महिला दिन सामाजिक उपक्रम २०१५ अंतर्गत सुमति बालवन आणि पाखरमाया यांना मिळालेल्या देणगीचा अहवाल

Submitted by मो on 31 July, 2015 - 10:17

यावर्षी एकूण जमा झालेल्या देणगीतील रुपये २५,०००/- (पंचवीस हजार) एवढी देणगी राधाबाई हार्डीकर प्राणिजात मंगल संस्थेद्वारे चालविल्या जाणार्‍या सुमति बालवन शाळा व पाखरमाया अनाथाश्रमाला देण्यात आली.

सदर देणगीचा विनियोग संस्थेने अनाथाअश्रमाकरता किराणा मालाची खरेदी आणि उरलेला निधी मुलांना वापरण्याकरता भिंतीत कपाटे बनवणे याकरता केला.

सुमति बालवन/पाखरमाया ह्यांना मदतीचा हात पुढे करणार्‍या सर्व देणगीदारांचे आणि स्वयंसेवकांचे आभार मानणारे पत्र, कपाटांचे फोटो आणि खरेदीच्या पावत्या आपल्याला पाठवल्या आहेत, त्या इथे पाहता
येतील.

आभारपत्र
ThanksLetter.JPGकपाट
Cupboard1.jpgCupboard2.jpgकपाटांची पावती
Cupboard Receipt_0.jpgकिराणा सामानाची पावती
GroceryReceipt1.JPGGroceryReceipt2.JPG

सुमति बालवनाला गेल्या वर्षी काही मायबोलीकरांनी भेट दिली होती. त्या भेटीचा सचित्र वृत्तांत अरुंधती कुलकर्णी ह्यांनी सुमति बालवन - पुणे भेटीचा सचित्र वृत्तांत इथे लिहिला आहे. सुमति बालवन आणि पाखमाया ह्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याकरता वरील धाग्याला जरुर भेट द्या.

मूळ धागा :
महिला दिन सामाजिक उपक्रम २०१५ - आढावा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम आढावा, मो. धन्यवाद.

सुमति बालवनची मुलं अभ्यासात तर नियमित आहेतच; वेगवेगळे छंद व खेळ जोपासण्यातही पुढे आहेत. कसरती, नृत्य, चित्रकला, खेळ व बरेच काही! कुराश नावाच्या मार्शल आर्ट (कुस्ती) खेळाच्या कोल्हापूर येथे मागच्या वर्षी झालेल्या स्पर्धेत शाळेतल्या मुलामुलींनी २ सुवर्णपदके व १ कांस्यपदक पटकावले. ही बातमी मी मायबोलीवर दिली होती की नाही ते आठवत नाही. या धाग्याच्या नििमत्ताने ते लिहिता आले. Happy