गाव

गाव बोलावते

Submitted by दत्तात्रय साळुंके on 12 September, 2023 - 11:55

वर्षे कित्येक लोटली
या शहरात येऊन
गत काळाचे धागे
गेले गावात राहून

बंध रेशमी भक्कम
परी हळवे मुलायम
दिवसातून कितीदा
नेती गावात खेचून

शिळ घालीतं उनाड
पाखरू आज रानाला
वेडं बेभान झेपावं
नाही वेसन मनाला

गुरांसंगे झालो गुराखी
दरी डोंगरी भटकंती
निर्झरात न्हाता न्हाता
मोती सर्वांग सजवती

पिलो रानवारा रानचा
धुंदावत नाचलो मी
सळसळत्या पीकाचे
बोल हिरवे झालो मी

कुठे जमवली पोरं
खेळलो खेळ लगोर
भांडण केले घणघोर
परी वाटली चिंचा बोरं

शब्दखुणा: 

साद घालू लागले

Submitted by दत्तात्रय साळुंके on 16 June, 2023 - 07:32

साद घालू लागले ते गाव माझे
उमटले मातीत तेथे नाव माझे

पावले रक्ताळली वाटेत केव्हा
मांडले पून्हा तरी मी डाव माझे

लगडले टप्पोर मोती जोंधळ्याला
पेरले मातीत भक्तीभाव माझे

वाहती जखमा जुन्या पून्हा नव्याने
ओळखीच्या माणसांचे घाव माझे

सांडले तू गंध तेथे त्या फुलांचे
आजही घेतात येथे ठाव माझे

© दत्तात्रय साळुंके

वृत्त मंजुघोषा -
गण:- - र त म य- राधिका, ताराप, मानावा, यमाचा
एकाच शब्दात दोन ल एकापाठोपाठ = गा
जोडाक्षरा आधी लघु = गुरू जर लघु अक्षरांवर जोडाक्षराचा आघात होत असेल

शब्दखुणा: 

गाव

Submitted by Santosh zond on 18 August, 2020 - 09:25

गाव

वाट चालता गावाची
दिसे चिमणी-पाखरं
घास ईवलुशा तोडांशी
पिंला वाटे ती साखरं

झाड एक पिंपळाचे
फार दिसते शोभून
आज्या जन्मीच्या सालचे
आई सांगते महान

त्रुण फेडाया मोत्याचे
बैल पोळा एक सण
सात जन्माचा सोबती
जिवाहुणी त्याचे प्राण

झाडे फुले वृक्षवेली
माझ्या निसर्गाची शान
ऊन पावसात येई
ईंद्रधनुची कमान

गावी सह्याद्रीचे वारे
दर्‍या खोरर्‍यांनी वाहते
भुमी वीरांची ही थोर
महती जगास सांगते

शब्दखुणा: 

माझं गाव

Submitted by निरंजन कुलकर्णी on 24 November, 2019 - 01:16

माझं गाव ‘नागदेववाडी’. कोल्हापूर शहरातून एक रस्ता गगनबावड्याकडे जातो. त्याच रस्त्याला उजव्या बाजूला नागदेववाडी हे गाव आहे. कोल्हापूरच्या रंकाळा तलावापासून केवळ दोन मैल दूर. साधारण पाच वर्षांपूर्वीच आम्ही इथे राहायला आलो. सध्या मी व माझा भाऊ पुण्यात असतो पण माझे आई वडील गावातच राहतात. गावाचं नाव ‘नागदेववाडी’ कसं पडलं हे मलाही नाही सांगता येणार पण गावात पूर्वी खूप नाग असावेत असा अंदाज लावता येईल. गावात एक छोटं नागाचं मंदिर सुद्धा आहे.

परसा-कडे

Submitted by प्राचीन on 13 November, 2019 - 12:11

परसा - कडे (?)
परसदार या विषयावर ममोचा लेख वाचला आणि (या विषयी स्फुरण आलं असं कसं म्हणू ) वाटलं आपलीही एक आठवण सांगावी झालं.. 'अजुनही जागे आहे गोकुळ' या माझ्या मायबोलीवर असलेल्या लेखामध्ये (रिक्षा नाहीये हं, फक्त संदर्भ देतेय) माझ्या आजोळचं, पारपुंडचं वर्णन केलं आहे. तिथे माझ्या आजीच्या तोंडून 'परसाकडला' हा शब्दप्रयोग पहिल्यांदा ऐकला. आधी कळलं नव्हतं म्हणजे काय ते.
आमच्या घराचं परस आहे त्यात परसाकडची' बांधीव' सोय होती. त्यासंबंधी माझी ही एक गमतीदार आठवण. आत्ता 'गमतीदार' म्हणतेय पण तेव्हा 'मती' भांबावून 'दार' गाठावं लागलं होतं. शब्दच्छल पुरे आता आणि नेमका प्रसंग असा घडला..

