आपले सण - बदलाची गरज

Submitted by मोहन की मीरा on 19 September, 2013 - 00:33

सध्याच गणपती उत्सव झाला. साधरण श्रावण आला की सणांचा हंगाम सुरु होतो. पण सध्या प्रत्येक सणाचं मार्केटिंग झाल्या मुळे सण म्हणजे वैताग, ट्रॅफिक, गर्दी हेच डोक्यात.

साधी मंगळागौर सुध्धा प्रोफेशनल बायकांचा चमु बोलावुन " साजरी" केली जाते. त्यात मग मंगळागौर असलेली मुलगी बजुलाच रहाते, त्या बायकाच त्यांचे ठरलेले "इव्हेंट" करुन जेवुन निघुन जातात. तो "खेळ" व "मेळ" नसुन फक्त एक पर्फॉर्मन्स फक्त उरतो.

तिच गत दहिहंडी आणि गणेश उत्सवा ची.... दहिहंडी तर काही लोकांनी अगदी "साता समुद्रा "पार नेली. किती तो गोंधळ, किती आरडा ओरडा... रस्त्यात अडवणूक.... भर रस्त्यात ठिय्या.... ठाण्यात तर सुप्रसिध्ध हंडी व हंडी कर्त्यांच्या मुजोरीला तोड नाही. सतत कलकल....

दहिहंडीच्या काळात असेच टि. व्ही. वर काहीतरी पहात होते. मुलगी मैत्रिणीलाफोन करत होती. मैत्रिण बहुदा घरात नव्हती. मग दुसर्‍या दिवशी तिने परत फोन केला. तेंव्हा कळले की ती मैत्रिण ठाण्यातल्या "त्या" सु(?) प्रसिद्ध हंडी जिथे बांधतात त्याच इमारती मधे रहाते. ज्या दिवशी हंडी असे त्या दिवशी ते सगळं कुटूंबं मुलुंडला त्यांच्या आजीकडे निघुन जातं..... का? कारण हादरे बसतिल असं संगित आणि भयानक आवाज, घाण, गर्दी. ह्या सोसायटीने कायदेशीर रित्या लढा देण्याचा प्रयत्न केला होता. पण आर्थातच तो विरुन गेला...

गणेशौत्सव हा ह्या सगळ्या गोंधळाचा राजा !!!! ११ दिवस उत आल्या प्रमाणे लोकं वावरतात. त्यात सिव्हिक सेंन्स नावाच्या गोष्टीचं भानच नाही. आमच्या एरियात ठाणे पालिकेची एक बस येते. गणपतीचा मंडप बस स्टॉप वरच बांधल्या मुळे ह्या कालावधीत ही बस आत येत नाही. ११ दिवस गणपती चे + मंडप बांधायला लागणारे पहिले २० दिवस+ मंडप काढायला लाग्णारे पुढले २०/२५ दिवस.... बरं गणपती मंडळचे सर्वेसर्वा माजीमहापौर..... मग बोलणार कोणाला......

आज योगेशने काढलेले लालबागच्या राजाचे फोटो पाहिले आणि एक कळ मनात उठली ( जिप्सी फोटो अप्रतिम आहेत रे!!!) . ह्या काळात दादर्/परळ्/लालबाग ह्या एरियात रहाणं म्हणजे शिक्षा आहे... ( लग्न होवुन जेंव्हा परळला गेले त्या वर्षी मजा वाटली नंतर मात्र घी देखा पण बडगा नही देखा अशी अवस्था झाली). माझं हे विधान अनेकांना पटणार नाही. पण हे खरं आहे. ही गणेशौत्सवाची गर्दी पाहिली की ३ वर्षां पुर्वी चा प्रसंग लख्ख आठवतो. आमचे मामा हिंदमाता जवळ रहातात. असेच उत्सवी दिवस. त्यांना घरात अस्वस्थ वाटु लागलं म्हणुन तातडीने त्यांना टॅक्सीने के.इ.एम. ला नेण्या साठी मामी निघाल्या. गर्दी अणि गोंगाटा मुळे हिंदमाता ते के.इ.एम. ह्या एरवी चालत १० मिनिटे लागणार्‍या अंतराला त्या दिवशी टॅक्सीने २५ मिनिटं लागली. आणि के.इ.एम ला मामांचं प्रेत पोहोचलं..... टॅक्सीतच ते ६१ वर्षांचे मामा वारले. बायकोच्या शेजारी!!!! त्या पुढचे हाल मी लिहित नाही.

