रात्रभर पडणारा पाऊस पहाटे उघडला. पण वातावरण कुंद होतं, निरुत्साही होतं. आषाढघनांनी सकाळही झाकोळून गेली होती. अंघोळ आटपून अरूण देवपूजा करत होता. तिथेच शांतीची सकाळची कामं चालली होती. डब्यांचा स्वैपाक, अथर्वची शाळेची तयारी, घरातली आवराआवर, पाणी भरून ठेवा, एक ना दोन. पण शांतीच्या हालचालीत एक शिणवटा होता. अरूणला तो जाणवला. गेले काही दिवस ते एक सावट घरावर होतंच. शांतीची नोकरी सुटली होती. या आठवड्यात शेवटचा दिवस होता. दोघांच्या कमाईत कसाबसा घरखर्च भागत होता. पण आता परिस्थिती कठीण होणार होती. काल रात्रीही दोघं तेच बोलत होते. कमी पगाराची का होईना शांतीला दुसरी नोकरी मिळणं आवश्यक होतं. पण..
रंगात रंगले मी ,
हव्या हव्याशा त्या....
ना लाल ना रंग तो गुलाबी,
नाहूदे रंगात मदतीसाठी कोणाच्या....
होऊदे रंगात रंग ,
बेरंग असा मी.......
बरसूदे कोणाच्यातरी अश्रूतून,
आनंद रंग होऊन मी......
रंगूदे अंतःकरण माझे,
जळूदे झोळी अश्यक्यतेची....
पोहचूदे तिथे तिथे मज,
गरज आहे दुखाःस आनंदात रंगण्याची....
वाहूदे शरीरात लाल सळसळते रक्त,
पेटूदे हृदयात बेरंग भडकती आग....
मिसळतील सर्व रंग माझ्यात ,
होऊदे मज असा, फक्त माणूसकीचा रंग.......
रूद्रा.....
निर्घृण खून..
काय अपराध
होता तयांचा
जे त्यांस
असे मरण यावे?
माणसांतल्याच लांडग्यांनी
तयांस जीवे ऐसे मारीले
ह्या माणसांपरी
ते लांडगे तरी बरे
हेरतात ते सावज
भुक शमविण्यासाठी
संचारबंदी असोनी
ऐसा जथ्था तेथ जमला
अन्
माणसांतल्या माणुसकीचा
निर्घृण खून तेथेची जाहला..
(Dipti Bhagat)
माझ्या खेड्यात अनेक जाती धर्माची माणसं आहेत. कुंभारवाडा आहे, महारवाडा आहे, मांगवाडा आहे, बागवान मुलाण्याची घरे आहेत. टेकावर न्हाव्याची वस्ती आहे. गावच्या मध्यभागी वीस खणी ब्राह्मणवाडा आहे. परिटांची अनेक घरे आहेत. बोळात लव्हाराची बैठी घरे आहेत. सोबत गुरवांची चार दोन घरेही आहेत. अशा अठरापगड जमाती आहेत. पण आपसात कधी हेवेदावे होत नसत. मारामाऱ्या झालेल्या कधी ऐकीवात न्हवत्या.
अयलान, थोडा मोठा असतास
तर कळाल असत तुला
शाळेतल्या रबराने खोडता येतील
अशा रेघोट्या नसतात नकाशावर
आणि त्या दिसत नसल्या प्रत्यक्षात
म्हणुन ओलांडायच्याही नसतात कधी
पडले असतील अनेक प्रश्न
जेंव्हा तुला झिरकाडल असेल
पण कळाल असेल एक सत्य
माणसां सारखे असले तरी
ती माणसंच असतील अस नाही