सेवाभावी उपक्रम

लायन्स क्लब पुणे सेंट्रल तर्फे स्पोकन इंग्लिश स्वयंसेवक शिक्षकांचा सत्कार!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 31 August, 2015 - 06:54

सांगावयास आनंद वाटतो की दिनांक २८ ऑगस्ट २०१५ रोजी मायबोलीच्या माध्यमातून एकत्र येऊन स्वयंसेवा तत्त्वावर बुधवार पेठ, पुणे येथे गरजू मुलामुलींना हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवणार्‍या आपल्या स्वयंसेवक शिक्षकांचा लायन्स क्लब पुणे सेंट्रलकडून सत्कार करण्यात आला. प्रसंगी सर्व स्वयंसेवक शिक्षकांना लायन्स क्लबने खास प्रशस्तीपत्रक प्रदान केले व गेली तीन वर्षे सातत्याने आणि निष्ठेने या उपक्रमात सहभागी होणार्‍या व आपले योगदान देणार्‍या मंडळींचे विशेष कौतुक केले.

नूतन समर्थ प्राथमिक विद्यालयात पार पडला कौतुक सोहळा!

स्पोकन इंग्लिश वर्ग : एका अभिनव उपक्रमाचा प्रवास व हृद्य समारोप

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 31 March, 2014 - 05:53

गेल्या वर्षी ध्यासपंथी पाऊले ग्रुपच्या अंतर्गत मी 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!' असा धागा काढला आणि अन्य उपक्रमांपेक्षा जराशा वेगळ्या अशा ह्या उपक्रमात सामील होऊ इच्छिणार्‍यांना आपली नावे द्यायला सांगितली. अट होती ती दर शनिवारी किमान एक तासाभराचा वेळ देऊन पुण्याच्या बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात राहाणार्‍या व तेथील नूतन समर्थ विद्यालयात शिकणार्‍या मुलांना इंग्रजी भाषा शिकवायची, तिचा सराव करून द्यायचा! अशा प्रकारे मुलांना शिकवण्याची एका संपूर्ण शालेय वर्षाची कमिटमेन्ट घेणे ही खरोखर सोपी गोष्ट नाही.

जुन्या कपड्यांचे काय करावे?

Submitted by मी अमि on 16 July, 2013 - 01:45

हा जुना धागा संपादित करुन वर आणतेय.

घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.

जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.

१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.

Subscribe to RSS - सेवाभावी उपक्रम