फ्लॅट

पुणे/ नाशीक येथे २ बी एच के फ्लॅट विकत घेणे आहे. माहिती द्या.

Submitted by अश्विनीमामी on 29 January, 2024 - 02:40

तर मं डळी पुणे किंवा नाशीक येथे २ बीएच के २ रेस्ट रूम वाला फ्लॅट विकत घेणे आहे. जाणकार माहिती द्या.
१) कोणता एरिआ चांगला? मुंबई हून कॅब ने आरामात येता यावे. व मला ट्रीटमेंट ला ह्या घरातून मुंबईस जावे लागेल. ते जमावे.
२) काय कागद पत्रे जमवावी?
३) होम लोन कुठून घेउ?
४) माझी गरज ७५० - १००० स्क्वे फूट आहे. अगदीच अंधेरी स्टाइल बारका नाका एव्ढा फ्लॅट नको.
५) इन्स्टा वर फार जहिराती येतात पण त्या खर्‍या असतात का?
६) अजून काय विचारावे बिल्डर ला/ री सेलर ला?

मुंबईत सायन प्रतिक्षा नगर येथे म्हाडाचा रिसेल फ्लॅट घेणे

Submitted by दत्तात्रय साळुंके on 13 April, 2018 - 18:14

मुंबईत सायन प्रतिक्षा नगर येथे ( महाराष्ट्र हौसिंग ॲन्ड एरिया डेव्हलपमेंट अथोरिटी ) रिसेल फ्लॅट विकत घेणे आहे . हे फ्लॅट दलाला मार्फत विक्री होत आहेत . बिल्डिंग बांधून ७-८ वर्ष झाली . म्हाडाच्या संकेतस्थळावर वाचले ५ वर्ष लॉकींग पिरिअड असतो . त्यानंतर मूळ वाटपदार तो विकू शकतो. अधिक माहिती हवी आहे .

विषय: 

पुण्यात फ्लॅटमध्ये गुंतवणुक फायदेशीर ठरेल का ?

Submitted by श्री on 5 April, 2014 - 10:00

पुण्यात फ्लॅटसचे रेट्स बर्‍यापैकी वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत पुण्यात ८०-९० लाखाला फ्लॅट घेऊन तो भाड्याने देणे गुंतवणुकीच्या दृष्टीने कितपत किफायतशीर ठरेल ?
आज फिक्स्ड डिपॉझिटला चांगला रेट आहे पण तो काही काळाने नक्कीच कमी होईल. अगदी ६ टक्के इंटरेस्ट रेटने पुढील १० वर्षांत होणारी फिक्स्ड डिपॉझीटवरील बचत ही फ्लॅटच्या १० वर्षांत वाढलेल्या किमंतीपेक्षा कमी असु शकते.
तुम्हाला काय वाटत ? पुण्यात फ्लॅटमध्ये गुंतवणुक फायदेशीर ठरेल का ? आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने कुठल्या एरियात फ्लॅट घेणं योग्य ठरेल ?

रिसेल फ्लॅट विकत घेण्याबद्दल मार्गदर्शन/सल्ला

Submitted by रंगासेठ on 13 January, 2012 - 09:27

नमस्कार

मी पुण्यात रिसेल फ्लॅट विकत घ्यायचं ठरवलय. या संदर्भात आधिक माहिती हवी आहे. माझं बजेट ठरलय आणि त्यानुसार बर्‍यापैकी उपलब्धता आहे. अर्थात मी ही माहिती magicbricks.com, makaan.com, 99acres.com या संकेतस्थळाच्या संदर्भाने सांगतोय. दुसरं म्हणजे ठिकाण/लोकेशन पण काही शॉर्टलिस्ट केली आहेत. त्यामुळे त्याबाबतीतही जास्त शंका नाहीत.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फ्लॅट