
शेखर बर्वे यांच्या 'पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत ' या पुस्तकावर आलेल्या प्रतिक्रियांच मी संकलन करत होते.गुलाबांच्या फुलांच चित्र असलेल एक अभिनंदनाच सुंदर भेट कार्ड दिसलं कोणाच असेल म्हणून उत्सुकतेन उघडल. आतल्या बाजूला कार्डाच्याच आकाराचा कागद चीकटवला होता.त्यावर कडेनी फुलांची सुंदर नक्षी काढलेली होती.वर स्केच पेननी अभिनंदन पत्र अस लिहील होत.
गेल्या काही दिवसापासुन सेन्सॉर बोर्ड भलतंच गाजत आहे. कधी 'कॉम दे हिरे' या चित्रपट प्रदर्शनाला घातलेल्या बंदीमुळे तर कधी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे पूर्वीच्या अध्यक्ष लीला स्यामसन यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे. सेन्सॉर बोर्डाच काम हे चित्रपटातील एखादा आक्षेपार्य किवा वादग्रस्त भाग किवा दृश्य असल्यास त्याला कात्री लावणे हा आहे. पण अश्या एखाद्या आक्षेपार्य दृश्यमुळे सेन्सॉर बोर्ड जेव्हा संपूर्ण चित्रपटावरच बंदी घालते तेव्हा मात्र तो त्या कलाकारावर किवा त्याच्या कलाकृतीवर घाला असतो.
घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.
जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.
१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.
२. रद्दी प्रमाणे जुने कपडे विकत घेणारी दुकाने असतात का? कृपया माहीत असल्यास सांगा.
खरे तर कोणत्याही कार्याला केवळ प्रयत्नाची गरज असते …
तसाच एक साधा प्रयत्न या बागलाण ,नाशिक प्रांतात शालेय साहित्यांचे वाटप दि .१९-२० जुलै २०१४ वाटप या दरम्यान केला होता …(http://www.maayboli.com/node/50067)
या कार्यातून काही मिळेल याचा कधीच विचार नाही केला .…
आपल्या कडे खूप काही आहे आपण फक्त खूप काही मधील काही अंश वाटप करतोय इतकाच …
त्या कार्यक्रमा मधून बागलाण मध्ये नवीन क्रांतीच घडली असेच म्हणावे लागेल …
प्रत्येकाच्या मनात आपण आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेवू शकतो । हीच नवी भावना तयार झाली . एक एक माणूस मिळत गेला, तेथे दडलेल्या प्राचीन ठेवा स्वतःहून समोर येत
स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.
आपण एक स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत असतो . असेच एक सुराज्याचे स्वप्न आई जीजाऊने पहिले 'श्रीमंतयोगी "शिवरायांच्या रूपाने साकार केले ... या स्वप्न पूर्तीसाठी त्यांना साथ लाभली ती या निष्ठावंत आणि उभ्या सह्याद्रीची …
पण आज त्यांचे सुवर्ण स्वप्नाची अनास्था आपण उघड्या डोळ्याने पाहत आलो , ज्यांच्या अंगाखांदयावर आपल्या पूर्वजांनी पराक्रमाचे रक्त वाहिले त्यांची अवस्था काय आहे आज ? त्यांच्या चिरा चीर्यातून मदतीची आर्त आपणास का ऐकू येत नाही ??
महिला दिन सामाजिक उपक्रम २०१४ आढावा
नेहमीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोलीवर आवाहन व घोषणा केली. या आवाहनातून वाचकांना त्यांच्या माहितीत असलेल्या, चांगले काम करणार्या गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे ते कळविण्यास सांगितले. थोड्याच दिवसांत आपल्याकडे सात सेवाभावी संस्थांची माहिती व त्यांची निकड काय आहे याची एक मोठी यादीच जमा झाली. त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोलीवर एक जाहीर आवाहन केले.
“मैत्री शाळा 100 दिवसांची – आपल्या गावी” २०१४- २०१५
मेळघाट उपक्रमाचे स्वरूप.
''दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो |
जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात || ''