कामवाल्या बाईंच्या दहावी-बारावी परीक्षा दिलेल्या मुलामुलीसाठी पुण्यात काही वोकेशनल कोर्सेस करता येतील का ?

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 21 March, 2013 - 00:37

नमस्कार,

आमच्या कामवाल्यांची मुलगी बारावी आणि मुलगा दहावीची परीक्षा देतो आहे. त्या दोघांसाठी सुट्टीत काही कोर्सेस - जसे एलेक्ट्रिशियन, प्लंबिंग - शिकण्यासाठी पुण्यात कोणत्या संस्था आहेत का ? मुलगा पास होण्याची शक्यता नाही म्हणतात त्या, मग पुन्हा दहावीला बसवण्यापेक्षा मी सुचवलं की असं काही शिकून तुम्हाला हातभार तरी लावू शकेल तो.

मुलींसाठी एक दोन संस्था मिळाल्या मला - रेणुका स्वरूप , स्वरूपवर्धिनी वगैरे, पण मुलांसाठी नाही मिळाल्या.

धन्यवाद,

- प्राजक्ता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्रजी नसले तरी मॉलमध्ये कपडे दाखवणे, कधी कधी रेजिस्टर सांभाळणे जमले तरी खूप ना.

आमचा ड्रायवरचा उनाड मुलगा आता लाईनीला लागलाय उलट.. मॉल मध्ये नोकरी लावायला सांगितली बाबांनी त्याला.

इंग्रजी नसले तरी मॉलमध्ये कपडे दाखवणे, कधी कधी रेजिस्टर सांभाळणे जमले तरी खूप ना.

आमचा ड्रायवरचा उनाड मुलगा आता लाईनीला लागलाय उलट.. मॉल मध्ये नोकरी लावायला सांगितली बाबांनी त्याला.
>>>>>>>>>>>
बीबी शिक्षण कोणते घेता येईल असा आहे.

शिक्षणात थोडा खंड पडला म्हणून नोकरी, किंवा पैशा ची कमकरता आहे म्हणून अर्धवेळ नोकरी करुन शिक्षण हे पर्याय ठिक आहेत. पण दहावीला परत बसणे मस्ट आहे. बहिस्थ विद्यार्थ्याना आज काल किती तरी कमी पैशामधे पदवी मिळवता येते....

शिक्षण सोडून काय होणार? तुम्ही तुमच्या कामवाल्यांचं, सोबत त्यांच्या मुलांचं ब्रेनवॉशिंग केलत तर बरे होइल.

उनाड फिरण्यापेक्षा हे जॉब करणे ठिक आहे. पण हे काही permanent solution नाही आहे, या वयात तरी.

तो मुलगा परत बसुन पण दहावी पास होणार नाही कशावरुन..... त्याला encourage करायला हवे.
तो पर्यंत जो रिकामा वेळ आहे त्यात असे कोर्सेस करता येतील.

काहीतरी करुन १०वी पास झाला तर ITI चा एखादा कोर्स करता येइल.. पण १०वी पास अशी अट बर्‍याच ठिकाणी हेल्पर साठीही असते त्यामुळे किमान तेव्हढं शिक्षण पाहीजे. हे त्या मुलाला नीट कळायला हवं.

प्राजक्ता_शिरीन, मी आधीही कोणत्या तरी धाग्यावर ही माहिती दिली आहे.

तळेगाव दाभाडे येथे रूडसेट नावाची संस्था आहे. तिथे ग्रामीण/ सेमी-अर्बन मुलामुलींसाठी अनेक व्यावसायिक प्रशिक्षण कोर्स विनामूल्य उपलब्ध आहेत. संस्थेचे वसतिगृहही आहे, जिथे राहण्याची-जेवणखाण्याची सोय होऊ शकते.
http://www.rudsetitraining.org/pages/units.html

त्यांच्या साईटवर प्रवेश अर्जही मिळू शकेल.

