जमीन जुमला

रियल ईस्टेट

पिंपळे सौदागर इथे फ्लॅट

Submitted by पेरु on 5 February, 2024 - 11:58

मी पिंपळे सौदागर इथे॑ फ्लॅट बघते आहे.क्२बिचके. कोणता एरिआ बघावा, कोणता नको. रिसेल आनि नवे दोन्ही बघतोय. ९०० च्या आसपास एरिआ. साइ पॅरेदाइज आनि शिवम या कशा आहेत सोसायट्या?

गुंठेवारी

Submitted by कायदेभान on 30 December, 2020 - 04:58

आपल्याकडे जमिनीचे व्यवहार करायचे म्हटलं की अनेक कायदे व तरतुदी माहित असाव्या लागतात. वेळोवेळी त्या त्या संदर्भाने अनेक कायदे येत जात असतात व लोकांचा गोंधळ उडवून देतात. जमिनीच्या संदर्भाने असलेले ढिगभर कायदे सामन्य माणसासाठी ख-या अर्थाने डोकेदुखी ठरतात. वरुन थोडेसे पैसे वाचवायच्या नादात लोकं चांगला वकिल न करता ऐविक माहितीवर व्यवहार करतात व अपु-या माहितीनिशी नको तिथे व्यवहार करुन बसतात. नंतर पैसे अडकले म्हणून बोंब सुरु असते. अशाच अनेक कायद्या पैकी भंबेरी उडविणारा आजून एक कायदा म्हणजे महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१.

जमिनीची ए.बी.सी.डी.

Submitted by कायदेभान on 25 December, 2020 - 05:52

तसं जमीन सगळ्य़ांकडेच असते(म्हणजे असायची) परंतू जमिनीच्या हक्कांबद्दल अधिकांश लोकांना माहिती अथवा कायदेशीर ज्ञान नसतं. मग या लोकांना कोणीही काहिही स्टोरी सांगतं व त्यांना ते खरं वाटू लागतं, किंवा प्रचंड गोंधळ उडतो. त्यामागे कारण एकच, तुम्हाला जमिनी बद्दल मुलभूत माहिती नसते. मी आज ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो.

जमीनिचा मालक कोण?

मृत्युदाखला कसा मिळवावा?

Submitted by अन्नपूर्णा on 8 September, 2020 - 07:30

वडिलोपार्जित जमिनीचा वारस तपास करण्यासाठी, एखाद्या मयत नातेवाईकाचा मृत्युदाखला हवा असेल तर तो Online मिळवता येतो का? येत असल्यास त्यासाठी प्रक्रिया काय आहे ? त्यांच्या मृत्यूची नोंद जाणून घेता येईल का? कृपया जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

घर पाडायचेय सल्ला हवाय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 September, 2019 - 02:40

मुंबई ही ज्या सात बेटांची बनली होती. त्यातील एक बेट अर्धेअधिक माझ्या खापरपणजोबांचे होते. असे आमचे वडिलधारी सांगतात. खरे खोटे ठाऊक नाही. आजची पिढी जशी फारसे डोके न लावता व्हॉटसप मेसेजवर विश्वास ठेवते. तसे थोरामोठ्यांनी सांगितलेल्यावर विश्वास ठेवा. असे आमच्या घरचे संस्कार होते. तर ते एक असो. पुढे भारत स्वतंत्र झाला. संस्थाने विलीन झाली. त्यात आमचीही जायदाद गेली. जे थोडंथोडकं उरले ते पुढच्या पिढीत दहा भावंडांमध्ये वाटले गेले. जे माझ्या आजोबांच्या वाट्याला आले ते पुन्हा आठ भावंडांमध्ये वाटले गेले. तेव्हा ही कॅलेंडर छपाई नॉर्मल समजली जायची.

शब्दखुणा: 

आकांत

Submitted by स्वप्नील रसाळ on 22 December, 2018 - 01:10

दुष्काळाने हिरावला बाप
आणि आसवांचा बांध फुटला,
पण सावरला संसार माउलीने,
जेव्हा तान्हा पोरका झाला

का टाकले रे विठ्ठला,
असे दुर्भाग्य तिच्या माथी,
ना वारी चुकविली तिने कधी,
केला अट्टाहास तुझ्यासाठी

रमली भक्तीत तुझ्या ती,
आंधळा विश्वास ठेवला,
जपला फाटका संसारही पण
धनी तू चोरून नेला,

धगधगत्या उन्हात तिच्या,
डोईचा आधार हरपला,
जशी साथ सोडली सावलीने,
जेव्हा नभी सूर्य आला

घर खरेदी

Submitted by रमेश रावल on 11 August, 2018 - 01:59

घर खरेदी करताना काय पहावे,सरकारी कागदपत्रे,फसवणुकीचे प्रकार,बैंक लोन ,एजेंट करावा का इत्यादि माहिती हवी आहे.

शब्दखुणा: 

कायदा

Submitted by ARUN BAJIRAO JADHAV on 27 May, 2018 - 11:02

माझ्या वडीलांनी १९८९ मध्ये वडीलोपार्जित १.२५ आर.जमीन विकली आहे.त्या वेळी मी १९ वर्षाचा होतो.माझा भाउ २५ वर्षाचा होता.दोन बहीनींचे लग्न झाले होते.जमीन विकताना अम्हा भावंडांना व आईला या बाबत कल्पना नव्हती.आता ती जमीण अम्हास कायद्याने परत घता येईल का?सर कृपया मार्गदर्शन करावे.

भारतातील फ्लॅट चा पार्किंग लॉट भाड्याने देण्याबद्द्ल माहिती हवी आहे.

Submitted by sneha1 on 4 September, 2017 - 01:09

नमस्कार !
मला थोडी माहिती हवी आहे. आमचा पुण्यामधे बावधनला फ्लॅट आहे, सध्या तिथे कोणी राहत नाही. तिथे राहणार्‍या शेजार्‍यांनी आमचा पार्किंग लॉट भाड्याने मागितला आहे. असे करणे योग्य आहे का? असल्यास किती भाडे मागावे? ह्यामधून पुढे काही अडचणी येऊ शकतात का?
धन्यवाद!

पंख पसरून उडणारी डुकरे

Submitted by उडता डुक्कर on 1 August, 2017 - 08:30

पंख पसरून उडणारी डुकरे

तू माझे काय झाले याची पर्वा केली नाहीस
आणि मी हि तुझी
कंटाळा आणि वेदनांशी सामना करीत आपण चाललो आहोत वेड्यावाकड्या मार्गावर
कधीतरी पावसाकढे बघत
कोणत्या नालायकाला दोष दयावा याचा विचार करीत
आणि बघत ती पंख पसरून उडणारी डुकरे

-उडता डुक्कर

(रूपांतरित / आधारित / प्रचोरीत)

Pages

Subscribe to RSS - जमीन जुमला