घर विकत घेणे - वाकड, पुणे - कल्पतरु हॉर्मोनी (३ बीएचके)

Submitted by राजू७६ on 4 April, 2014 - 04:48

मी वा़कड, पुण्यात एक/ दोन महिन्यात घर विकत घ्यायचा विचार करत आहे... सध्या नेटवर आणि फोनकरुन एक नवीन सोसायटी पसंद पडली आहे,

wakad.jpg

तर ही जागा मी गुगल मॅप्सवरुन बघितली पण हे २/३ वर्षापूर्वीची वाटते... तर मला माबो - पुणेकरांकडून खाली माहिती पाहिजे.

१. पाणीपुरवठा - पिंचिमपाकडून होतो का?
२. सार्वजनिक बस सर्व्हीस आहे का?
३. चांगल्या शाळा/ लहान मुलांचे डॉक्ट्रर/ हॉस्पीटल आहे का?
४. रात्री १२ नंतर फिरु शकतो का?
५. आजुबाजूला दुकाने/ मॉल्स/ बॅक आहेत क?

अजून पुढे त्या बिल्डरचा अजून एक प्रोजेक्ट्स आहे, कल्पतरु स्प्लेडंर .. तिकडे २० लाख अजून कमी आहे... तर ती जागा कशी आहे?

मी एक महिना अजून रिर्सच करुन ३ प्रोजेक्ट्स शोधणार आहे आणि नंतर पुण्यात येऊन त्याच्यातल्या एक घेणार आहे... अजून तुम्हाला रेडी पझेशन किंवा ६ महिन्यात रेडी होणारा वाकडमध्ये चांगला प्रोजेक्ट माहीती असेल तर जरुर सांगा...

बजेट - ८० ते ११० लाख - ३ बीएचके वाकड

धन्यवाद!

अवांतर - अशीच माहिती कोणाला मुंबई/ नवी मुंबईविषयी माहिती असेल तर मला विचारा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

८० लाखाचा निर्णय तुम्ही नेट वर वाचुन घेत आहात हे वाचुन धन्य वाटले.

त्यापेक्षा एक साईट विझिट करुन या.

रात्री बारा नंतर भारतात कुठेच फिरू नये.

ईतकं बजेट असेल तर पिंची मधल्या ब्ल्यु रिज ला का भेट देत नाही. परांजपें चा प्रोजेक्ट आहे. नेट्वर चेक करा. ३बीएच्के १.२० च्या आसपास जाईल.

पाणीपुरवठा - पिंचिमपाकडून होतो का?
मला तरी हो असे सांगितले होते.

२. सार्वजनिक बस सर्व्हीस आहे का?
हो आहे. मुख्य रस्त्याच्या जवळ आहे एकदम, त्यामुळे पायी स्टॉपवर लगेच जाऊ शकता.

३. चांगल्या शाळा/ लहान मुलांचे डॉक्ट्रर/ हॉस्पीटल आहे का?
हो. खूप चांगले हॉस्पीटल आजूबाजूला आहेत. अनेक चांगल्या शाळादेखील.

५. आजुबाजूला दुकाने/ मॉल्स/ बॅक आहेत क?
हो भरपूर दुकाने आहेत. मॉल नाही. ह्या भागात नविन मॉल आता पिंपळे सौदागरला येतोय, अन्यथा मग औंधचा एक नविन मॉल सुरू होतोय, कन्स्ट्रक्शन दोन्हीचे चालू आहे. सध्या असलेला जवळचा मॉल म्हणजे शिवाजीनगरचे पुणे सेंट्रल.

मलाही आवडला होता हा प्रोजेक्ट, घराचे ले आउट ही चांगले आहे. पण किमत खूप जास्त वाटली होती. तेंव्हा ६८ लाख, म्हणून सोडला.

११० लाखात आजच्या मार्केट मध्ये अनेक पर्याय मिळतील, उदा बालेवाडीचा कुठलातरी अ‍ॅव्हेन्यू. अर्थात ही जागा चांगलीच आहे.

भेट देऊन मग निर्णय घ्या.

धन्यवाद मित्रांनो!

