गुर्‍हाळ!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

श्री सुनिल परचुरे ह्यांनी लिहिलेल्या कोल्हापुर कि गुळपुर च्या अनुशंगाने दोन व्हिडेओ:

सदर व्हिडीओ हे यु.पी. टाईप गुर्‍हाळाचे आहेत. कोल्हापुर टाईप मध्ये एकच कढाई/काहिली असते. ह्यात तीन ते चार असतात.

१) ह्यात उसाचा रस बनवण्याचे क्रशर आहे. अगदी कमी खर्चात @ १५ लाखात हे उपयुक्त काम केले गेले आहे. क्षमता: ५०-६० टन प्रति दिन उस गाळप. मेकॅनिकल इंजिनीअर नी यावर कॉमेंट करावी अशी अपेक्षा आहे.

http://www.youtube.com/watch?v=lwnNpceVpmA

२) हा व्हिडेओ पाहण्या अगोदरः इथे बनलेला गुळ हा खाण्यासाठी नसुन, गुजरात, दीव, दमन ला डिस्टीलरी मध्ये लागणारा गुळ आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अस्वच्छता खुप आहे.
http://www.youtube.com/watch?v=fFxM9zgSsNk

३) कोल्हापुर टाईप चे गुर्‍हाळ मधील काहील. (श्री सुनील परचुरे ह्यांचे कडुन साभार!)
http://www.youtube.com/watch?v=XOCxKzuJKGc

प्रकार: 

चंपक, तू कामाला लागलेला दिसतोयस :०) क्रशर भारीये. (मी मेकॅ. इंजि. नै पण कमेंट केल्याशिवाय रहावले नाही)
चंपक गुळवाल्याला शुभेच्छा!

आरती यांनी दिलेल्या पत्तावरुन जय किसान ऑरगॅनिक जॅगरी (सेंद्रिय गुळ) उत्पादन केंद्र, केरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापुर येथील श्री मारुती पाटील यांना संपर्क केला. अस्सल कोल्हापुरी टोन मध्ये अध्यात्मिक पिंड असलेला शेतकरी माणुस मिळाला! आरतीला धन्यवाद!

जय किसान ऑरगॅनिक जॅगरी (सेंद्रिय गुळ) उत्पादन केंद्र मध्ये, निवाळ सेंद्रिय खतावर पिकवलेल्या उसावर प्रक्रिया करुन गुळ निर्मीती केली जाते. देशभरात त्याची विक्री होते. परदेशात पाठवायला गुळ च शिल्लक राहत नाही! कुणाला हवा असेल तर त्यांचेशी संपर्क करा! (आधी माझेकडुन नंबर घ्या!)

त्यांचे एक सहकारी श्री बागल सर (जे डी. फार्म. कॉलेजवर प्राध्यापक आहेत) ते देखील सेंद्रीय गुळ, तांदुळ, गहु चे उत्पादन घेतात. त्यांची उत्पादने भारतातील पंचतारांकित हॉटेल अन लंडन येथे विकली जातात. कुणाला हवा असेल तर त्यांचेशी संपर्क करा! (आधी माझेकडुन नंबर घ्या!)

श्री बागल व श्री पाटील अन त्यांचे ६८ शेतकरी मित्र मिळुन वसुंधरा सेंद्रीय शेतकरी संघटना चालवतात. शेतकर्‍याच्या मालाला योग्य मोबदला मिळावा म्हणुन प्रयत्न करीत असतात. त्यांना अनेक शुभेच्छा Happy

पूर्वी कधीतरी मी गुर्‍हाळावर सहज म्हणून एक लेख लिहीला होता! कुठे आहे कुणास ठाऊक!
असो.
चम्प्या, गुर्‍हाळ लावायच, तर तुला इकडे यायला हवय हे रोज सकाळी उठल्यावर अन रात्री झोपायच्या आगोदर न चूकता घोकत जा! Happy देव तुझ भल करो!
गुर्‍हाळ लावलस की सान्ग, मी येतोच!