शब्दखुणा: 

हरवलेला गाव

Submitted by @गजानन बाठे on 11 October, 2019 - 20:47

हरवलेला गाव
हरवल्या कुठे निंबा खालील मैफीली,
संसार उंबराने का थाटला असावा?

यार, मित्रांस तो परका झाला,
बंगल्यात कुठे घेत असेल विसावा.

महाकाय वड तो उघडा पडला,
पारंब्यानी दगा दिला तर नसावा?

रगडता फुले ही दर्पहीन ते अत्तर,
सुगंध त्यांनीही का विकला असावा.

बारमाही नदी का आटली असावी,
व्यवसाय तिचा ही फसला असावा.

पाखरं ही हरवली एकाएकी अशी,
हो, शहरात त्यांचाही फ्लॅट असावा.

अस्वस्थ गाव जो निद्रामय दिसतो,
शहराचा फाजिल डाव तर नसावा ?

©गजानन बाठे

शब्दखुणा: 

माझं गाव

Submitted by परत चक्रम माणूस on 19 July, 2019 - 06:04

माझं गाव .. माझं गाव एक छोटंसं खेडेगाव होतं माझ्या लहानपणी. ओढ्याच्या कडेला एका बाजूला वसलेलं. मोठे पटांगण. मोठमोठी साताठ वडाची झाडं उभी फेर धरून. जटा दाढी जणू जमिनीपर्यंत पोहोचलेले ऋषिमुनीच जणू. मोठं हनुमानाचं देऊळ, देवळाला छानसे जोते. त्यावर चुनेगच्चीचा मंडप. दिवस भर अनेक घडामोडी इथं घडत. ऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्यांपासून ते कळू लागलेली पोरं यांचा रमीचा डाव चाले. एका बाजूला आबा न्हाई आपली हजामतीची पेटी घेऊन कोपरा आवतून दुकान मांडून बसलेला. आबा न्हायाच्या हातात कितीबी रडक्या पोराचं डोकं सापडलं की डाव्या हाताने जबरदस्त पकड करीत उजव्या हाताने वस्तऱ्याने रक्त निघस्तवर तासून काढीत असे.

शब्दखुणा: 

अजुनि जागे आहे गोकुळ

Submitted by प्राचीन on 8 April, 2019 - 00:45

अजून जागे आहे गोकुळ
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल मागे टाकलं की पाच मिनिटांतच ओ.एन्.जी.सी दिसतं. त्याच्या कडेने गाढी नदी झोकात वळण घेताना दिसते.तिच्या कुशीत विसावलेलं हे पारपुंड गाव.. पळस्पे नाक्यावर वसलेलं. महामार्गाच्या उजवीकडे, नदीकिनार्‍याला समांतर अशी (पूर्वी कच्ची असलेली पायवाट) एक निमुळती वाट उतरत जाते. स्थानिक लोकांची छोटी घरं,कोंबड्या,बकर्‍या, क्वचित एखादी म्हैस, असं खास वातावरण या वाटेवर आपली सोबत करतं नि लगेचच उमगतं की गाव आलं !

शब्दखुणा: 

लाभार्थी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 9 November, 2017 - 00:44

लाभार्थी
त्यालाही माहीत नव्हतं
तिलाही माहीत नव्हतं
ते हसतात तेव्हा
चांदण सांडतं
कारण वर्षानुवर्षं
गावात कोण हासलचं नव्हतं
पण लाभार्थीच्या जाहीरातीनं किमया केली ....

टीव्ही आल्यावर तर एवढच
कळलं टीव्हीत दिसाया मॉप
कष्ट आन पैकं लागत्यात
...
मग असचं एक दिस क्वाण म्हणलं
गावाची एक डाकूमेंट्री काढायची
त्यात मंग समदा गाव जमलं
ठेवनितलीच जुनी कापडं
हासली चकाचक
पोळ्याला जुनी झूल बैलावर तशी
फोटुच्या मिसनीपुढ उभं गाव

गाव कात टाकतय

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 October, 2017 - 03:26

गाव कात टाकतय

खरं का खोटं पण
काय तरी घडतय
गाव कात टाकतय

ट्रॅक्टरच्या चकारीत
गोधुली शोधतय
गाव कात टाकतय

वसुबारसीलाही
चित्रातली गाय पुजतय
गाव कात टाकतय

मोटंवरचं गाणं
इंजिन धडधडतयं
गाव कात टाकतय

विहीर झाली पालथी
शेततळ पाणी झिरपतय
गाव कात टाकतय

मर्दानी कुस्त्या छबिने
सिनेमापुढं धापतय
गाव कात टाकतय

देवळं पडली वस
बार लई फुलारतय
गाव कात टाकतय

आरोग्य सेवेचं तीनतेरा
म्हातारं सैराट खोकतय
गाव कात टाकतयं

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गाव