माझी मुलीची ३रि ची परीक्षा या आठवड्यात संपत आहे.
बिल्डींग मधल्या बाकीच्या मुलांच्या शाळा /परीक्षा अजून १० एप्रिल पर्यंत चालतील.
उन्हाळी शिबिरे, कॅम्प वगैरे त्या नंतर सुरु होतील
त्यामुळे एप्रिल दुसर्या आठवड्या पर्यंत बाई घरीच असतील.
सकाळ उशिरा उठणे आणि संध्याकाळ बाकी मुलांबरोबर खेळणे याने थोडी सुसह्य होईल पण प्रश्न दुपारचा आहे.
दुपारच्या वेळी तिला कशात बिझी ठेवावे हा प्रश्न आहे.
त्यावर शोधलेला एक उपाय म्हणजे दुपारचा वेळ तिला TV टाइम म्हणून देणे
i live in dallas/fort worth.
i am looking for pediatric surgeon for my daughter as she is having nail infection ....
i visited minute clinic and pediatrician but none of them able to give any proper treatment and suggested to go to pediatric surgeon. plz suggest me if anyone know about it .
नमस्कार..
नुकतेच जवळच्या नात्यात दोन छोट्या बाळांनी जन्म घेतला. टेक्नॉलॉजीच्या युगात जन्म घेतल्याने अर्थातच जन्मल्या क्षणापासुन त्यांचे असंख्य फोटो घेतले (काढले) गेले. त्यांचा प्रत्येक क्षण कॅमेरात बंदिस्त करण्याचे कौतुक अगदीच स्वाभाविक होते आणि आहे. पण यानंतर ते फोटो कुठे आणि कसे पब्लिश करायचे यावर बराच विचार विनिमय आणि काथ्याकुट करण्यात आला. मायबोलीकरांची या विषयावरची मते जाणुन घेण्यात रस वाटला म्हणून हा धागा.
फेसबुकसारख्या साईटवर अगदी बाळ जन्माला आल्याक्षणी त्याचा फोटो शेअर करणारे आईवडील आहेत तसेच वर्ष-वर्ष किंवा कधीच न करणारेही.
माझा मुलगा आता बारावीला आहे. सायन्स ला आहे. मी अभ्यासात कधी लक्ष घातले नाही असे नाही. पण दहावीनंतर जसे स्ट्रीम्स बदलले तसे मलाच टेन्शन आले. मी सायन्स साईड ची नाही की त्याचा बाबा पण नाही. पण मुलाला एका विशिष्ट प्रकारे अभ्यास करून चांगले मार्क्स कसे मिळतिल याचे मार्गदर्शन करू इच्छिते. कॉलेज, ट्युशन्स आहेत, मेरिटनेशन चे सबस्क्रिप्शन देखिल आहे पण तरीही प्रश्न भेडसावतात ते असे की
१. अभ्यास कसा करायचा?
२. डेफिनेशन पुस्तकात दिले नसतील तर ते कसे बनवायचे? उदा. फिजिक्स मधे wavefront, wavespace and wavenormal यात वेव्हस्पेसचे डेफिनेशन कुठेच नाही पण प्रश्न मात्र आहे.
ह्या विषयावर दुसर्या बीबीवर बोललं नाही गेलं म्हणून नीधप ह्यांनी दिलेल्या सजेशन नुसार हा बी बी काढला आहे.
<<इथल्या सर्व सुजाण पालकांनी आपापले नोकरी व्यवसाय आणि मूल वाढवणे हे दोन्ही करताना आई व वडिल दोघांनी काय प्रकारच्या तडजोडी केल्या, सपोर्ट सिस्टीम निवडताना/उभारताना काय विचार केला, कश्या प्रकारे कामाची आणि जबाबदार्यांची विभागणी केली इत्यादी गोष्टींबद्दल सांगितले तर जे अजून सुपात आहेत त्यांना मार्गदर्शन होईल. तसेच काय गोष्टींची उणीव जाणवली, त्यातून मार्ग कसा काढला, ती उणीव कश्या प्रकारे भरून निघू शकते इत्यादी गोष्टींची चर्चा झाल्यास अजून बरे.>>
शालेय अभ्यासात उपयोगी पडणार्या बेवसाईटस आणि पुस्तकं यांची नोंद या धाग्यावर करावी.
आज १६ जून २०१३ रोजी आपण मायबोलीवर 'संयुक्ता'तर्फे पितृदिन साजरा करतोय. 'बाबा, तू मला खूप आवडतोस' हे आवर्जून सांगायचा आजचा दिवस! बाबांसाठी एक पिता म्हणून अनुभवसमृद्ध होतानाचं एक नवं वर्ष जणू आज सुरू होतंय. या निमित्ताने मायबोलीकरांसाठी खालील उपक्रम सादर करतो आहोत. दोन्ही उपक्रम आपल्याला आवडतील अशी आशा आहे.
बाबाच्या राज्यात
'राहुल वयात येतोय' हे लक्षात आल्यावर राहुलचे आई-बाबा काय करतात? त्याची मानसीताई जशी त्यावेळी जरा बावरली होती तश्या राहुललापण काही शंका, प्रश्न असतील का असा विचार एका मुलाचे पालक म्हणून त्याचे आई-बाबा करतात का ?
आपण लहान असताना जेव्हा आई बाहेर जायची आणि थोडावेळ घरावर आपलं आणि बाबांचं राज्य असायचं तेव्हा काय धमाल यायची आठवतंय? कधी घरीच मनसोक्त खेळणं, कधी बाबांच्या हातचे मस्त पदार्थ खाणं, कधी बाहेर जाऊन भेळ पुरी नाही तर आइसक्रीमवर ताव मारणं! अगदी वाट पाहायचो आपण त्या बाबांबरोबरच्या मजेची!