‘फूलघर’ ही झाडांनी वेढलेली एक सुंदर जागा. संध्याकाळच्या वेळी तिथं बसून सगळेजण चहा पीत आहेत निवांत. एक तेजस्वी आवाज विचारतो, “मनुष्याला ज्या पद्धतीने जगावसं वाटतं, त्या पद्धतीने तो जगू शकेल? विशेषकरून स्त्री? ” तो प्रश्न असतो वसुधाचा.
अॅना, आलोपा, विनोद, मित्रा . . त्यांच मत मांडतात.
“करू शकेल. पण नंतर तो दु: खी होईल. स्त्री असेल तर विशेषत्वाने.” एक स्पष्ट उत्तर येतं.
“स्त्रीसुखाची तुमची व्याख्या काय?” वसुधाचा त्यावर आणखी एक धारदार प्रश्न.
सध्याच गणपती उत्सव झाला. साधरण श्रावण आला की सणांचा हंगाम सुरु होतो. पण सध्या प्रत्येक सणाचं मार्केटिंग झाल्या मुळे सण म्हणजे वैताग, ट्रॅफिक, गर्दी हेच डोक्यात.
साधी मंगळागौर सुध्धा प्रोफेशनल बायकांचा चमु बोलावुन " साजरी" केली जाते. त्यात मग मंगळागौर असलेली मुलगी बजुलाच रहाते, त्या बायकाच त्यांचे ठरलेले "इव्हेंट" करुन जेवुन निघुन जातात. तो "खेळ" व "मेळ" नसुन फक्त एक पर्फॉर्मन्स फक्त उरतो.
प्रिय माबोकरांनो..
खुप दिवस या विषयावर लिहायचे मनात होते.
आजकाल आपल्याकडे स्मोकिंगचे प्रमाण वाढत चालले आहे.
माझ्या आसपास कित्येक कॉलेजगोईंग आणि त्यापेक्षा मोठी मुलेमुली स्मोक अर्थात धुम्रपान करतांना दिसतात.
त्याचा फार त्रास होतो.. शारीरीक आणि मानसिक सुद्धा..
मानसिक त्रास असा की आपण कुठे चाललो आहोत.. रोज किमान एकदा तरी ह्या ना त्या मार्गाने "धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे - Tobacco Kills !!!" हा संदेश कानांवर आदळतोच. आणि तरी धुम्रपान करणे हा एक स्टेटस सिंबॉल बनु लागलेला आहे. पुढे मुले मोठी झाल्यावर त्यांना ह्या विळख्यात अडकण्यापासुन कसे रोखु शकु तेच कळत नाही.
''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्यात साठवून घेऊ लागलो.
"जामिनाचे पैसे कोण भरतय?" पोलिसांनी मला विचारले.
"मी", मी उत्तर दिले.
पोलिसांनी माझ्याकडे निरखून बघितले. " कोण लागतो हा तुमचा?" मला प्रश्न विचारला गेला.
"मित्र ", मी उत्तरलो.
" जरा समजावा तुमच्या मित्राला", पोलिस ऑफिसर म्हणाले.
मी पैसे भरले, सही केली आणि जग्या बाहेर यायची वाट बघू लागलो.
आखाजी- सासुरवाशीणींचा सण!
कधी कधी मी मराठी असल्याची लाज वाटते. अर्थात हे वाक्य केवळ "मराठी" हा शब्द बदलून अनेक बाबतीत वापरता येईल. तर मुळ मुद्दा मराठी असण्याचा. का ? आणी कधी वाटते बर लाज ? सुरेश भटांनी लिहिलेल्या
" लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी"
नमस्कार,
मागे काशीयात्रेबद्दल माहिती हवी आहे या नावाचा धागा टाकला होता. त्यावर आलेले प्रतिसाद,सुचना मनात घोळवत ८एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत काशीयात्रेला जाउन आलो. अलाहाबाद, विंध्याचल व शेवटी काशी असा प्रवास होता.
त्याचा थोडक्यात वृत्तांत असा.
यात्रेची तयारी नोव्हे.१२पासुनच सुरु होती. जाने.१३ मधे ट्रेन बुकींग केले. ज्ञानगंगा एक्स्प्रेस २४तासात अलाहाबादला पोचवते असं ऐकुन तीचं रिझर्वेशन केलं.
८ एप्रिल १३(सोमवार)
स्थळ: पुणे
गेली ती आज....मृत्यूला घट्ट कवटाळून कायमची निघून गेली ,तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुंदका आवरेना, पण शेवटी तीसुद्धा स्त्रीच तर आहे. बाहेर पडू पाहणारा हुंदका साडीच्या पदराच्या बोच्क्याखाली दाबून धरावा लागला. धावत जावून लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणनारे पाय अंगठ्याने जमीन कोरु लागले, पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही ते ओसंडून वाहत होते. कित्तेक असे अन्यायी बुक्क्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते मायच्या डोळ्यांनी कित्तेक साहिले देखील होते. पण सगळे सगळे पडद्या आडून.