पुणे

हरवलेल पुणे

Submitted by जयन्ता on 24 March, 2012 - 01:23

पुणे. एके काळाचे सायकलींचे, वाड्यांचे शहर. आता वाडे पण गेले आणि सायकली सुद्धा. पण त्यान बरोबर पुण्याने आपला चेहरा तर गमावला नाही ना..?
IMG_0176.png

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पायल इनामदार- भाग २

Submitted by आशयगुणे on 16 January, 2012 - 03:43

" काय रे? काय झाले एकदम?" आश्चर्यचकित होत तिने विचारले. "एवढा दचकून काय पाहतो आहेस?"
" काही नाही ग. असाच एक विचार आला मनात." मी उत्तर दिले.
" मी हे सांगितले म्हणून तू एवढा दचकलास?का रे? एरवी तुझ्याशी बोलताना वाटले होते की तू एकदम frank असशील", पायल म्हणाली. मी काहीच बोललो नाही आणि चूक करून बसलो. कुणी असं बोलल्यावर गप्पं बसणं म्हणजे एका अर्थाने त्याला किंवा तिला दुजोरा देण्यासारखेच असते. आणि नेमके तेच झाले. मी काही बोलत नाही हे पाहून पायलसुद्धा काही सेकंद गप्पं बसली. शेवटी मीच तिला म्हणालो.

गुलमोहर: 

पायल इनामदार- भाग १

Submitted by आशयगुणे on 16 January, 2012 - 03:39

आमच्या बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर ती राहायची. सदैव आपल्या विश्वात. मी तिला बिल्डींगच्या इतर सदस्यांशी बोलताना कधी बघितलं नाही. तसेच बिल्डींग बाहेरचे कुणी तिच्या ब्लॉक मध्ये आल्याचे देखील मला स्मरत नाही. सकाळी ९ च्या सुमारास ती घरून बाहेर पडायची. बहुदा कामाला जात असावी. आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास पायऱ्या चढताना दिसायची. पण त्या दिवसात तिने एकदाही माझ्याकडे पाहिले नाही. सदैव मान खाली घालून जात असे. जिन्यातच काय पण बिल्डींगच्या आवारात देखील ती कधीही कुणाकडे पाहून हसल्याचे मला आठवत नाही. एक मात्र होते. ती समोरून गेल्यानंतर वातावरणात एक अस्वस्थ शांतता पसरायची.

गुलमोहर: 

वाढदिवस!!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

वर्षातले ३६३ दिवस एकीकडे! आणि *हा दिवस दुसरीकडे!
अशा तुलनेतही ज्याचे पारडे खाली जाईल, तो दिवस म्हणजे वाढदिवस!!

सकाळी बरोब्बर ६.१५ ला जाग आली. मोबाईलला गजर करण्याची गरजच पडली नाही. एका आवर्तनामधे उठलो. पांघरूणाची घडी केली. आवरलं. एक पेला भरून पाणी प्यालं. पुस्तकात वाचल्याप्रमाणे प्राणायाम केला. १२ सूर्यनमस्कार घातले. जॉगिंगला गेलो. साधारण अर्ध्या तासाने परत आलो. मनसोक्त व्यायाम झाल्यामुळे आनंद झाला. दिवसाची सुरुवात अशी छान झाली, म्हणजे दिवसही छानच जाणार! त्यातून आज माझा वाढदिवस! मग काय बोलता?

विषय: 
प्रकार: 

कवडी पाट, हडपसर, पुणे

Submitted by रंगासेठ on 23 November, 2011 - 10:22

मागील शनिवारी हडपसर पासून जवळच असलेल्या 'कवडी पाट' येथे जाऊन आलो. पक्षीनिरिक्षणासाठी येथे बर्‍यापैकी हौशी लोक येतात. त्याचबरोबर इथला सूर्योदय देखील अनुभवण्यासारखा आहे.

जाण्याचा मार्ग -> पुणे-हडपसर-लोणी-कवडी
हडपसरहून अंतर – अंदाजे ६-७ किमी
शक्यतो पहाटे लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करावा. सूर्योदयाच्या अथवा सूर्यास्ताच्या आसपासचा काळ फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम. तसेच पक्षीदर्शन ही होते मस्त पैकी.