एखाद्याचा जीव गमवावा लागणं ह्या पेक्षा सण साजरे करणं तेही जाहिर रित्या... गरजेचं आहे का. आपणच जर अश्या ठिकाणांना जाणं थांबवलं तर आपोआपच हे उपक्रम बंद पडतिल. हा गोंधळ, गडबड, आरोप, पैश्याची उधळण.... खरच गरज आहे का? आजच्या मंदीच्या काळात हे भान आपण नाही ठेवायचं तर कोणी? बाकी राजकारण आणि त्यातली माणसं ह्यांवर न बोलणंच बरं.....

मी स्वतः कधीच गर्दी मधे देवदर्शन करायला जात नाही. लोकांचं माहिती नाही पण आम्ही आमच्या कुटूंबा साठी अलिखित नियम बनवले आहेत.. सर्व संमतीने
१. जिथे कुठे गर्दी असेल अश्या ठिकाणी देव दर्शनाला न जाणे. उदा. सिद्धीविनायक, महालक्ष्मी, कोल्हापुर ची देवी, तुळजापुरची देवी ( आमची कुलस्वामिनी), हरिद्वार( आमचे खाजगी घाट तिकडे आहेत), तुरुपती, कोणताही सार्वजनिक गणपती जो रस्त्यात मंडप बांधुन बसवला आहे, रस्त्यांवरचा गरबा, कोणताही सार्वजनिक उत्सव. इ.इ.इ.

२. देवळात जायचेच असेल तर गावदेवी किंवा शांत अश्या एखाद्या मंदिरात जाणे.

३. आपले अध्यात्म आपल्या पुरते. आमच्या घरातल्या दिड दिवसाच्या गणपतीला साधारण ७० ते ८० माणसे येतात. त्या काळात आम्ही खुप खुश असतो. अगदी उत्सवाची मजा घेतो. मग उरलेले ४-५ दिवस रोज संध्याकाळी आम्ही खुप लोकांकडे जातो. खुप गंमत येते. ह्याकाळात या वर्षे दोन फार छान गाण्यांचे कार्येक्रम पदरी पडले. खुप मजा आली.

४. जिथे जिथे राजकिय पक्षांचा हस्तक्षेप आहे असे उपक्रम, उत्सव, स्पर्धा ( माझी मुलगी व्क्तृत्व आणि अभिनय स्पर्धां मधुन नेहेमेच भाग घेते), कार्येक्रम टाळणे.

५. शक्यतो जिकडे राजकारणी व्यक्ति आहेत अशा संस्थां ची कोणतीच कामे न करणं. ( मी स्वतः तीन चार समाजिक संस्थांचे ऑडिट विनामुल्य करते)

कदाचित माझे विचार तुम्हाला पटणार नहित. इकडे कोणा माणसावर टिका कींवा आरोप करायचे नहित. पण एकंदरच ह्या बाबतित काय विचार आहेत ते जाणुन घ्यायचे आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा , मस्तं पोस्ट.
थोडे थांबा, मग हा गोंधळ हे उत्सव हेच कसे बरोबर त्याच्या मुद्देसूद पोष्टी येऊ लागतील.

मंडळी

तुम्हा सर्वांचे विचार वाचले... पटले....

साजिरा, सावली +१....

हे आपलच कन्फेशन आहे.... मायबोली म्हणजे कन्फेशन बॉक्स..... समविचारी लोकांचा मेळावा.... खुपदा मनातल्या विचारांना इकडे वाट फूटते....

मीरा, धागा वाहता केला आहेस का ? जून्या पोस्ट्स गेल्या कि वाहून.

साजिरा,
वंचित असणे हा एकच मुद्दा नाही.
अंधानुकरण ( बाकीचे करतात ना मग मी पण करणार. मी तसे नाही केले तर समूहाबाहेर फेकतील. )
उद्याची शाशवती नसणे ( काय हैदोस घालायचा तो आजच घाला, उद्या संधी / वय / शक्ती / पैसा असणार नाही. )
शक्तीप्रदर्शन ( हे अर्थातच दुसर्‍या समूहाला दाखवण्यासाठी.)
योग्य काय आणि अयोग्य काय याचे मार्गदर्शनच नसणे, आपण जे करतोय त्याचा आपण सोडून इतरांवर काही परीणाम होतोय का, याचा विचारच नसणे. असेही मुद्दे आहेतच.

