मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
संस्था
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ५: पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा
अमेरीकेतील दुसर्या पिढीतील मुलांचा जलसंधारण प्रकल्पासाठी मदतीचा हात
अमेरीकेतील बॉस्टन भागातील काही शा़ळेतील (भारतीय / मराठी मूळ असलेल्या) मुलांनी उत्साहाने चालू केलेल्या एका समुहदान (क्राउड फंडींग) प्रकल्पाबद्दल माहिती आणि आवाहन... मुलांनी तयार केलेली एक अॅनिमेटेड चित्रफित येथे पहाता येईल.
मुशायरा १ मे २०१६
नमस्कार मंडळी !
1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुण्यातील आनंदयात्री या 'सिंगल्स'च्या ग्रुपने गझल मुशायरा आयोजित केला आहे. त्यानिमित्त आपणा सर्वाना आग्रहाचे निमंत्रण
कार्यक्रम : आनंदयात्री आयोजित "गझलसंध्या"
दिवस : रविवार दिनांक १ मे २०१६
वेळ : संध्याकाळी 6:00 वाजता
स्थळ : कम्युनिटी हॉल ,स्काऊट गाईड मैदान,सदाशिव पेठ , पुणे
सहभागी गझलकार:
बेफिकीर (पुणे) , प्रमोद खराडे (पुणे),
वैभव कुलकर्णी (पंढरपूर), निशिकांत देशपांडे (पुणे),
सुप्रिया जाधव (पुणे) .
प्रवेश विनामुल्य !!
आईस्क्रीम, कुल्फी इ. इ. की आणखी काही?
आपण जे खातो ते ‘तेच’ आहे का, असा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही, म्हणजे बटाटेवडा मागितला आणि मका पॅटीस समोर आले, तर ओळखतोच की पटकन! किंवा तेलपोळीला कुणी पुरणपोळी म्हणू लागले तर त्याला वेडयातच काढू की नाही? पण बाजारात मिळणा-या सगळ्याच पदार्थाबाबत आपल्याला पुरेशी माहिती असतेच, असं नाही होऊ शकत.
![plain-pista-mini[1].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u59022/plain-pista-mini%5B1%5D.jpg)
ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था
सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,
पहिल्या भागाच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल, तसेच प्रतिक्रिया/सूचनांबद्दलही धन्यवाद.
रंग खेळू कागदावर नाही अंगावर !!
सण म्हणजे तरी काय? सण म्हणजे तरी काय हो? हौस पुरवायचे दिवस , मुलांचे आणि आपलेही. हौस तरी कशाची? गाण्याची , नाचण्याची , खाण्याची, आपली कला लोकांसमोर करण्याची आणि हे सर्व करताना हसत खेळत आनंदाचे चार क्षण गोळा करण्याची. गेल्या काही वर्षांपासून शहरांमधून 'सोसायटी संस्कृती' तयार होत आहे. प्रत्यके सोसायटीच्या स्वत:च्या कल्पना, त्यांना साथ देणारे लोक आणि विविध कार्यक्रम पार पाडण्याची हौस यातून अनेक चांगल्या गोष्टी होत आहेत. सण-समारंभ पार पाडण्याचा उत्साह तर प्रचंड. आमची सोसायटीही अशीच अत्यंत हौशी आहेच पण त्यासोबत सामाजिक जाणीवही वेगवेगळ्या प्रसंगातून, कार्यक्रमातून सर्वांनी दाखवलेली आहे.
१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने...
"ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे; उत्पादक, व्यापारी, सेवांचे पुरवठादार इ. वर्गांचा तो पोशिंदा आहे, त्याच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती मिळते इ. वाक्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात वाचतांना मन सुखावते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकाला कशी वागणूक दिली जाते याचे दर्शन याच संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सत्यकथांवरून घडते. ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती स्थान आणि त्याचे मूलभूत हक्क यांचा प्रथम उच्चार केला तो अमेरिकेचे प्रे. जॉन एफ. केनेडी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून तेथील प्रतीनिधीगृहात १५ मार्च १९६२ रोजी केलेल्या पहिल्या भाषणात! आपण सर्वजण ग्राहक आहोत.
नवी मुंबईतील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव
अट्टाहास कशाला ना?
अट्टाहास कशाला ना
नेहमीच चांगलं दिसण्याचा?
दहा छान फोटो काढून
एकच फेसबुकवर टाकण्याचा?
दिसायचं कधीतरी आहोत तसेच
आणि लोकांनाही बघू द्यायचं.
अट्टाहास कशाला ना
सर्वांच्या बरोबरीने प्रमोशनचा?
बाकीचे थांबले म्हणून
आपणही उशिरापर्यंत थांबण्याचा?
जायचं निघून वेळ झाल्यावर
आणि बोलू द्यायचं बोलणाऱ्याना.
अट्टाहास कशाला ना
घर टापटीप ठेवण्याचा?
कोणी येईल म्हणून
दर थोड्या वेळाने केर काढण्याचा?
बसू द्यायचं येणाऱ्याना पसाऱ्यात
आणि रमून जायचं फक्त गप्पात.
अट्टाहास कशाला ना
नेहमीच हसत राहण्याचा?
कितीही आतून तुटले
तरी ताठ उभे राहायचा?
Pages
