उत्तम सामाजिक उपक्रम, कार्यक्रम व प्रकल्पांच्या माहितीचे संकलन

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 17 September, 2015 - 01:56

आपल्याला वेगवेगळ्या माहिती स्रोतांद्वारे अनेक खात्रीशीर, सेवाभावी व लोकहितकारी अशा सामाजिक प्रकल्प व उपक्रमांची माहिती नित्यनियमाने मिळत असते. सोशल मीडियातून तर अशी माहिती रोजच प्रसृत होत असते. खात्रीलायक, नोंदणीकृत संस्थांद्वारे जसे मोठे उपक्रम व सेवाकार्य प्रकल्प हाती घेतले जातात तसेच अगदी छोट्या पातळीवरही एकट्या दुकट्या लोकांनी मोठ्या तळमळीने चालू ठेवलेल्या कल्याणकार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते खरी, परंतु ही माहिती इतर लाटांमध्ये विरूनही जाते. तर या धाग्याचा उद्देश हा की, अशा प्रकारचे चांगले काम व उपक्रम संकलित स्वरूपात आपल्या माहितीसाठी एकत्र पाहाता यावेत. तसेच कोणाला अशा प्रकारचे काम सुरू करायचे असेल तर त्यांना संबंधित संस्था व व्यक्तींशी संपर्क साधून त्यांच्याकडून अनुभवाचे काही बोल, मार्गदर्शन घेता येईल.

वेळोवेळी विचारणा होत असते की, मला एखाद्या चांगल्या कामासाठी देणगी द्यायची आहे... किंवा माझ्या दिवंगत आप्तांच्या स्मरणार्थ मला काही अल्पसे यथाशक्ती दान करायचे आहे... किंवा मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे... माझ्यापाशी अमका कालावधी मोकळा आहे व मला त्याचा एखाद्या चांगल्या कार्यासाठी सदुपयोग करायचा आहे...

या व अशा सर्व मंडळींना संदर्भासाठी हा धागा जरूर चाळता येईल. आपल्या माहितीतील, नोंदणीकृत व खात्रीलायक संस्थांनी चालवलेले समाजोपयोगी उपक्रम, कोण्या एकट्या शिलेदाराने किंवा व्यक्तीसमूहाने एकत्र येऊन चालविलेले समाजोपयोगी कार्य यांची माहिती इथे एकत्रित करूयात. आपल्या काही सूचना असतील तर त्याही येथे मांडाव्यात.

सध्यातरी येथे भारतातील वेगवेगळ्या व सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पांची आपणापाशी असलेली खात्रीशीर माहिती व त्यात कसे सहभागी होता येईल याबद्दलची माहिती अपेक्षित आहे.

माहिती साधारण या स्वरूपात असावी...

संस्था, रजिस्टर्ड असल्यास पूर्ण पत्ता,
संस्था कोठे व कोणत्या स्वरूपाचे कार्य करत आहे,
कार्याबद्दलची अधिक माहिती व त्यातून काय साध्य होत आहे,
साधारण कधीपासून काम चालू आहे,
त्यात कोण व कशा प्रकारे सहभागी होऊ शकते,
अधिक माहितीसाठी संपर्क.
कोणी मायबोलीकर कार्यात सहभागी असतील तर त्यांची नावे (त्यांच्या संमतीने)

आपल्या प्रतिसादांच्या अपेक्षेत आहे. धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका छान कामाची मला व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती मिळाली ती शेअर करत आहे. ही बातमी अगोदर बहुतेक सकाळमध्ये प्रसृत झाली आहे.

अरुणाचलमधील आठ हजार विद्यार्थ्यांना गणिताचे विनामूल्य प्रशिक्षण

मोफत गणित शिकवणारा.... अरुणाचल प्रदेशमधील कोणत्याही जिल्ह्यात एका मितभाषी महाराष्ट्रीय तरुणाची ही ओळख सांगणारे अनेक विद्यार्थी तुम्हाला भेटतील. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हृषीकेश दिवेकर हा पुण्यातला तरुण २००६पासून अरुणाचलात विविध शैक्षणिक संस्थांबरोबर शिक्षण प्रसाराचे काम करत असून, त्याने आतापर्यंत आठ हजार विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावली आहे.