आणि वंचित असणार्‍यापेक्षा, माझ्याकडे जे आहे त्याचे प्रदर्शनही होतेच कि या निमित्ताने Happy

मीरा ताई... अगदी मनातलं बोललात...!!!
आमच्या सोसायटीत तीच गत आहे. एकीकडे पैसे वाचवावे म्हणून, वापरलेल्या# फुलांच्या माळा लावून सजावट केली आणि दुसरीकडे १००० रुपयांची फटाक्यांची माळ लावली स्थापनेला.
आसपास च्या घरांमधे अगदी तान्ही बाळं असतांना फटाके लावण्याचा विरोध ही केला पण व्यर्थ... Sad

#- आद्ल्या दिवशी आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोचं डोहाळ जेवण होतं. तिथं वापरलेली एकुणेक फुलं माळा, हार गणपतीच्या सजावटी साठी वापरलं अगदी मखरात सुद्धा... Sad

मोकिमी... अगदी ठसठसणारी व्यथा मांडलीस.

<<देवळात जायचेच असेल तर गावदेवी किंवा शांत अश्या एखाद्या मंदिरात जाणे.<<
<,आपले अध्यात्म आपल्या पुरते<< अगदी पटलं.

गर्दीमुळे जीव गुदमरतो आजकाल! Sad

रुपयांच्या माळा मूर्तीच्या किंवा व्यक्तीच्या गळ्यात घालणे याला रिझर्व बँकेने विरोध केला आहे.

साजिरा,
हा कैफ कुठून आला तेच कळत नाही !
इतक्या डेसिबल्सचे "संगीत" ऐकणे, इतक्या वेळ "थिरकणे" कसे जमते या तरुणांना ? याचा त्यांच्या तब्येतीवर आज किंवा उद्या परीणाम होणार नाही का ?

मोकिमी.. सहमत! अगदी सेम नियम माझेही आहेत.. सोसायटीच्या गणपतीला सुद्धा गेले नाही !

काल पुण्यात मधील ह्याच बाप्पाचे २ वेगळे उत्सव :
लक्ष्मी रोडवर अगदी नीट ढोल-ताशांच्या नि मोरयाच्या गजरात मिरवणुक चालली होती.. पोलिसांना शिट्टी ही वाजवायची गरज नाही पड्ली
फक्त एक पुल ओलांडुन मनपा रोडला आले.. अतिप्रचंड डीजे,भयंकर आवाजाची चिकनी चमेली, लुंगी डान्स चालु होते
गणपतीच्या समोरच दोन पुरुष घागरा चोली (!!) घालुन अश्लील हावभाव करत होते.. २-३ पोलीस आले पण त्यांना तक्रार करण्याआधीच निघुन गेले.. बरं एक सो कॉल्ड कार्यकर्ता पोलीसांच्या समोरच अजुन आवाज वाढवा म्हणाला :रागः
कोणीही काहीही बोलले नाही! फक्त सगळे दुर्लक्ष करुन जातात होते Sad

साजिराची ही पोस्ट माझी आवडती पोस्ट आहे. (आधी फेसबूकवर वाचल्याचे आठवते). ती मी एकदा येथेच एका वाहत्या पानावरही दिलेली होती रेफरन्ससाठी, तेथेही सर्वांना आवडली होती. अतिशय समर्पक निरिक्षण आहे त्या पोस्टमध्ये!

मोहन की मीरा - लेख आवडला. बेसिकली मुद्दे सगळे तेच आहेत जे आपल्यासारख्यांच्या मनात असतात वगैरे! पण नेमकेपणाने व एकत्रितपणे कोठे लिहिले गेल्याचे वाचनात नव्हते, त्यामुळे बरे वाटले. खालील मुद्दे पटले व त्यातील दुसरा मीहि आचरणात आणतो (बहुतेकदा):

१. आपले अध्यात्म आपल्यापुरते

२. गर्दी असलेल्या धार्मिक स्थळी जायचेच नाही

साजिरांप्रमाणेच उमेश कोठीकरांनीही फेसबूकवर या संदर्भात काही पोटतिडकीने लिहिलेले आहे. तेही वाचनीय व पटण्याजोगे आहे.

दिनेश << तब्येतीवर परिणाम +१००

मलाही समजत नाही व मलाही तसेच वाटते. इतके प्रचंड व इतका प्रचंड वेळ नाचून ह्या लोकांना काहीच होत नसेल का? ह्यातील कित्येक चेहरे एरवी कधी पाहायलाही मिळत नाहीत असे असतात.

