बहुकोणी व्यक्तिमत्व

Submitted by kokatay on 3 March, 2018 - 13:36

मला बरेच दिवस ह्या विषयावर लिहू असं वाटत होत . “ व्यक्तित्व “ ह्या वर आपले काही “ माईंड सेट “ असतात, उदाहरण स्वरूप जर एखादी व्यक्ती धार्मिक प्रवचन करत असेल तर ताबडतोप डोळ्या समोर एक संत येतो, राजकारणी व्यक्ती म्हटलं तर खादी वस्त्रधारी, व्यापारी/ उंच पदावर असेल तर सूट घातलेला. तसच एखादी महिला जर जीन्स- शोर्ट इत्यादी वस्त्रधारी असेल तर “ मॉड “ असं समजलं जातं. तसच एखादी बाई–मनुष्य केसात तेल लाऊन वेणी घातलेतली असेल तर “ मागसलेली’ समजली जाते. खर बघितलं तर बाहेरून दिसणाऱ्या व्यक्तित्वाच त्या व्यक्तीच्या वैचारिक किंवा मानसिक पातळी चा काहीच संबंध नसतो, अगदी मागसलेली दिसणारी व्यक्ती वैचारिक आणि मानसिक पातळी वर पुढारलेली असू शकते.
अश्या विभिन्न व्य्क्तीत्वांच आपल्या मनात एक ठराविक चित्र असल्या कारणानी जर ह्या व्यक्तींना आपण कुठे दुस-याच रुपात बघितलं तर ताबडतोप आपल्या मनात अनेक प्रश्न येऊ लागतात तर हाच प्रश्न माझ्या ही मनात सारखा येतो कि असं कां असत ? जर कां धार्मिक प्रवचन करणारा व्यक्ती संसारी असेल आणि त्याला आपण नाईट क्लब मध्ये बघितलं तर आपल्याला हे विसंगत कां वाटावं? देव-धर्म करणाऱ्या व्यक्तींनी अगदी सात्विक जीवन जगावं, आणि त्यांनी जीवनातल्या इतर गोशींचा आस्वाद न घ्यावा अशी अपेक्षा कां केली जाते? . काही वेळा तर अश्या व्यक्तींना “ दुतोंडी “ ही समजलं जातं. दुतोंडी असणं आणि बहुकोणी व्यक्तित्व ह्यात पुष्कळ फरक आहे.
आपल्या संस्कृती मध्ये तर आपल्याला बहुकोणी व्यक्तित्वाच महत्व शिकवलं गेलं आहे. योग्य वेळी योग्य ‘टोपी’ घालून जो ह्या संसारात वावरतो, तो पुष्कळ उंच झेप घेतो आणि जीवनात सफल होतो .
‘नीतीसार‘ मध्ये एक पद्ध आहे :
कार्येषु दासी , कारणेशु मंत्री , भोजनेषु माता, शैय्येशु रंभा, रुपेषु लक्ष्मि ,क्ष्म्ये शु धरित्री षट धर्म युक्त, कुलधर्म पत्नी.
ह्या सहा-कोणी व्यक्तित्व असलेली पत्नी सर्व श्रेष्ठ असते. तर ह्या वर जर विचार केलात तर आताच्या काळ मध्ये हे नीती सार पुरुष आणि बाई दोघांवर लागू होतं, आणि बहु –कोणी व्यक्तित्व आपल्याला यश मिळवून देतो.
कुणाच्या ही विचारसरणी वर कटाक्ष करण्याचा ह्या लेखाचा उद्धेष्य नाही मात्र ह्या दिशेत विचार करायला काहीच हरकत नाहीये.
ऐश्वर्या कोकाटे
मराठी कल्चर एंड फेस्टिवल्स

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बहुतेक आपल्याला बहुकोनी म्हणायचं असावं. तरी मराठीत असा शब्द पहिल्यांदाच वाचला.
लेखनविचार छान आहे.