हृषीकेशला २००९मध्ये बोमदिला येथील मंजूश्री विद्यालयात उपमुख्याध्यापक म्हणून काम करताना मोफत गणित, विज्ञान मार्गदर्शन वर्गाची कल्पना सुचली व सेवा भारतीच्या माध्यमातून बोमदिला येथे मोफत मार्गदर्शन वर्गाची सुरवात झाली. या दुर्गम राज्यातील शाळांमध्ये गणित शिक्षकांची कमतरता आहे व त्यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी दहावीला गणितात नापास होतात. गणिताची भीती दूर करून अशा विद्यार्थ्यांना परीक्षा तंत्र शिकवल्यास त्याचा उपयोग होईल, या उद्देशाने त्याने एका महिन्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. पहिल्याच वर्षी २०० विद्यार्थ्यांना या वर्गाचा उपयोग झाला. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९०% झाले, तर अनेक जणांच्या गुणांत वाढ झाली.

या अनुभवातून त्याने गावागावांत गणिताचे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्याचा निर्णय घेतला. आता तो एका गावात दोन महिने राहतो, गावातील शाळा, आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीन तुकड्या चालवतो. दोन महिन्यांत 'क्रॅश कोर्स' घेऊन गणिताची तयारी करून घेतो. गणित अध्यापनात गणितातील मूलभूत संकल्पना वेगवेगळ्या कृतीतून, खेळाच्या माध्यमातून शिकवणे, दहावीच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या प्रवेश परीक्षांसाठी परीक्षातंत्र शिकवणे, विज्ञान व गणिताचे व्हिडिओ व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देऊन विषय सोपा करणे ही त्याची शिकवण्याची पद्धत आहे.

हृषीकेशचा दिवस पहाटे पाच वाजत सुरू होतो. नवीन गावात गेल्यावर तो गावकऱ्यांना वर्गाची कल्पना समजावून सांगतो. मोफत शिकवण्यामागे सरांचा प्रामाणिक उद्देश आहे, हे लक्षात आल्यावर गावकरी राहण्यासाठी खोली देतात किंवा शाळेत राहण्याची सोय करतात. हृषीकेश सकाळी स्वयंपाक करून कधी दुचाकीवर, कधी पायी ५ ते ७ किलोमीटर अंतरावरील वस्तीवर जातो. तास घेऊन परत मुख्य गावी परत येतो. गावातील शाळेत किंवा एखाद्या हॉलमध्ये दुपारची तुकडी घेतो. रात्रीचा स्वयंपाक व जेवण करून रात्रीच्या वर्गासाठी जवळच्या वस्तीवर जातो. तो वर्षभरात ४ ते ५ गावांत असे वर्ग घेतो. वर्षाच्या शेवटी मार्च व एप्रिलमध्ये इटानगर या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी बारावीनंतर इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी इच्छुकांची तयारी करून घेतो. तो गेल्या दोन वर्षांपासून सेवाभारती व ज्ञान प्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही वर्ग घेत आहे. अशाप्रकारे त्याने २००९ ते २०१५ या काळात आठ हजार विद्यार्थ्यांना गणिताचे प्रशिक्षण दिले आहे. त्याच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गणितात उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात वाढ झाली, तर अनेकांच्या गुणांत वाढ झाली. त्याचे अनेक विद्यार्थी पुण्यात बी.एस्सी., इंजिनिअर होण्यासाठी आले आहेत.

तुमच्याही योगदानाची गरज!

मोफत गणित व विज्ञान मार्गदर्शन वर्गाच्या या चळवळीत गेल्या वर्षभरात स्नेहा भन्साळी, चिन्मयी मुळे, गजानन वैद्य या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी वर्षातील दोन महिने अरुणाचल प्रदेशात जाऊन अभ्यास केंद्रे चालवायला हृषीकेशला मदत केली. आपण वर्षातील दोन महिने वेळ काढू शकत असल्यास ज्ञान प्रबोधिनीतर्फे ईशान्य भारतात चालणाऱ्या उपक्रमांचे संयोजन करणाऱ्या विवेक पोंक्षे सरांशी संपर्क साधावा.

http://prashala.jnanaprabodhini.org/contact_information.asp

अकु, अतिशय उत्तम संकलन! जर या संस्थांसोबत कोणी मायबोलीकर काम करत असतील तर त्यांचीही नावे लिहावीत अशी विनंती करते.