बघ बाई रिक्षावाला की असे काहीतरी गीत ऐकण्यात आले. त्यावर एका झोपडपट्टीस्वरूप चाळीतील यच्चयावत बायकाही अंगविक्षेप करून त्याच गर्दीत जरा अंतर ठेवून नाचताना दिसल्या. हॉरिबल! आधी पुरुष आयटेम साँगवर बीभत्स नाचतात तेच पाहवत नाही, त्यात आणखीन बायका नाचू लागल्या तर का कुणास ठाऊक ते अतिशयच ओंगळवाणे वाटू लागते.

पुन्हा पुन्हा साजिरांची पोस्ट आठवते. हा कसलातरी असंतोष आणि कैफच! दिशाहीनता! कशावर तरी सतत राग, कुणाचा तरी निषेध, कसलीतरी भिकारचोट अस्मिता!

जुने लोक 'ब्रिटिश हवे होते' असे अजूनही का म्हणतात ते हल्ली अनेकदा लक्षात येते.

-'बेफिकीर'!

मोहन कि मीरा ..खूपच छान विचार मांडले तुम्ही. आतला आवाज/आक्रोश शांतपणे मांडला आहे. तुमच्या मामानं बद्दल वाचून खूप वाईट वाटले.
मिरवणुकीच्या या गोंधळात खूप जीव घुसमटतो. तुमचे नियम पण खूप आवडले पण हे मोठ्यांना बोलले तरी नास्तिक प्रकारात आपल्याला मोडून नको ते ऐकवतात.
साजिरा तुमची पोस्ट जाम आवडली..खरच खूप असंतोष आहे आणि समाधान फक्त showbazi मध्ये वाटते लोकांना.
मुंबई police चे हाल पाहवत नाही. दिवसभर १४-१६ तास duty ..त्यात काही विपरीत घडले तर सर्व दोष तिथे असलेल्या व्यक्तीवर ..त्याचे पण मुले-बाळे, संसार आहेतच कि, म्हणून रेटायचे जीव तुटेपर्यंत पण लोक civic sense , rules विसरून हवे ते करणार.
सारेच अस्वस्थ करते.

मोकिमी बरोबर १००% सहमत

साजिरा सुन्न केलत तुम्हि. खरच भयन्कर स्वरूप आहे हे.
थोड्याच दिवसन्मधे अता नवरत्रोत्सव येइल. देविला़ खणा नाराळाने ओटि दिली जैल.

पुन्हा तेच मन्डप आणि तोच गाजावाजा. रेश्मि वस्त्रा आनि दागदागिने.

तोपर्यन्त अजुन १००० निर्भया झाल्या असतिल.

सणांच्या वेळि तर त्रास होतोच पण सण संपल्यावरचे इफेक्ट्स लोकांना जाणवत नाहित. ह्या थोड्या लिंक्स. देवाच्या मुर्तिचे आणि बीचचे काय हाल झाले आहेत ते बघण्यासारखे नाहियेत.

http://sagarshiriskar.wordpress.com/2013/02/26/after-the-visarjan/
http://www.adiljain.com/ganesh-visarjan/
http://mumbaimag.com/mumbailist-go-green-with-ganesha/

आपण इथे लिहिणारे सर्वच मध्यमवयीन आहोत. या सगळ्या प्रकारात ज्यांचा सक्रीय सहभाग आहे, त्यांचाही कुणी प्रतिनिधी इथे असावा असे वाटतेय. त्यांचेही मत कळायला हवे.
आपण सर्वांनी या सणांचे एक लोभस रुप बघितलेले आहे. आपण तुलना करू शकतो. या लोकांनी तर लहानपणापासून हेच बघितलेले आहे.

कुठेतरी (बहुदा मा.बो. वरच) वाचनात आलं होतं की न्या. रानडेंनी लो. टिळकांना गणेशोत्सव सार्वजनिक करताना त्यातून पुढे अनेक समस्या उद्भवतील असं सांगितलं होतं. (शाळेत असताना लो. टिळक unconditional hero वाटायचव, आणी त्यांना वैचारिक विरोध करणारे आगरकर, रानडे वगैरे चूक. पण आता एका दिशेला झुकलेला काटा बराचसा बॅलेन्स होतोय असं वाटतं. सुराज्य हे स्वराज्याच्या आधी येतं असं मतांतर झालय.)