प्रसाद - होय.. आता लिस्ट बनवत आहे. मग लिस्टेड प्रोजेक्ट्सना भेट देऊन त्यामधून एक प्रोजेक्ट निवडणार.
स्वप्नांची राणी - ब्ल्युरिजला २५+ माळ्याचे टॉवर आहे. गोल्फ मैदान प्रॉयव्हेट मेंबरशिप आहे. म्हणून नको.
केदार - हिंजवडीपासून जवळ आणि चांगल्या निवासी परिसरात जागा शोधत आहे.. म्हणून वाकडला प्राधान्य.

>>स्वप्नांची राणी - ब्ल्युरिजला २५+ माळ्याचे टॉवर आहे. गोल्फ मैदान प्रॉयव्हेट मेंबरशिप आहे. म्हणून नको.
?? Uhoh

Our carpet area conversion becomes less in the name of open space. We are paying twice for same space once while purchasing flat and later in the name of private membership. Though its a part of project owner cant enjoy amenities as a part of maintenance. Private membership means open to outsiders too. If they are prividing that and marina as a part of amenities covered in monthly maintenance then its good.

I was talking about blue ridge earlier. Megapolis is one more project in hinjewadi.

मेगापोलीसला चेक करा. तिथे ओळखीच्या बर्‍याच जणांनी जागा घेतल्या आहेत. हिंजवडी फेज ३ मधे आहे. सद्ध्या आसपास दुकाने वगैरे काहीही नाही परंतु होईल लवकरच. भाव चांगला मिळू शकेल आत्ता कदाचित.

In Bangalore, way better amenities are there compared to pune complexes. >>> +१०० हे गेली कितीतरी वर्षे बघतेय, पुण्यात नुसत्याच किंमती जास्त. निदान बंगलोर मधे किंमत वसूल केली तर तेवढ्या सोयी पण मिळतात. कंस्ट्रक्शन क्वालिटी, फ्लॅट चा साईज, मोकळ्या जागा, सगळ्याच बाबतीत बंगलोरच्या स्कीम्स जास्त चांगल्या वाटल्या.

१०० लाख आणि बस सर्विस हे गणित समजले नाही. वेळ मिळाला तर लिहा, माझ्याही कामात पडेल.
शोधासाठी शुभेच्छा.

स्वप्नान्ची राणी परान्जपेन्ची बाकी कन्स्ट्रक्शन्स कशी आहेत माहीत नाही, पण कोथरुड आणी कर्वे नगरातली बघीतलीत. अक्षरशः खुराडी आहेत. हॉलची बाल्कनी ( जी कागदावर दाखवतात) आत घेऊन हॉल मोठा असल्याचा भास निर्माण करणे. ( जे सगळेच बिल्डर्स करतात, अगदी हक्काने).

किचन तर काय गेस्ट रुम सारखेच छोटे असते. बेडरुम बेकारच. असे निदान माझे तरी वैयक्तीक मत, कारण माझे नातेवाईक तिथेच आहेत. त्यान्ची घरे पाहिलीत, त्यामानने इतर बिल्डर्स ठीक.

राजू तुम्ही स्वतच एकदा खरच जाऊन या. पैसा आहे म्हणून वाटेल तो दिखाऊ प्रोजेक्ट बघु नका. जवळ काय आहे ते महत्वाचे.

:

माझ्या मित्राने वाकडमध्येच नंदन इन्स्पेरा मध्ये घर घेतले आहे. कल्पतरुच्या जवळच (दत्त मंदिराच्या पुढे) आहे.
तिथे पिंचिचा पाणीपुरवठा होतो.

हा भाग तसा हायफाय नाही. मॉल्स नसले तरीही किराणा मालाची दुकाने, भाजीवाले इ. भरपुर आहेत.

हिंजेवाडीसाठी मेन रोडवरुन बसेस आहेत. दत्त मंदिराहुन फेज २ साठी बस आहे.

शाळेच्या बाबतीत माहिती नाही. पण हॉस्पीटल (पोलारिस हॉस्पीटल) चांगले आहे.

