1-4) आल्यास त्यांचा यण् (म्हणजे य, व, र, ट - सूत्र 5-6) होतो. उदा. दधि + अत्र = दध्यत्र, मधु + अत्र = मध्वत्र ई.

विषय: 
प्रकार: 

मराठी कविता संग्रह पाठवा

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

माझ्या एका परिचिताने अंबेजोगाईत हा उपक्रम सुरु केला आहे. मायबोलीकरांना याबाबत माहिती द्यावी म्हणून इथे लिहित आहे.
याबद्दल लोकसत्तेमध्ये आलेली बातमी http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=536...

मराठी कविता संग्रह पाठवा-

अंबेजोगाई ही आद्यकवी मुकुंदराजांची भूमी.
येथेच त्यांनी रचला मराठी कवितेचा पहिला ग्रंथ विवेक सिंधु .
त्यानंतर मराठी कवितेचा अखंड प्रवाह सुरु आहे .
या साडे आठशे वर्षात मराठी कवितेचे रूपांतर एका महानदीत झाले आहे.

प्रकार: 

मायबोली का बंद होती?

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोली तांत्रीक कारणामुळे बंद होती हा संदेश/मजकूर तुम्ही गेले २ दिवस पाहिला असाल. नेमकं काय झालं होतं? आणि एवढा वेळ का लागला?

मायबोलीचे सर्व्हर ज्या डेटा सेंटरमध्ये आहेत तिथे भारतीय वेळेप्रमाणे सोमवारी संध्याकाळी ६:३० वाजता वीजपुरवठा खंडीत झाला. तिथे जनरेटर आणि UPS असूनही वेळेत वीजपुरवठा पुन्हा सुरू न झाल्याने बरेच सर्व्हर बंद पडले.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीवरील विविध विभाग आणि सुविधा

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

मायबोलीवर खालील विभाग आहेत.

१. गुलमोहर - मायबोलीकरांनी लिहिलेले साहित्य [कथा, कविता, ललित लेख, विनोदी लेख, विविध कला (प्रकाशचित्रे, चित्रकला, हस्तकला)] इथे पहायला मिळेल.

२. रंगीबेरंगी - मायबोलीकरांचे स्वतंत्र ब्लॉग.

३. हितगुज - विषयवार - या विभागात विविध विषयांवर ग्रूप्स आहेत. मायबोलीकर यातल्या आवडीच्या ग्रूपचे सभासद होऊ शकतात. या ग्रूपमधले लेखनाचे धागे सार्वजनिक किंवा ग्रूप सदस्यांपुरते मर्यादीत ठेवण्याची सोय आहे.

विषय: 
प्रकार: 

खरेदी.मायबोली.कॉम सुविधा

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मराठी रसिकांना ऑनलाईन पुस्तकं, सीडी/डीव्हीडी विकत घेण्याची सुविधा.

ग्राहकांसाठी सुविधा

ऑनलाईन शॉपींग कार्ट आणि पेमेंट
विक्रीला ठेवलेल्या वस्तूंचा शोध
वीश लिस्ट
जुन्या ऑर्डर्स पाहण्याची सोय
पुस्तक विकत घेणार्‍या इतर चोखंदळ ग्राहकांनी विकत घेतलेली पुस्तके
(People who bought this also bought)

विषय: 
प्रकार: 

ब्रेल लिपीतली पुस्तकं

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर ताईआत्या राहायच्या. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांतच नवर्‍यानं त्यांना माहेरी आणून सोडलं. त्यांचं माहेर तसं श्रीमंत. मोठा भाऊ डॉक्टर. पण ताईआत्या मात्र बंगल्याच्या आऊटहाउसात राहायच्या. ताईआत्या उत्तम कविता करत. संध्याकाळी आई ऑफिसातून घरी आली की ताईआत्या घरी येत. त्यांना सुचलेली कविता आई त्यांच्या वहीत त्यांना उतरवून देई. ताईआत्यांना लिहिता वाचता येत नसे. त्या अंध होत्या.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - माहिती