ताम्हिणी घाट

इंडिपेंडन्स पॉईंट via ताम्हिणी घाट - भन्नाट रोड ट्रिप

Submitted by राहुल सलगर on 19 November, 2017 - 03:14

इंडिपेंडन्स पॉईंट via ताम्हिणी घाट - भन्नाट रोड ट्रिप
.
.
.
यंदा पुण्यात पावसाची हजेरी बरीच लांबली होती पण पावसात भिजण्याचा मोह काही आवरत नव्हता . ग्रुप मध्ये चर्चा सत्र सुरु झाला . पाऊस कुठे असेल यावर जणू डिबेट च सुरु झाले . थोडी चर्चा झाली असता स्पॉट ठरला "ताम्हिणी घाट" . तिथे पाऊस नक्कीच असेल असे सगळ्यांना वाटत होते आणि तसेच झाले पाऊस तर सोडा वाऱ्यासारकीं पावसाची लाट च तेथे होती. नेहमी प्रमाणे सकाळी लवकर जायचे ठरले आणि नेहमी प्रमाणे १ तास उशीर झाला तेही माझ्या मुळेच :p
.

विषय: 

कोकण सायकल राईड - पुणे ते दापोली, मुरूड व हर्णे.

Submitted by मनोज. on 30 October, 2014 - 11:50

आपटलेल्या कोकण राईडनंतर आमच्या छोट्यामोठ्या एकदिवसीय राईड्स सुरू होत्या. त्यादरम्यानच्या चर्चांमध्ये गांधीजयंती आणि दसरा असे शनिवार रविवारला जोडून येत आहे आणि त्यामुळे चार दिवसांचा भलामोठा वीकांत मिळत आहे याचीही चर्चा सुरू होती.

अलिबाग, गोवा, गणपतीपुळे ही ठिकाणे ठरत होती आणि चर्चांमध्येच काही ना काही कारणाने कटाप होत होती. सप्टेंबर महिन्यात या विषयी गंभीरपणे चर्चा सुरू झाल्यानंतर अलिबाग किंवा दापोली च्या आजुबाजूला (पण कोकणातच्च.!!) असा ठराव झाला. यथावकाश अलिबागही मागे पडले व दापोली भाग नक्की झाला.

ताम्हिणीघाटातून दुर्गदुर्गेश्वर रायगड

Submitted by ferfatka on 17 August, 2013 - 06:08

१०/८/२०१३

बरेच दिवसांपासून कुठे तरी लांब हिंडण्याचा मनोदय होता. पाऊस उघडला होता. त्यामुळे लांब कुठेतरी हिंडून येण्याचे पक्के केले. चिपळुणला आमचे कुलदैवत श्री. करंजेश्वरी आहे. तिचे दरवर्षी दर्शन घेण्यासाठी आम्ही नवरात्रात जातो. मागील वर्षी काही कारणामुळे राहून गेले होते. यावर्षी लवकरच दर्शन घेण्यासाठी निघालो. ताम्हिणी घाटातून रायगड, चिपळूण, श्री. परशुराम मंदिर, विसावा पाइंट व नंतर संगमेश्वर येथील श्री. कर्णेश्वर मंदिर व परत येताना कुंभार्ली घाटातून परत घरी असा दोन दिवसांचा प्रवास केला. त्या विषयी....

Subscribe to RSS - ताम्हिणी घाट