जीवनमान

आजची शिकवणी

Submitted by ध्येयवेडा on 23 June, 2021 - 10:10

काळी आरुषचा फोन आला - "हॅलो मामा, आजी आहे का रे ? दे ना तिला, मला तिला काहीतरी सांगायचंय तिला", त्यानं एकदम गोड आवाजात सुरुवात केली.
"आजी नाहीये इथे, माझ्याशी बोल की" मी
"नाही, तू आsधी आजीला फोsन दे..य ..."
"हम्म घ्या, लाडक्या नातवाचा फोन आलाय. फक्त आजी सोबतच बोलायचं आहे म्हणे" मी आईच्या हातात फोन देत तिला म्हणालो.

पुढची पाच मिनिटं आजी आणि नातवाचं फोनवर काय खुसुरफुसुर चालू होतं कोणास ठाऊक.
"काय म्हणाले साहेब ?" फोन झाल्यावर मी आईला विचारलं,

विचारांची 'सायकल'

Submitted by ध्येयवेडा on 27 July, 2020 - 08:40

अवेळी आलेल्या पावसानं चांगलाच जोर धरला होता. बऱ्याच वेळ वाट बघून मी घरापर्यंत भिजत जायची मानसिक तयारी केली. खाली जाऊन सायकलवर टांग टाकली आणि निघालो.
ऑफिसपासून घरापर्यंतचा सायकलचा निवांत प्रवास म्हणजे मनात खूप वेळ वाट बघत बसलेल्या विशिष्ट विचारांना एक हाक असते. दिवसभर ह्या विचारांना पुरेसा वेळ किंवा 'फुरसत' मिळत नाही.
निवांत आणि एकांत क्षणाची वाट बघत बसलेले हे विचार संधी मिळताच डोक्यात तरळू लागतात. त्यातून हेडफोनवर 'ट्रांस' सुरू असेल तर मग ह्या विचारांना अजूनच पोषक वातावरण. हा ट्रान्स 'आतलं' आणि 'बाहेरचं' जग यांच्यातील एक भिंत बनून जातो.

जाहिरातमय जीवन

Submitted by mi_anu on 13 January, 2016 - 23:18

सकाळ झाली. भैरु उठला. भैरुने 'हवा मे उडता जाये' असा दावा करणार्‍या रबरी सपाता पायात सरकावल्या आणि तो दंतधावन करण्यासाठी न्हाणीघरात गेला.

'दातों के कानेकोपरेतक पोहचणारी' एक विचारपूर्वक वेड्यावाकड्या बनवलेल्या दात्यांची दंतघासणी त्याने उचलली. त्यावर 'आत्मविश्वास' जागवणार्‍या दंतरसायनाचे नळकांडे दाबले आणि दात घासायला सुरुवात केली. दात घासून झाल्यावर जाहिरातसंतांनी सांगितल्याप्रमाणे दातावर बोट घासून 'च्युक' आवाज येतो का त्याची तपासणी केली. अरेच्च्या! आवाज नीट नाही आला. भैरुने परत थोडे दंतरसायन घासणीवर घेतले आणि परत दात घासले. यावेळी दातावर बोट घासल्यावर हवा तसा 'च्युक' आवाज आला. हुश्श!!

परत चावडी

Submitted by mi_anu on 27 September, 2015 - 05:43

"निल्या हल्ली फेसबुकावर नाही का? त्याला परवा टॅग करायचा होता तर सापडलाच नाही."
"अरे जाम घोळ झाला रे. निल्या त्याच्या जर्मन साहेबाच्या बायकोच्या बरियलला गेला होता त्याचे रिकामटेकडे रुममेट घेऊन.त्याला ग्रुप टिकेट काढून पैसे वाचवायचे होते.तर म्हणाला तुम्हीपण चला. त्यांना तिथे काही उद्योग नव्हता त्यांनी त्या रम्य दफनभूमीत पंचवीसेक फोटो काढले आणि त्यात टॅग केला ना निल्याला 'फिलींग हॅप्पी अ‍ॅट रोझेनहाईम ग्रेव्हयार्ड' म्हणून. त्याला २५० लाईक मिळाले आणि निल्याचा साहेबच होता फ्रेंडस लिस्ट मध्ये. निल्याने आता कानाला खडा लावून फेसबुक संन्यास घेतलाय काही दिवस."

सियाचीन ग्लेशीयर.....भाग २ ......आयुष्याची दोरी

Submitted by रणजित चितळे on 25 December, 2012 - 11:39

सियाचीन ग्लेशीयर ...भाग १
.ह्या आधीचे...

