गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. परंतु या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई भाटवडेकर व संस्थेच्या देखभालीतील काही मुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत! या भेटीचा हा वृत्तांत व अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलाय!
नियम संस्काराचा हा पुढील भाग. जातपात हा प्रकार का व कसा झाला असावा ह्या शोधात हे कसे घडले असावे हा विचार मी सुरु केला, ते सांगण्याचा हा प्रयत्न मी माझ्या क्षमतेला समजून करतो आहे.
पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत असते. पंचतंत्र, जातक कथा, रामायण - महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी, त्यांचे उगम तर दिसतातच; शिवाय अनेक लोककथा - काव्यांच्या स्वरूपांत त्यांचे जतन झालेले आढळून येते.
आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही.
श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.
सामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ ?
खरच काय असतं हे ? कारण आपण लहानाचे मोठे होताना ५६ वेळा ऐकतो हा शब्द. एखादा शब्द वापरताना त्याचा अर्थ माहित असलाच पाहीजे अशी पद्धत अजूनतरी आपल्याकडे नाही आहे. मोठे मोठे शब्द वापरून जन निर्माण करण आणि अजून मोठे शब्द वापरुन ते टिकवणं महत्वाच.
तर विचारायचा हेतू निर्मळ आहे. मला याचा अर्थ हवाय. कारण बांधिलकी आपण बरयाच नात्यांत पाहतो. रक्ताचीच असतात बहुतेक नाती. मग समाजाच काय? तो मधेच कुठून आला? मी माझ्या समाधानासाठी अर्थ काढलाय पण परत असंख्य प्रश्न निर्माण झालेत. तर मी आधी अर्थ सांगतो आणि प्रश्न विचारतो.
शाळा सुटल्याची घंटा वाजली. पेंगुळल्या डोळ्यांनी अमरने दप्तर काखोटीला मारलं. भराभर चालत तो निघाला. शाळेच्या आवारातून तो बाहेर पडणार तेवढ्यात मोगरेबाईंनी त्याला गाठलं. कपाळावरची झुलपं उडवत तो नुसताच त्याच्यांकडे बघत राहिला.
"मंगलताई येतील आज. त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे."
"कशाला? मला टपरीवर जायचं आहे. पक्याला कबूल केलय मी." तो वैतागलाच.
"अरे, कुणी भलं करायला गेलं तर तुझं आपलं माझंच खरं असं आहे."
"बरं थांबतो." निर्विकार स्वरात तो म्हणाला.
"शाळा बंद झाली आहे. बाहेर राहशील का उभा? पाहिजे तर मी पण थांबते तुझ्याबरोबर ताई येईपर्यंत."
"थांबतो मी. तुम्ही गेलात तरी चालेल."
न्यू इंग्लिश स्कूल व शुभंकरोती दोन्ही ठिकाणी नेमेची भरणारी प्रदर्शने भरली होती. बऱ्याच वर्षांनी हा योग आलेला. मी संचारल्यासारखी आईला घेऊन निघाले. मला सगळ्या प्रकारच्या प्रदर्शनांना, सेलला जायला आवडते. आर्ट गॅलरी असो, फोटोंची मनोहरी पकड, तैलरंग, रांगोळी, हस्तकला, यात तर अनेक लक्षवेधक प्रकार, किंवा नेसणे किती होते हा प्रश्न कानामागे टाकून साड्यांचे ढीग उपसणे असो. उत्साहाने सळसळणारे वातावरण कधीनुक आपल्यालाही त्या भरात खरेदी करायला लावते ते बरेचदा कळतही नाही. घेतलेली वस्तू कशी स्वस्त व मस्त मिळाली या आनंदात मशगुल आपण घरी येतो.