''केल्याने होत आहे रे...'' ह्या उक्तीनुसार गेल्या वर्षी आपल्या काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन पुण्याच्या बुधवार पेठ येथील रेड लाईट एरियामधील नूतन समर्थ प्राथमिक विद्यालयात 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश'चे वर्ग घ्यायला सुरुवात केली. हे विद्यालय परिस्थितीने निम्नवर्गीय व रेड लाइट एरियातील मुलामुलींना शिक्षण देण्याचे कार्य करते. ऑगस्ट २०१३ पासून सुरु केलेल्या 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश' ह्या उपक्रमाला मायबोलीकरांच्या माध्यमातून मिळालेले स्वयंसेवक शिक्षक व शाळेतील विद्यार्थ्यांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
काय करतो आपण ह्या उपक्रमात?
माझा मुलगा आता बारावीला आहे. सायन्स ला आहे. मी अभ्यासात कधी लक्ष घातले नाही असे नाही. पण दहावीनंतर जसे स्ट्रीम्स बदलले तसे मलाच टेन्शन आले. मी सायन्स साईड ची नाही की त्याचा बाबा पण नाही. पण मुलाला एका विशिष्ट प्रकारे अभ्यास करून चांगले मार्क्स कसे मिळतिल याचे मार्गदर्शन करू इच्छिते. कॉलेज, ट्युशन्स आहेत, मेरिटनेशन चे सबस्क्रिप्शन देखिल आहे पण तरीही प्रश्न भेडसावतात ते असे की
१. अभ्यास कसा करायचा?
२. डेफिनेशन पुस्तकात दिले नसतील तर ते कसे बनवायचे? उदा. फिजिक्स मधे wavefront, wavespace and wavenormal यात वेव्हस्पेसचे डेफिनेशन कुठेच नाही पण प्रश्न मात्र आहे.
गेल्या वर्षी ध्यासपंथी पाऊले ग्रुपच्या अंतर्गत मी 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!' असा धागा काढला आणि अन्य उपक्रमांपेक्षा जराशा वेगळ्या अशा ह्या उपक्रमात सामील होऊ इच्छिणार्यांना आपली नावे द्यायला सांगितली. अट होती ती दर शनिवारी किमान एक तासाभराचा वेळ देऊन पुण्याच्या बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात राहाणार्या व तेथील नूतन समर्थ विद्यालयात शिकणार्या मुलांना इंग्रजी भाषा शिकवायची, तिचा सराव करून द्यायचा! अशा प्रकारे मुलांना शिकवण्याची एका संपूर्ण शालेय वर्षाची कमिटमेन्ट घेणे ही खरोखर सोपी गोष्ट नाही.
मीरा बडवे यांचे "टीम निवांत" वाचायला घेतले फक्त प्रस्तावनाच वाचली आणि मी भाराऊन गेले.निवांत अंध मुक्त विकासालय या शाळेच्या पलीकडच्या विद्यापीठीय विद्यार्थ्यासाठी रचल्या गेलेल्या विलक्षण प्रयोगाची सकारात्मक गाथा.बडवे कुटुंबाच्या घराचा निवांत टीमपर्यंत झालेला जीवन प्रवास.पुस्तक पूर्ण वाचल्यावर परिचय लिहायलाच हवा.अपंग दिनी बडवे कुटुंबियांच्या कार्याला डोळस माणसानाही शिकवणा-या त्यांच्या चमूला सलाम.मला राहून राहून आज विजय कुदळेची आठवण येते.त्याच्यापर्यंत हे पोचवायला हव.
अपंग दिनानिमित्त त्याची ही कहाणी. १० वर्षापूर्वी केसरी या वृत्तपत्रात लिहिलेली.
शाळा! बहुतेकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. काहींना आवडली म्हणून, काहींना नावडली म्हणून. काहींनी नेमाने हजेरी लावली म्हणून, काहींनी नेटाने बुडवली म्हणून. काही हुशार होते म्हणून, काही शिक्षकांचे लाडके म्हणून, काही खोडकर होते म्हणून. काहींना आपण शाळेत घडलो असं वाटतं म्हणून, आणि काहींना बिघडलो असं वाटत असेल म्हणून. कुठल्याही कारणासाठी असेल, पण विषय मात्र जिव्हाळ्याचा!
मैत्री संस्था, गेली १३-१४ वर्षे मेळघाटात चालू असलेल्या कुपोषण मृत्यू रोखण्यासाठी काढलेल्या धडक मोहिमांबरोबरच गेली दोन वर्षे डिसेंबर ते मार्च या काळात स्वयंसेवकांच्या मदतीने शैक्षणिक उपक्रमही घेत आहे. पहिल्या वर्षी मैत्रीने मेळघाटातील चिलाटी या ठिकाणी शाळाबाह्य ४० मुलांसाठी १०० दिवसांची निवासी शाळा चालवली. त्या नंतरच्या म्हणजेच मागच्या वर्षी ३ गावांमध्ये असलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळांबरोबर १०० दिवस काम केले व त्यायोगे सुमारे ७० मुलांपर्यंत आपण पोहोचलो.
''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्यात साठवून घेऊ लागलो.