.......... एखाद्या खुनी माणसा प्रमाणे किंवा कोणाला मारण्याची सुपारी घेतल्या सारखे सतत तेथे असणाऱ्या जवानांच्या मागे दबा धरून राहून घात करायला तयार असतात जणुकाही. चालताना चुकलात, थोडे वजन जास्त पडले, पाय घसरला, समजले नाही, वाट चुकलात किंवा नशिबाने पाठ फिरवली तर पटकन सावज साधायला तयार...................

काही नोंदी अशातशाच... - ९

Submitted by श्रावण मोडक on 1 April, 2012 - 14:35

दहा दिवस झाले वास्तवात या गोष्टीला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू व्हायचा होता. पण त्याची हवा तयार होत गेली होती. या आंदोलनाचा, खरं तर आंदोलनामागील मागणीमागील विचाराचा, विरोधक हीच माझी त्या वर्तुळात प्रतिमा होती आणि आहेही. स्वाभाविकच ते सारे एका बाजूला आणि मी एका बाजूला अशी चर्चा सुरू होती. चर्चा नव्हे, किंचित वादच. समोर एक वकील होते, त्यांचे दोघे-तिघे समर्थक, एक प्राध्यापक.

गुलमोहर: 

राजाराम सीताराम एक ........भाग १२....कॅम्पलाइफ

Submitted by रणजित चितळे on 26 March, 2012 - 23:43

ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट
राजाराम सीताराम....... भाग ७….. ड्रिलस्क्वेअर
राजाराम सीताराम....... भाग ८......शिक्षा
राजाराम सीताराम....... भाग ९......एक गोली एक दुश्मन।.... भाग १
राजाराम सीताराम....... भाग १० ..एक गोली एक दुश्मन।.... भाग २
राजाराम सीताराम....... भाग ११....पिटी परेड

गुलमोहर: 

राजाराम सीताराम.....भाग ५..........आयएमएतले दिवस

Submitted by रणजित चितळे on 25 July, 2011 - 09:31

ह्या आधीचे..........

राजाराम सीताराम एक...... प्रवेश
राजाराम सीताराम........ पुढचे चार दिवस
सुरवातीचे दिवस – भाग १
सुरवातीचे दिवस – भाग २

आयएमएतले दिवस - भाग १

………….. मी, जिसी आकाश काशिनाथ शिरगावकर, डोंबिवलीचा राहणारा.

गुलमोहर: 

ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर...

Submitted by भानस on 16 May, 2011 - 14:53

न्यू इंग्लिश स्कूल व शुभंकरोती दोन्ही ठिकाणी नेमेची भरणारी प्रदर्शने भरली होती. बऱ्याच वर्षांनी हा योग आलेला. मी संचारल्यासारखी आईला घेऊन निघाले. मला सगळ्या प्रकारच्या प्रदर्शनांना, सेलला जायला आवडते. आर्ट गॅलरी असो, फोटोंची मनोहरी पकड, तैलरंग, रांगोळी, हस्तकला, यात तर अनेक लक्षवेधक प्रकार, किंवा नेसणे किती होते हा प्रश्न कानामागे टाकून साड्यांचे ढीग उपसणे असो. उत्साहाने सळसळणारे वातावरण कधीनुक आपल्यालाही त्या भरात खरेदी करायला लावते ते बरेचदा कळतही नाही. घेतलेली वस्तू कशी स्वस्त व मस्त मिळाली या आनंदात मशगुल आपण घरी येतो.

गुलमोहर: 

राधाक्का...

Submitted by भानस on 8 February, 2011 - 13:25

वाड्यातल्या त्या काहीश्या अंधार्‍या, कोंदट, पोपडे उडालेल्या भिंती. आठवड्यापूर्वी शेणाने सारवलेल्या जमिनीला शुष्कतेने पडलेल्या भेगा. धगधगलेल्या चुलीतून भसभसून निघणारा, ज्याला खिडकीपेक्षा खिंडार म्हणणे योग्य ठरेल अश्या मोठ्या भगदाडातून, मोकळा होण्यासाठी झेपावणारा काळा धूर. राधाक्काचा कोंडलेला, घुसमटलेला श्वास. ओली लाकडे पेटवताना फुंकणी फुंकून फुंकून कोरडा पडलेला घसा. तिच्या संपूर्ण जीवनाची धग दाखवत रसरसून लालबुंद झालेला चेहरा. भगदाडातून संधी मिळताच धुराला बाजूला सारत मुसंडी मारून घुसलेली सूर्याची किरणे. त्यांचा तयार झालेला धूमकेतूच्या शेपटीसारखा एक लांबलचक पट्टा.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - जीवनमान