ही त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या कोर्सेसची यादी :
http://www.rudsetitraining.org/pages/training.html

पात्रता : Any unemployed youth in the age group of 18-45 years, irrespective of caste, creed, religion, gender and economic status, having aptitude to take up self employment or wage employment and having some basic knowledge in the related field can undergo training which is totally free.

संपर्क :

Varale Road
Near Eagle Agro Farm
Talegaon - Dabhade
410507
Pune District
rudset2007@rediffmail.com
संपर्क व्यक्ती : S. K. Peshkar (CB)
फोन : 02114 – 225504
मोबा : 09850180449

शिक्षणाची एकूणचं बोंब आहे, पुन्हा पुन्हा दहावीला बसला तर परीक्षा आहे म्हणून काम नाही आणि अभ्यास तर नाहीचं नाही अशी अवस्था होईल.

म्हणून मीचं सुचवलं की असा कोर्स करायला सांगा की निदान कामधंद्याचं तरी बघेल, उनाडक्या करून वाया नको जायला. त्या एकट्या काम करून ३ मुलांना वाढवत आहेत.

धन्यवाद अकु, मी त्या संस्थेत चौकशी करेन.

>>दहावीच्या परीक्षेत पास होण्यापुरते गुण मिळवणे पूर्वीसारखे कठीण नाही.
काही मुला मुलींना तेवढे पण जमत नाही Sad
त्याला कारणे वेगवेगळी असू शकतात.

अकु छान पोस्ट.
हा मुलगा वयाच्या अटीत बसणार नाही कदाचित पण ही माहीती दुसर्‍या कोणालातरी नक्की उपयोगी पडेल.

आणखी एका संस्थेची माहिती नेटवर मिळाली. त्यांची पुण्यातही व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर्स आहेत.

http://www.yuvaparivartan.org/contact/index.php

ही त्यांची प्रोजेक्ट्स : http://www.yuvaparivartan.org/whatwedo/projects.php

हे कोर्सेस : http://www.yuvaparivartan.org/whatwedo/courses.php

ही सेंटर्स : http://www.yuvaparivartan.org/whatwedo/centers.php

कुणातरी शिंपिदादाकडे नोकरी मिळाली तर ठेवा त्याच्या हाताखाली. हळूहळू हाताखाली तयार होईल त्याच्या. स्वतंत्र व्यवसाय करू शकेल नंतर. शिवणकामात पैसे चांगले मिळतात हल्ली. हल्ली युपी बिहार्ची मुले असतात शिंप्यांच्या हाताखाली.

>>बीबी शिक्षण कोणते घेता येईल असा आहे.>><<
शिक्षणाची बोंब आहे लिहिले आहे ना वरती आधीच? म्हणूनच हे सुचवले.
पुन्ह पुन्हा सांगून सुद्धा पास झाला नाही तर त्याला कारणे द्यायची सवय लागू शकते. वर इतका खर्च झेपणार आहे का त्या बाईला? दहावीची परीक्षेचा खर्च काय कमी आहे आता. क्लास वगैर झेपायला हवा ना खर्चाने. कामवाली बाई एकटीच कमावते, त्यात पोरग नसेल पास होणार ह्याची तिलाच गँरटी आहे तर आताच कामाला लागलेला बरा.. नाहितर परीक्षेच्या नावाखाली वाया..

मोबाइल दुरुस्ती वै शिकु शकेल.
गॅरेज मध्ये मॅकॅनिकचा हेल्पर म्हणुन काम करता करता दुरुस्ती शिकला तर स्वतःचा छोटासा व्यवसाय करता येइल.

ड्रायव्हिंग शिकला तर ड्रायव्हर म्हणून. डॉक्टर कडे कम्पाउंडर .कुरियर बॉय . सेल्स मन म्हणून कपड्यांच्या दुकानात वगैरे या कामांना दहावी पास नसेल तरी चालत . पण काही झाल तरी दहावी नेटानी पास करायला सांगाच Happy

झंपी,

Dont be so judgemental.