आपल्याकडे सगळ्याच गोष्टी exploit करण्याची एक वृत्ती आहे आणी ती सगळीकडे दिसून येते. कदाचित सगळ्याच पातळ्यांवर असलेला साधन-संपत्तीचा अभाव हे त्या असंतोषाचं मूळ असावं.

१. जिथे कुठे गर्दी असेल अश्या ठिकाणी देव दर्शनाला न जाणे.>>>> एकदम योग्य निर्णय. खूपच पटला. मलाही सेम असंच वाटतं. काय त्या गर्दीत तासनतास उभं राहून मिळतं लोकचं जाणे.

मधे फेसबुकवर लालबागच्या राजाच्या इथला व्हिडिओ पाहिला. तिथे आलेल्या भाविकांना (स्पेशली बायका मुलींना) इतक्या घाणेरड्या पद्धतीने ढकलत होते. बघून अतिशयच किळस वाटली.

गणपतीसमोरचे हिडीस नाच तर प्रचंड डोक्यात जातात. त्यामुळे गेली कित्येक वर्ष फक्त मानाचे ५ बघून परत हेच धोरण ठेवलं होतं. पुढचे सगळे तमाशे नकोतच. बिचार्‍या बाप्पाकडे बघवत नाही.

लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या वेळची क्लिप मीही बघितली.
१. एकतर मी माझा एवढा वेळ खर्चून एवढ्या गर्दीत अज्जिबात्तच्च जाणार नाही.
२. चुकून गेले असते आणि कोणी मला असं वागवलं असतं, तर जसा तो कार्यकर्ता आल्यागेल्या प्रत्येकाचं डोकं देवासमोर आपटून मागे सारत होता तसं मी त्याचं डोकं धरून तिथल्या तिथे आपटवलं असतं.

असो.

ह्या विषयावर अनेकदा झालय वाटतं इथे.

एकुण एक बाजारू (हो हाच शब्द..) असतात. .... त्यात कसला आलाय आनंद?
अगदी पुर्वी पुण्यात राहून सुद्धा मी कुठल्याच सार्वजनिक गणपतीला 'मुद्दामहून' असे गेल्या कित्येक वर्षात गेले नाही ते ह्याच कारणाला. वाढती गर्दी वगैरे डोक्यात जाते.
सर्व सार्वजनिक मंडळाची ते बाजारूपणा, दादागिरी पाहिली की चेचून काढावेसे वाटते.
इथे आर्थिक व्यवस्था ढासळली असताना मंत्री पण गुंतले असतात ह्या असल्या मंडळाना/प्रकारांना आसरा देवून त्यामुळे काय करणार सामान्य माणूस....

मी पंतप्रधान असते तर...असा विषय निबंध असता ना तर... आधी हे उत्सव पुर्णपणे बंद करीन. कायच्या काय उंचीच्या मोठ्या मुर्त्या जेव्हा समुद्रात विसर्जन करतात तेव्हा पार वाट लागते.... आदल्या दिवशी आरती केलेले देव दुसर्‍या दिवशी काठाशी नको त्या स्थितीत.. बघवत नाहीत.. निसर्गाची वाट लागतेच. असो.

(कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या तर त्यांचाच दोष आहे असे समजावे)

(कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या तर त्यांचाच दोष आहे असे समजावे)

>> ज्जे बात !! कोणीतरी हे म्हणायची गरज होतीच.

ज्यांना लक्झरी, कम्फर्ट, सेक्युरिटी हवी त्यांनी खुशाल एखाद्या मल्टीप्लेक्स मध्ये जावून चांगला सिनेमा बघावा ना...उगाच कशाला देवदर्शनाला रांगेत तासनतास ताटकळत बसायचे?? लोक मोक्षाची कामना करण्याकरिता देवाकडे जातात...वारकरी घरादारावर तुळशीपत्र ठेवून उन, पाउस, राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय यांची परवा न करता वारीत चालत राहतात...भक्ती हे येरगबाळ्याचे काम नव्हे, ज्याला झेपते त्यानेच ती करावी...बाकीच्यांनी घरी बसून हात जोडले तरी चालतात...छत्रपति शिवाजी महाराज श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन येथे शिवाला स्वताचे शीर वाहू बघत होते आणि आपल्याला जरा धक्काबुक्की झाली आपण तळतळाट करत सुटतो...ईश्वरप्राप्ती इतकी सोपी आहे का हो?? तुम्हा भाविक भक्तांच्या आणि मंडळांच्या शिस्तप्रिय कार्यकर्त्यांच्या राड्यात निष्कारण देव आणि धर्म मात्र भरडल्या जातो..