रात्री ११-१२ वाजता फिरण्यास काही धोका नसावा. मी तिथे महिनाभर होतो, काही वावगे वाटले नाही.

तुमचे बजेट दणकट आहे. बराच रीसर्च करा आणि मग ठरवा.
आजच टाइम्स प्रॉपर्टी मधे जाहिरात वाचली ३ बी एच के औंध ला १.२ करोड.. नंदन बिल्डर्स चा प्रोजेक्ट आहे.
औंध, बाणेर, बालेवाडी, हिंजवडी ब्लु रिज हे वाकडला चांगले पर्याय आहेत. ऑनलाईन पाहण्यापेक्षा एक दोन वीकेंडस गाडी घेउन या भागांमधे भटका आणि स्वतः पहा.
epaper.timesofindia.com - times property-pune supplement
www.magicbricks.com
www.makaan.com
www.99acres.com

आणखी एक पर्याय म्हणजे एखाद्या इस्टेट एजंटला गाठा. काहीवेळा बिल्डर्स त्यांच्या थ्रु चांगली डील्स देतात.

शुभेच्छा.

रश्मी,

मी घर घेताना परांजपेंच्या २ स्किम्स पाहिल्या होत्या. भुगाव येथिल फोरेस्ट ट्रेल्स आणि ब्ल्यु रिज. फोरेस्ट त्रेल्स ची घरं कन्जस्टेड वाटली. पण ब्ल्यु रि़ज छान आहे. त्या अपार्ट्मेंट्स च स्पेसिंग, जागेचा वापर, वेन्टीलेशन, प्रशस्त बाल्कन्या मला खुप आवडल.

>>> Our carpet area conversion becomes less in the name of open space. We are paying twice for same space once while purchasing flat >>>

राजसी, हे सगळेच बिल्डर्स करतात. ब्ल्यु रिज ची गोल्फ क्लब मेंबरशीप ऑप्शनल आहे.

अरे मग हरकत नाहीये. धन्यवाद स्वप्नान्ची राणी.:स्मित: मी बाकीच्याना पण सजेस्ट करेन. कारण खुद्द पुण्यात अगदी कोम्बल्यासारखे दिसते ते.

Swapnanchi rani, point is hence the owner should be allowed access to such amenities free or as a part of maintenance. Because they have already paid it once in the name of saleable area. Entry or membership should not be chargeable to the flat owners of the complex. They can collect it from outsiders. But it was just a perspective, I have nothing against paranjpe bldgers.

राजसी कृपया मराठीत (शक्यतो देवनागरीत) लिहावे अशी विनंती.

पुण्यात एखाद्या अपकमिन्ग एरियात दुकानाचा गाळा किती पर्यंत मिळू शकेल ?
१० ते २० लाखाच्या दरम्यान मिळेल का ? आणि पुढे भाव किती वाढू शकेल ?
गुंतवणूकीसाठीचा एक विचार. (दुकान चालू करायचे नाही) Happy

३. चांगल्या शाळा/ लहान मुलांचे डॉक्ट्रर/ हॉस्पीटल आहे का?

आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पोलराईज इ..
लहान मुलांसाठी डॉ. किणीकर आणि इतरही बरेच डॉ. पिंपरी चिंचवड मधे आहेत.
अगदी लहान मुलांसाठी पंपकीन पॅच, थोड्या मोठ्यांसाठी विबग्योर ए.

४. रात्री १२ नंतर फिरु शकतो का,

पुणेरी उत्तर डीपेण्ड्स...
नॉर्मल उत्तर : स्वतःची गाडी असल्यास सहसा प्रॉब्लेम येत नाही. रात्री रिक्षा वगैरे सहसा सोयीच्या नाहीत.

५. आजुबाजूला दुकाने/ मॉल्स/ बॅक आहेत क?

डीमार्ट रिलायन्स इ. सगळे हिंजवडीला. मंडई चिंचवडला आहे, स्प्लेंडरपासून साधारण १०-१५ मिनिटांवर .
हॉटेलं भरपूर आहेत. बँकाही आहेत. पोस्ट ऑफिस पण आहे. पोलीस स्टेशन पण आहे Happy
टीप : पोलीस स्टेशन सगळ्यात जवळ आहे.

