स्थळ : पुणे, बुधवार पेठ, नूतन समर्थ प्राथमिक विद्यालय.
मुलं : इयत्ता पहिली ते सातवी या वर्गांत शिकणारी चळवळी, उत्साही, उपेक्षित समाजातून येणारी व देवदासी स्त्रियांची मुलं
शालेय वर्ष : २०१७ ते २०१८ (जुलै २०१७ ते मार्च २०१८)
काय शिकवायचंय : स्पोकन इंग्लिश, हसत खेळत, गाणी -कोडी-खेळ-गप्पा यांच्या माध्यमातून
किती वेळ द्यावा लागेल : आठवड्यातून एक तास फक्त. (शनिवारी दुपारी साधारण १२ ते १ दरम्यान)
नमस्कार मंडळी,
जून महिन्याच्या आगमनाबरोबरच नव्या शालेय वर्षाचे वेध समस्त विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना लागलेले असतात.
गेली दोन-तीन वर्षे आपल्यातील काही मायबोलीकर समाजाचे काही देणे फेडायचा अल्पसा प्रयत्न करत आहेत. मायबोलीच्या माध्यमातून एकत्र येऊन एका देवदासीं व गरीबवर्गातील मुलांच्या गरजू शाळेत मुलांना 'हसत-खेळत' स्पोकन इंग्लिश शिकवत आहेत.
''केल्याने होत आहे रे...'' ह्या उक्तीनुसार गेल्या वर्षी आपल्या काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन पुण्याच्या बुधवार पेठ येथील रेड लाईट एरियामधील नूतन समर्थ प्राथमिक विद्यालयात 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश'चे वर्ग घ्यायला सुरुवात केली. हे विद्यालय परिस्थितीने निम्नवर्गीय व रेड लाइट एरियातील मुलामुलींना शिक्षण देण्याचे कार्य करते. ऑगस्ट २०१३ पासून सुरु केलेल्या 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश' ह्या उपक्रमाला मायबोलीकरांच्या माध्यमातून मिळालेले स्वयंसेवक शिक्षक व शाळेतील विद्यार्थ्यांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
काय करतो आपण ह्या उपक्रमात?
गेल्या वर्षी ध्यासपंथी पाऊले ग्रुपच्या अंतर्गत मी 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!' असा धागा काढला आणि अन्य उपक्रमांपेक्षा जराशा वेगळ्या अशा ह्या उपक्रमात सामील होऊ इच्छिणार्यांना आपली नावे द्यायला सांगितली. अट होती ती दर शनिवारी किमान एक तासाभराचा वेळ देऊन पुण्याच्या बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात राहाणार्या व तेथील नूतन समर्थ विद्यालयात शिकणार्या मुलांना इंग्रजी भाषा शिकवायची, तिचा सराव करून द्यायचा! अशा प्रकारे मुलांना शिकवण्याची एका संपूर्ण शालेय वर्षाची कमिटमेन्ट घेणे ही खरोखर सोपी गोष्ट नाही.
''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्यात साठवून घेऊ लागलो.
मायबोली गणेशोत्सव २०१२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
मायबोली गणेशोत्सव २०११ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी संयोजक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
मायबोली दिवाळी अंक २०१० साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा.
१. दिवाळी अंक संपादन
२. दिवाळी अंक रेखाटन
३. दिवाळी अंक सजावट
४. दिवाळी अंक साचा (template)
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
६. दृक श्राव्य विभाग (Audio/Video editing)