सायन्स

पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स

Submitted by सुमुक्ता on 11 March, 2015 - 09:13

मी भारत सोडला आणि सर्वप्रथम एक वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये राहिले. त्यानंतर स्कॉटलंडला आले आणि येथलीच झाले. ह्या दोन्ही देशांत विद्यापीठांमध्ये संशोधन सहाय्यक म्हणून काम केले आणि मोठा अलिबाबाचा खजिना असल्यासारखे संशोधनाचे विश्व माझ्यापुढे खुले झाले. आयुष्यात करण्यासारखे आणि शिकण्यासारखे कितीतरी आहे हे कळले. आपले ज्ञान किती खुजे आहे आणि नवीन ज्ञान मिळविण्यात आणि संशोधन करण्यामध्ये कितीतरी आत्मिक आनंद आहे हे जाणवले . हा आत्मिक आनंद अधिकाधिक मिळविता यावा म्हणून संशोधनात पदवी (डॉक्टरेट) घेण्याचे ठरविले. शिष्यवृत्तीसकट मला पीएच. डी. ला प्रवेश मिळाला आणि माझा एक सुंदर प्रवास सुरु झाला. पीएच.

बारावीतील मुलांसाठी पालक, शिक्षकांचे मार्गदर्शन

Submitted by डीविनिता on 12 April, 2014 - 06:19

माझा मुलगा आता बारावीला आहे. सायन्स ला आहे. मी अभ्यासात कधी लक्ष घातले नाही असे नाही. पण दहावीनंतर जसे स्ट्रीम्स बदलले तसे मलाच टेन्शन आले. मी सायन्स साईड ची नाही की त्याचा बाबा पण नाही. पण मुलाला एका विशिष्ट प्रकारे अभ्यास करून चांगले मार्क्स कसे मिळतिल याचे मार्गदर्शन करू इच्छिते. कॉलेज, ट्युशन्स आहेत, मेरिटनेशन चे सबस्क्रिप्शन देखिल आहे पण तरीही प्रश्न भेडसावतात ते असे की
१. अभ्यास कसा करायचा?
२. डेफिनेशन पुस्तकात दिले नसतील तर ते कसे बनवायचे? उदा. फिजिक्स मधे wavefront, wavespace and wavenormal यात वेव्हस्पेसचे डेफिनेशन कुठेच नाही पण प्रश्न मात्र आहे.

विषय: 
Subscribe to RSS - सायन्स