स्वामी विश्वरूपानंद,

"ज्यांना लक्झरी, कम्फर्ट, सेक्युरिटी हवी त्यांनी खुशाल एखाद्या मल्टीप्लेक्स मध्ये जावून चांगला सिनेमा बघावा ना...उगाच कशाला देवदर्शनाला रांगेत तासनतास ताटकळत बसायचे??"

म्हणजे, देवदर्शन हे secured, comfortable वातावरणात होऊच शकत नाही कि काय? ह्या वरच्या वाक्याचा अर्थ असा निघतो कि देवदर्शन आणि लक्झरी, कम्फर्ट, सेक्युरिटी हे विरुद्धार्थी शब्द आहेत.

"लोक मोक्षाची कामना करण्याकरिता देवाकडे जातात." - ह्या वाक्यावर अनेक वाद उद्भवतात. दगडुशेठ गणपतीपुढे ५ नारळांची तोरणं बांधून मटेरिअल गोष्टींचे नवस बोललेले अनेक जण पाहिलेत. ते असो.

"भक्ती हे येरगबाळ्याचे काम नव्हे, ज्याला झेपते त्यानेच ती करावी" ... "ईश्वरप्राप्ती इतकी सोपी आहे का हो?? " - 'भक्ती-क्लब' ईतका exclusive करू नका हो.

"छत्रपति शिवाजी महाराज श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन येथे शिवाला स्वताचे शीर वाहू बघत होते आणि आपल्याला जरा धक्काबुक्की झाली आपण तळतळाट करत सुटतो"

ह्या दोन गोष्टींचा अर्था-अर्थी काही संबंध नाहीये. ती शिवरायांसारख्या कर्मयोग्याची एक तात्पुरती अवस्था होती असं इतिहासकार मानतात आणि तेच तर्कशुद्ध वाटतं.

"तुम्हा भाविक भक्तांच्या आणि मंडळांच्या शिस्तप्रिय कार्यकर्त्यांच्या राड्यात निष्कारण देव आणि धर्म मात्र भरडल्या जातो"

शिस्तप्रिय कार्यकर्ते, देव आणि धर्म भरडला जाणे हे वादाचे मुद्दे होऊ शकतात. (आधीच्या वाक्यांमधे तुम्ही ज्या ईश्वराला ईतकं exclusive केलय तो ईश्वर आणि धर्म ईतका लेचापेचा नसावा / नाही कि जो असल्या गोष्टींमूळे भरडला जाईल.) ते असो. पण मला वाटतं तुम्ही आत्ता मुद्द्याला स्पर्श केलाय. देवदर्शन, त्याचा उत्सव आणी त्याचं झालेलं बाजारीकरण हाच ह्या धाग्याचा मुद्दा आहे.

माफ करा, मी आत्तापर्यंत माबो वर कधीही वाद घातलेले नाहीत आणी तसं करण्याची ईच्छा देखील नाही. पण तुमच्या प्रतिसादातले मुद्दे नाही पटले आणी प्रतिवाद करावासा वाटला.

स्वामीजी क्षमा असावी पण सध्या गणपती आणि दहीहंडीला श्रद्धेच्या नावाखाली जो प्रकार चालतो त्याला तुम्ही जर का दर्शन आणि अध्यात्मिक उन्नती वगैरे म्हणत असाल तर अवघड आहे बुवा. तो फक्त उन्माद आहे आणि लोकांची करमणूक ह्यापलीकडे त्यातून फार काही सध्या झालेले नाहीये. एक दोन तुरळक गणेश मांडले सोडली तर बाकी काय सामाजिक कार्य करतात हा मोठा गहन प्रश्न आहे.
बाकी १-२ दिवस त्रास असता तर वेगळे इथे १० दिवस मग तो मंडप तसाच ठेवून नवरात्री पर्यंत म्हणजे जवळपास १ महिना रस्ते अडवणे आणि धुमाकूळ घालणे हे तारतम्य सोडल्याचे लक्षण आहे. तुम्हाला त्यात गैर वाटू नये म्हणजे कठीण आहे.

दगडुशेठ गणपतीपुढे ५ नारळांची तोरणं >> आणि मग तोच नारळ मागच्या दाराने त्याच दुकानात जावून पुन्हा वेगळा कोणीतरी देवाकडे अजून काहीतरी मागतो. एक नंबर धंदा आहे.

Pages