जर कोणाला काही मदत करायची असेल तर संपर्क साधणं सोपं होईल.

मेक अ डिफरन्स : मॅड इंडिया

शेल्टरहोम्स मध्ये राहणार्‍या मुलांना इंग्रजी आणि गणित शिकवणं हा यांचा मुख्य कार्यक्रम. मी जिथे शिकवायला जातो त्या ऑर्फनेजमध्ये या संस्थेचे अनेक स्वयंसेवकही येतात. बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. त्यांना शिकवण्याचं, मुलांसोबत कसं राहायचं याचं रीतसर प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यांची निवडही रीतसर प्रक्रियेद्वारे होते.

आम्हा बाकीच्या शिक्षकांच्या वर्गांत पाय ओढत येणारी मुलं मॅडच्या क्लासची वाट बघत असतात.

अण्डरप्रिव्हिलेज्ड मुलांच्या शिक्षणासोबत तरुणांमध्ये नेतृत्वगुण इ. विकसित करण्याचंही उद्दिष्ट. .

गूंजचा उल्लेख आधी मायबोलीवरच पाहिलेला.
मुख्यत्वे कपड्यांचा रियुझ आणि रिसायकलिंग हे त्यांचं काम.
गूंजच्या अंशु गुप्तांना आत्ताचा मॅगसेसे पुरस्कार मिळालाय.

अतिशय उपयोगी धागा!

ही कल्पना सिंडरेलाची आहे. ह्या संदर्भात तिने अनेकांना संपर्कदेखिल केला होता. मायबोलीवर धागा निघणार होता. तो अखेर निघाला हे फार बरं झालं. पण ज्याची कल्पना आहे त्या व्यक्तीला क्रेडिट मिळायला हवं.

धन्यवाद!
परवा व्हॉट्सअॅपवरील माहिती शेअर केल्यावर मो बरोबर बोलताना असे सेवाभावी, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व उपक्रमांच्या माहितीचे संकलन मायबोलीवर करूयात हे तिने सहजच सुचविले. सिंडरेलाने मागे याबद्दल बरीच तपशीलवार अशी कल्पना मांडली होती व त्यावर चर्चाही झाली होती. तेव्हा या कल्पनेचे श्रेय खरेच सिंडरेला व मला ढोसणाऱ्या मो चे आहे! Happy

मामी, सूचना उत्तम!

चेक पाठवण्यासाठी कोणाला नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंनी शेतकर्‍यांसाठी सुरु केलेल्या "नाम" ह्या संस्थेचा पत्ता माहित आहे का? असल्यास जरुर कळवावा.

http://www.schoolkart.com/skares
आपल्या मुलांच्या वापरून झालेल्या वस्तू : युनिफॉर्म्स, शूज, स्कूलबॅग्ज, स्टेशनरी, क्रीडासाहित्य इ. गरजू मुलांपर्यंत पोचवायची सोय स्कूलकार्टने गूंजच्या साथीने करून दिली आहे.

आज आमच्या मुलांच्या शाळेने खालील आवाहन केलंय. मला माबोवर कुठे टाकू हे कळलं नाही म्हणून इथे टाकतोय....
कृपया मदत करा आणि मार्गदर्शनसुद्धा करा.

सर्व पालकांना अवाहन -
पहिल्यापासून आपल्या शाळेत असणारी व सध्या तिसरीत शिकत असणारी आपली विद्यार्थीनी शिवानी दुतोंडे हिला ब्लड कँन्सर झाला असल्याचे नुकतेच समजले आहे. तिला पुण्यातील डेक्कन सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. तिचे पालक मुळात अल्प उत्पन्न गटातील असून तिच्या उपचाराचा खर्च करण्यास असमर्थ आहेत. तरी आपण सर्वांनी मिळून त्यांना जास्तीत जास्त मदत करुया. तुम्ही स्वतः, मित्रमंडळी यांनी त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत. तसेच अशा आजारासाठी मदत देणाऱ्या संस्था, योजना यांची माहिती असल्यास शाळेत कळवावी. शिवानी लवकरात लवकर बरी व्हावी हीच इच्छा.
Dnyaneshwar D. Dutonde
Bank of India
Gangapur road, Nashik
A/c ,no 082210110002573
IFSC Code , BKID0000822