अजून पुढे त्या बिल्डरचा अजून एक प्रोजेक्ट्स आहे, कल्पतरु स्प्लेडंर .. तिकडे २० लाख अजून कमी आहे... तर ती जागा कशी आहे?

हार्मनी हायवेला लागून आहे. हिंजवडीला जाणार्‍या ऑफिसच्या बसेस हार्मनी जवळूनच जातात.
स्प्लेंडर जरा आतल्या बाजूला आहे. पण तितकेही आत नाही. २० लाख मोठी रक्कम आहे! Happy

स्रोत - एक वर्षापूर्वी स्वतः दत्त मंदिराजवळ रहात होते.

अवांतर - अशीच माहिती कोणाला मुंबई/ नवी मुंबईविषयी माहिती असेल तर मला विचारा>>>> ठाण्यात सांगु शकाल का?

राजसी, अग तु लिहिलेलं खुप नेमक आहे ग. आणि याच मुद्द्यावरुन ब्ल्यु रिज वाल्यांचा एक गृप पण आहे. हि अक्षरशः लूट आहे.

>> I have nothing against paranjpe bldgers. >>> अरे मी पण फक्त एक ग्राहक आहे ग, त्यांची कोणीच नाही.

धन्यवाद सर्वाचे! एकदा पुण्याला भेट देईन आणी अजून काही प्रश्न असेल तर इकडे विचारेल.

विजय - विशेष असं नाही.. सार्वजनिक बससेवा असेल तर परिसर बर्यापैकी वस्तीचा असतो.. म्हणून विचारलं. अशा ठिकाणी कामवाल्या बायापण लवकर मिळतात..

अंजली - गुंतवणूकसाठी नवी मुंबई - पनवेल बेस्ट
ठाण्यामध्ये राहण्यासाठी - माजिवाडा, ठाणे -लोधा/ रुस्त्मजी/ रुणवाल प्रोजेक्ट्स
आणि गुंतवणूकसाठी - ठाण्यात पूर्वकडे किंवा पुढे कळवाच्या अलिकडे चांगले लोकल प्रोजेक्ट्स आहे..

ह्य बजेट मध्ये निगडी प्राधिकरण मध्ये एखादा जुना बन्गलो अथवा रो हाउस मिळु शकेल. (४-६ महिन्यामगे एका ओळखीच्यांनी त्यांचे रो हाउस ७५ लाखाला विकले. नवीन बन्गलो १२० लाखाला डील झालेले.)
फक्त शोधायला एकट्याला त्रास होइल. चांगला एजन्त गाठलात तर काम होइल.
शिवाय ओलक्क्ष, क्विकर वै वर देखील लोकं अ‍ॅड टाकतील.तिकडेही लक्ष द्या.

धन्यवाद झकासराव... तुम्ही जे म्हटलं आहे ते Exceptional आहे.. मी नेटवर चेक केले तर दहा वर्षे जुने रो हाऊस (महिन्द्रा द वुड्स) १६० ते २००लाख आहेत... नवीन रो हाऊस(२५०ते ४०० लाख) जागेच्या क्षेत्रफळानुसार आहेत..

प्लॉट घेउन बान्धायची तयारी आहे का ? लई पैका वाचेल. मागे डिऐस्के च्या स्किम मधे रो हाउस प्लॉटची किंमत (~२५०० sqft) ६० लाखाच्या आसपास होती. आवडीप्रमाणे घर बान्धा (~ ६०- ७० लाख) . १२०-१४० मधे मनासारखा प्रशस्त घर होइल.

काल वाकड/ ताथवडे या परिसरात फिरलो... रस्ते चांगले वाटले.. कल्पतरु हॉर्मोनीने अजून दोनशे रुपये प्रत्येक स्क्वे. फूटला वाढवले... आता हा सुखवानी सेपिया, ताथवडे प्रोजेक्ट बघितला, पण जून २०१५ला हातात देणार.. ८६ ते ९० लाख होतील

Pages