त्याच्या आईला वाटले कि तो दहवीला पास होणार नाही म्हणून लगेच नोकरी ? पंधराव्या वर्षी काम करणे हे बालकामगार कायद्यानुसार गुन्हा आहे ना? वयाचे लिमिट १८ आहे ना? त्याने काय करायचे हे ठरविण्या चा पालकांना काय अधिकार? १८ वर्षाचा झाला कि तो ठरवेल कि दहावी परत द्यायची का नोकरी करायची ते.

अर्थशास्त्रामधे याला vicious circle of poverty असे म्हणतात. पालकांना नोकरी नाही म्हणून शिक्षण नाही. शिक्षण नाही म्हणून पाल्याला नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून पैसा नाही.
हा मुलगा १५व्या वर्षी नोकरी ला लागणार. हातात पैसा आला कि लोकांचा शिक्षणामधे ईंटरेस्ट राहत नाही. अजुन ५ ते ७ वर्षे नोकरी केली कि त्याला लग्न करावेसे वाटू लागणार. लग्न झाले कि मुले. तो जर ड्रायव्हर, प्लंबर, मॉल मधे कपडे घडी घालणे, असली कामे करत असेल तर तो काय त्याच्या मुलाला पुढे शिक्षण देणार. त्याचाही मुलगा अनास्थेने शिक्षण मधून सोडून देणार. तो पण १५ ते १८ वर्षे या दरम्यान कामाला लागणार आणि पहिले पाढे पंचावन्न.

आजूबाजूला पहिलेत तर गरिबीत जगणार्‍या ९० ते ९५ % लोकांकडे हिच परिस्थिती असते. त्या कामवाल्या बाईला हे व्हिजन असेल अशी शक्यता कमीच. गरिबी मधून बाहेर पडायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. हा त्या मुलात जर एक्स्ट्रा ऑर्डीनरी टॅलेंट ( धिरुभाइ, सचिन, बिल गेट्स, दिपिका पदुकोण)असेल तर गोष्ट वेगळी. तेंडुलकर १२ वी पास आहे म्हणे. खखोदेजा.
पण असे टॅलेंट काय गल्लोगल्ली सापडत नाही. त्यामुळे शिक्षण पाहिजेच.

माझा मुलगा किंवा मुलगी जर दहावी ला नापास होण्या ची शक्यता असेल तर मी काही त्याला मॉल मधे कपडे घडी करायला पाठवेन का? नक्किच नाही. काही तरी करुन त्याला शिकवेनच कि. आता कोणी तरी म्हणेल कि तुमच्या कडे पैसा आहे म्हणून तुम्ही करु शकता. ज्यांच्या कडे नाही ते काय करतील. आईवडिलांकडे पैसा नाही यात त्या १५ वर्षाच्या मुलाचा काय दोष? त्याला शिकायचा, नापास झाल्यास परत परिक्षा द्यायचा अधिकार नक्किच आहे. त्याला शाळेतून काढायचा अधिकार ना पालकांना आहे ना दुसर्‍या कोणाला.

आणि प्राजक्ता जी, जर त्यांच्या घरच्यांकडे त्याच्या शिक्षणासाठी पैसा नसेल तर मला विपू करा किंवा नंबर द्या. मला अनेक NGO माहित आहेत ज्या अशा लोकांसाठी काम करतात. मी त्याला मदत करेन. पण कृपया कधी ही कोणत्याही पालकांना मुलांना शाळेतून काढायचा सल्ला देऊ नका.

>>Dont be so judgemental.>><<
मी एक साधा व्यवाहरीक मुद्दा मांडला. तो तुम्हाला पटलाच पाहिजे असे नाही.
तुमचा मुद्दा काही अंशी बरोबर असला तरी इथे दुसर्‍याची घरी कामं करणारी बाईचा आहे. कितीसा पैसा तिच्या गाठीशी असेल? त्यामुळे तुमचे तुमच्या मुलाविषयी उदाहरणाची जागा चुकली.
आधी कामं करून पोटं भरणारी बाई मुलावर किती लक्ष ठेवणार... ना धड अभ्यास करणारा मुलगा ना काहीच करणारा नसेल तर वाहायला वेळ लागत नाही आजूबाजूच्या वातावरणात.

