पुणे

बाणेर,बालेवाडी,पाषाण,औंध,वाकड,हिंजेवाडी भागातल्या शाळा.

Submitted by अगो on 12 October, 2012 - 04:57

माझे प्रश्न असे आहेत :
१. बाणेर-बालेवाडी- औंध भागात एसएस्सी अभ्यासक्रमाच्या चांगल्या शाळा कुठल्या ?

२.बालेवाडीत भारती विद्यापीठ स्कूल आहे. इंग्लिश मिडियम सीबीएसई आहे असे वाटते. ती चांगली नाहीये का ? मी बालेवाडीत असतानाही आमच्या सोसायटीत मी वर दिलेल्या शाळांचीच चर्चा असायची. भारती विद्यापीठ बद्दल कुणी बोलत नसे.

३. वरील दिलेल्या लिस्टव्यतिरिक्त अजून काही सीबीएसई / आयसीएसई शाळा आहेत का ज्या माझ्या नजरेतून सुटल्या आहेत ?

४. इथल्या कुणाची मुलं त्या शाळांत जात असतील तर त्यांचे अनुभव ऐकायला आवडतील.

दर्शन - लतादीदींचे

Submitted by skamble on 24 September, 2012 - 02:22

२८ सप्टेंबरला लतादीदी ८४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या एका कट्टर चाहतीने सांगितलेली ही एक आठवण. - (ज्योती कांबळे, Manchester, UK)
-------

विषय: 

गणेशोत्सव आला पुण्यात - बाप रे !

Submitted by सुनीता करमरकर on 17 August, 2012 - 22:23

आला आला गणेशोत्सव आला! पुण्या मुम्बईत आला! बाप रे!

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले.
प्रश्न हा आहे कि आज इतक्या वर्षानंतर आपण गणेशोत्सवाचे जे स्वरूप पाहतो आहोत ते खरोखरच योग्य आहे का?
आपण एक सुसंस्कृत प्रजा म्हणून,जे चालू आहे ते तसेच चालू राहू द्यायचे आहे का?
आजच्या परिस्थितीची काही उदाहरणे घेऊया.-हि यादी खूप मोठी होऊ शकते - पण तरी...

विषय: 
शब्दखुणा: 

पुण्यातील देवालयांची गमतीशीर नावे.....

Submitted by बाळू जोशी. on 16 August, 2012 - 00:38

पुण्यामध्ये असंख्य देवालये आहेत्.त्याचा आकार एखाद्या खोक्यापासून तर विशाल मंदिरांपर्यन्त आहे.इतरत्र न आढळणारी गोष्ट म्हणजे इथल्या देवळांची विचित्र, गमतीशीर नावे.कधी कधी तर ती अगदी टिंगलवजाही भासतात.पुणेरी तिरकसपणाने देवांची सुद्धा गय केलेली नाही. Happy हल्ली जर एखादे नव्याने असे नाव दिले तर मोठ्याच वादाचे प्रसंग उद्भवतील. पूर्वी बहुसंख्य देवळे ही पत्ते ओळखण्यासाठी लॅन्डमार्क म्हणून वापरली जायची.

पुण्यात तात्पूरती राह्ण्याची सोय

Submitted by सन्जना on 30 May, 2012 - 06:58

आम्हाला पुण्यात तात्पूरती राह्ण्यासाठी १ बेड किचनची जागा हवी आहे - २ महिन्यासाठी - जुलै व ऑगस्ट २०१२. फ्लॅट प्रभात रोड अथवा F.C. college रोड या परिसरात व furnished असावा. कृपया माहिती असल्यास जरुर लवकर कळ्वा.

विषय: 

पुणे : मंगलकार्यासाठी खानपानाची व्यवस्था (outdoor caterers) बद्दल माहीती हवी आहे.

Submitted by माधवी. on 13 April, 2012 - 06:22

पुणे येथे मंगलकार्यासाठी ( वास्तुशांत / मुंज ) खानपानाची व्यवस्था पुरवणार्‍या caterers बद्दल माहीती हवी आहे. चांगला महाराष्ट्रीयन मेनु serve करणारे कोणी caterers कोणास माहीत आहेत का?
तसेच मंगलकार्याच्या आदल्या दिवशी व दुसर्‍या दिवशी घरपोच घरगुती जेवाणाच्या डब्यांची सोय होऊ शकते का?
कॄपया कोणास माहीत असल्यास कळवणे.

वा गुरू

Submitted by सुभाष इनामदार on 6 April, 2012 - 12:08

चंद्रशेखर फणसळकरांच्या नविन नाटकातली दिलीप प्रभावळकरांची भूमिका पाहल्यानंतर नाट्यरसिकांच्या मनात सहजच एक शब्द घुमतो तो म्हणजे `वा गुरू`. मृत्यूचे भय न बाळगता आयुष्यातल्या जुन्या स्मृतींना जागवत आपल्या मनात सतत असणा-या विचारांना बोलते करणारा हा हाडाचा शिक्षक. पायापासून हळूहळू एकेक अवयव काम न करताना दिवसेंदिवस शरीराने खंगत जातो. ती वेदना हसत हसत झेलताना आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपल्या एके काळच्या प्रिय विद्यार्थ्याजवळ सांगतात. सगळे नाटकच थोड्याफार फरकाने गंभीर आहे.

विषय: 

हरवलेल पुणे

Submitted by जयन्ता on 24 March, 2012 - 01:23

पुणे. एके काळाचे सायकलींचे, वाड्यांचे शहर. आता वाडे पण गेले आणि सायकली सुद्धा. पण त्यान बरोबर पुण्याने आपला चेहरा तर गमावला नाही ना..?
IMG_0176.png

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पायल इनामदार- भाग २

Submitted by आशयगुणे on 16 January, 2012 - 03:43

" काय रे? काय झाले एकदम?" आश्चर्यचकित होत तिने विचारले. "एवढा दचकून काय पाहतो आहेस?"
" काही नाही ग. असाच एक विचार आला मनात." मी उत्तर दिले.
" मी हे सांगितले म्हणून तू एवढा दचकलास?का रे? एरवी तुझ्याशी बोलताना वाटले होते की तू एकदम frank असशील", पायल म्हणाली. मी काहीच बोललो नाही आणि चूक करून बसलो. कुणी असं बोलल्यावर गप्पं बसणं म्हणजे एका अर्थाने त्याला किंवा तिला दुजोरा देण्यासारखेच असते. आणि नेमके तेच झाले. मी काही बोलत नाही हे पाहून पायलसुद्धा काही सेकंद गप्पं बसली. शेवटी मीच तिला म्हणालो.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - पुणे