गुलमोहर: 

गटग वृत्तांत...रविवार ब्रेकफास्ट गटग, पुणे!

Submitted by अविकुमार on 26 August, 2011 - 04:47

गटग वृत्तांत...रविवार ब्रेकफास्ट गटग, पुणे!

----------------------------------------

टीप: खालील वृत्तांतात कुणाचा उल्लेख राहून गेल्यास तो अनुल्लेखाचा प्रयत्न नसून मा.बु.दो.स.
कार्यबाहुल्यामुळे वृत्तांत लिखाणास अक्षम्य उशिर झाला आहे याची मला जाणीव आहे. तरिही 'आपलेच' मायबोलीकर समजून घेतील अशी आशा.
---------------------------------------------

गुलमोहर: 

पुणं तिथं सगळंच उणं!!

Submitted by शांतीसुधा on 1 July, 2011 - 08:49

मी जेव्हा जेव्हा पुण्याला जाते तेव्हा तेव्हा मला रीक्षाचा वापर करावाच लागतो. कारण पुण्यात हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली किंवा मुंबई सारखी लोकल ट्रान्सपोर्ट सेवा नाही. आता पुणे स्टेशन ते आमचं घर हे अंतर गेली अनेक वर्षे किलोमीटर मध्ये एकसारखंच आहे. किंबहुना आता मार्केट यार्ड कडून पुणे स्टेशनकडे रस्ता अतिक्रमणं हटवून मोकळा आणि मोठा केल्याने लागणारा वेळ पूर्वीच्या तुलनेत पाच मिनीटांनी कमी झाला आहे. पण दरवेळी रीक्षाच्या मीटर मध्ये याच किलोमीटरचं प्रमाण नेहमी वाढतं असतं. रेल्वे स्टेशनमधुन बाहेर आलेला प्रत्येक माणूस हा पुण्यात पहिल्यांदाच पाऊल ठेवतो आहे अशाच थाटात पुण्यातील रीक्षावाले वागत असतात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जीव !

Submitted by vaiddya on 9 February, 2011 - 13:50

पुण्यात इकडे-तिकडे फिरण्यासाठी मी बस किंवा रिक्षाचा वापर करतो. बर्‍याचदा रिक्षा हाच पर्याय पुण्याच्या बस-कंपनीच्या “एक्स्ट्रा”ऑर्डिनरी कारभारामुळे सोयिस्कर वाटतो .. आणि इतरवेळी आपला जो मार्ग असतो तो कोणत्याही बस-मार्गामधे येत नसल्याने रिक्षा हा एकच पर्याय स्वतःचं वाहन नसलेल्या कोणाही माणसांपुढे उरतो. मीं अश्या लोकांमधे येत असल्याने मी रिक्षाने फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून लॉ कॉलेज रस्त्याकडे जाण्यासाठी एक रिक्षा मिळवून आत बसलो. मला जिथे जायचं होतं ती कांचन गल्ली रिक्षाचालकाला माहित असल्याने मला फारसं काम उरलं नव्हतं .. मी प्रथम इकडे-तिकडे पाहात होतो ..

गुलमोहर: 

दादोजी भेटले उद्यानात ..

Submitted by vaiddya on 30 December, 2010 - 11:29

(दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवला हे कळल्यावर मला सुचलेलं काही .....)

पुलंच्या उद्यानात फिरायला गेलो
तर भेटले तिथे दादोजी !
मी म्हणालो,
“दादोजी, अहो, काय झाले ?
हे काय तुमच्या नशिबी आले ?

अर्धी बाही वर करून
वर्षानुवर्षं पाहिले होते
पुस्तकात,
शिल्प म्हणून पाहिले होते
एकदाच ओझरते
लाल महालात,
आणखी कोठे कोठे
तुमची चित्रेच होती पाहिली ..
अहो, त्या काळी तुमच्या,
तुमचे फोटो कुठे होते ?
एक पुतळा उभा केला
त्याला म्हटले दादोजी
पण कल्पनेतले
दादोजी अगदी
तुमच्यासारखेच होते !

अलिकडे, माणसे बोलू लागली,
वाद-विवाद चर्चांमधे
तुम्हाला ओढू लागली,
खरं सांगतो दादोजी,

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - पुणे