बाकी चालू द्या.

ड्रायव्हिंग शिकला तर ड्रायव्हर म्हणून>> हा मुद्दा मी ही मांडणार होतो.
पण त्याच वय आड येइल.
शिवाय ड्रायव्हर म्हणुन जर वडाप करणार्‍या (पुणे मुंबै सारखे) गाडीवर ड्रायव्हर वै म्हणुन नोकरी मिळाली तर संगत चांगलीच असेल अस नाही.
ह्या दोन मुद्द्यामुळे डावललं.

तो मुलगा १ली ते ९वी सरळ पास होत गेला असेल तर तो आता १५ वर्षांचा असेल. जर नापास होत गेला असेल तर किती असेल माहित नाही. पण सरळ पास होत गेला असेल तर १०वीला आत्तासमजा नापास झालाच तर अजून १-२ प्रयत्नांत पास होईलही. तोपर्यंत कोहिनूर, अभिनव टाईप टेक्निकल इन्स्टिट्यूट्समधून काही शॉर्ट टर्म कोर्सेस करु शकतो. इलेक्ट्रिशियन / प्लंबिंगचे कोर्सेस केले तर कामाला मरण नाही. 'मेहनती असणे आणि प्रामाणिकपणा' हे गुण अंगी असतील तर नक्कीच आर्थिक दृष्ट्या चांगला वर येईल.

@ अतरंगी, तुमचा मुद्दा अगदी मान्य.

तो मुलगा आत्ताचं ऑक्टोबर ला पुन्हा परीक्षा द्यायची भाषा करतो आहे. म्हणजे आत्ता पास होणार नाही ह्याची खात्रीचं आहे त्याला, पण पुन्हा अभ्यास करून पास होईन अशी तयारी असेल तर उपयोग ना, १०-१५००० फी साठी घालवायचे आणि पासही होणार नसेल तर काय हो उपयोग ?

त्या बाई एकट्या ३ मुलांना वाढवत आहेत अशा वेळी मुलाला / मुलीला जाणीव हवी ना आईच्या कष्टांची. अगदी अंगमेहनतीची कामं नको, पण दूध,पेपर टाकणे हे तर करू शकेल ना. आईकडे उडवायला पैसे मागताना त्यामागच्या कष्टांची तर जाणीव होईल.

आणि आपण म्हणतो शिक्षण नाही, पण बी कॉम वगैरे होऊन तरी अशा काय नोकर्‍या ठेवल्या आहेत ? त्यांनी मुलीला दहावी बारावी क्लास लावला, एवढाली फी भरली कर्ज काढून. म्हणून मी तिच्यासाठीही सांगितलं की असं काहीतरी शिकवा की त्याने पुढे नोकरी तरी लागेल - डी एड वगैरे.

झंपी,

Nothing personal.

मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात शिक्षण मधुनच सोडणारे आणि मुलांना शिक्षण सोडायला लावणारी खुप उदाहरणे पाहिली. आम्ही स्वता: चुलत मावस मिळून २३ भाउबहिणी आहोत त्यातले फक्त ५ उच्चशिक्षित/शिक्षित आहेत, बाकि सगळ्यांनी असच नववी, दहावी, बारावी मधे शाळा सोडल्या ते असेच छोट्या मोठ्या नोकर्‍या करुन पोट भरतात. त्यांचे प्रॉब्लेम्स मी खूप जवळून पाहतो आहे. त्यामुळे कोणी शाळा सोडायचं म्हणलं कि मलाच कसे तरी होतं. मी दहावी ला असताना माझ्या सोबत श्रीकांत नावाचा मुलगा होता. दहावी ला इंग्रजी मधे नापास झाला. वडिल गॅरेज वर गाड्या पॉलिश करायचे, तेच खूळ त्याच्या पण डोक्यात शिरलं. मी त्याला दहावीला परत बसायला लावलं. सहावेळा पेपर दिल्यावर पास झाला. नतंर बारावी पण बाहेरुन दिली. BA केलं. आता बरं चाललं आहे. एका गॅरेज वर सुपर्वायसर आहे. शिक्षणाने पैसा जास्त नाही दिला तरी मान तर मिळाला. आणि महत्वाचे म्हणजे त्याला शिक्षणाचे महत्व कळल्यामुळे तो त्याच्या मुलांच्या शिक्षणा बाबत खूप जागरुक आहे. हेच् जर न शिकता गाड्या पॉलिश करत असता तर कुठे पर्यंत पोचला असता?

माझी सगळ्यांनाच विनंती आहे कि प्लीज कोणालाही कधिही शिक्षण सोडायचा सल्ला देउ नका. अहो दहावी नंतर असे कितीसे वर्षे शिकायचे असते पदवी साठी ५ वर्षे. १५ वर्षे शिक्षणासाठी जी धड्पड केली कष्ट केले ते सगळे वाया?

आणि शिक्षणाचा खर्च इतका काही नाही. मी मला आवड आहे म्हणून ६ वर्षापुर्वी अर्थशास्त्रामधे पदवी (बहिस्थ, पुणे विद्यापीठ) केली तेव्हा ओपन कॅटॅगरी साठी ६५० रुपये फि होती. पुस्तके ४०० ते ५०० रुपये. आपण हजार रुपये नाही घलवू शकत आणि ते पण वर्षाला? क्लासेस वगैरे लावायला लागणार नाहीत असेच विषय शक्यतो निवडायच्रे.... नंतर MA, MSW, PGDBM असे किती तरी विषय असतात जिथे पास व्ह्यायला जास्त काही मेहनत लागत नाहि.

पैशाची किंमत कळावी, व्यवहार ज्ञान वाढावे म्हणून अर्धवेळ नोकर्‍या ठिक आहेत. पण शिक्षण कोणत्याही परिस्थिती मधे सोडू नये. कमीत कमी एक तरी पदवी, व्यावसायिक शिक्षण पाहिजेच. उद्या जर व्यवसायासाठी कर्ज पाहिजे असेल तर बँक दहावी नापासाला कर्ज देईल कि पदवी किंवा व्यावसायिक शिक्षण असलेल्या व्यक्तिला?

एकदा नापास झाले पुन्हा बसावे, एका विषयात/ साईड मधे गोडी नसेल तर ती बदलावी दुसरी घ्यावी, जे आवडते ते शिक्षण घ्यावे पण काहीही करुन, कष्ट करुन आयुष्यातली हि ५ ते ६ वर्षे शिक्षण घ्यावेच. कारण शिक्षणाचा शिक्का फार महत्वाचा आहे.

प्राजक्ता_शिरीन, रात्रशाळेत तो जाऊ शकेल का? दिवसभरात अर्ध/पूर्णवेळ नोकरी किंवा त्याच्या आवडीचे काम आणि सायंकाळी शाळा करू शकत असेल तर सरस्वती मंदिरात तो प्रवेश घेऊ शकेल का?
त्यांचे सायंकालीन कॉलेजही आहे. http://smnightcollege.org/

तसेच त्याला कोणत्या विषयात रुची आहे? कोणत्या विषयात त्याचे मन रमते? त्याला वाहन-दुरुस्ती आवडते की मोबाईल / उपकरणांची दुरुस्ती आवडते की आणखी कोणते काम आवडते? त्याचा कल बघून व्होकेशनल कोर्स निवडला तरच तो पुढे शिकेल. बहि:स्थ किंवा रात्रशाळेत शिकला तर छोटे-मोठे कामही सोबत करू शकेल.