अट्टाहास कशाला ना
नेहमीच चांगलं दिसण्याचा?
दहा छान फोटो काढून
एकच फेसबुकवर टाकण्याचा?
दिसायचं कधीतरी आहोत तसेच
आणि लोकांनाही बघू द्यायचं.
अट्टाहास कशाला ना
सर्वांच्या बरोबरीने प्रमोशनचा?
बाकीचे थांबले म्हणून
आपणही उशिरापर्यंत थांबण्याचा?
जायचं निघून वेळ झाल्यावर
आणि बोलू द्यायचं बोलणाऱ्याना.
अट्टाहास कशाला ना
घर टापटीप ठेवण्याचा?
कोणी येईल म्हणून
दर थोड्या वेळाने केर काढण्याचा?
बसू द्यायचं येणाऱ्याना पसाऱ्यात
आणि रमून जायचं फक्त गप्पात.
अट्टाहास कशाला ना
नेहमीच हसत राहण्याचा?
कितीही आतून तुटले
तरी ताठ उभे राहायचा?
गेल्या आठवड्यात माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी.
आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते. मात्र पाहुण्यांच्या दृष्टीनी हा अनुभव काही एकमेवाद्वितीय (unique) नसतो.
शुभेच्छा नव-वर्षाच्या
करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा
मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना
झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
काबूलमध्ये रहात असताना तिथल्या स्त्रियांच्या स्थितीविषयी विश्वसनीय माहिती जाणून घेण्यासाठी एक उत्तम संकेतस्थळ मला सापडलं होतं: ते होतं www.rawa.org. ‘रावा’ हा शब्द ‘Revolutionary Association of Women of Afghanistan’ या संघटनेच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांना घेऊन बनवलेला शब्द. (स्थानिक भाषेतलं नाव आहे: Jamiat-E-Inqalabi Zanan-E-Afghanistan). या संकेतस्थळावर एक महत्त्वाचं वाक्य लक्ष वेधून घेत. “जर तुम्ही स्वातंत्र्यप्रेमी असाल, आणि मूलत्त्ववाद्यांच्या विरोधात असाल, तर तुम्ही ‘रावा’सोबत आहात!
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
नमस्कार ,
रायगड जसे संपूर्ण देशाचे प्रेरणा स्थान तसेच आई जिजाऊचा पाचाड येथील वाडा देखील एक शक्तीपीठच, शिवरायांच्या आणि किल्ले रायगडाच्या संपुर्ण हालचालीचे मुक साक्षीदार .…
आपल्या भारत कसे एक समृद्ध देश "संकृती - परंपरा" हा आपला आत्मा त्यात महाराष्ट्र म्हणजे गडकिल्ल्याच्या राष्ट्र , म्हणतात ना " इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाच " असा समृद्ध आणि पराक्रमी आपला महाराष्ट्र .
पण याच महाराष्ट्रात पुरातन वास्तु विषयी नेहमीच उदासीनता जाणवत आली , सरकार काही करत नाही अशी बोंब प्रत्येकाची
कुठे फिरून आले की लगेच त्या आठवणी लिहून काढायची सवय म्हणा, हौस म्हणा किंवा विरंगुळा म्हणा, आहे खरा! हे काम करायला मजा येते आणि नंतर त्या आठवणी कधीतरी वाचताना गंमत वाटते. पण सगळेच अनुभव व्यक्त करता येतातच असं नाही अन काही वेळा सांगावेसेही वाटत नाही तो आपला सुखद ठेवा असतो... आठवणींच्या गाभार्यात मखमली वेष्टणात गुंडाळून ठेवलेला. फक्त आणि फक्त आपणच त्याचे खजिनदार व राखणदार.
आपल्याला वेगवेगळ्या माहिती स्रोतांद्वारे अनेक खात्रीशीर, सेवाभावी व लोकहितकारी अशा सामाजिक प्रकल्प व उपक्रमांची माहिती नित्यनियमाने मिळत असते. सोशल मीडियातून तर अशी माहिती रोजच प्रसृत होत असते. खात्रीलायक, नोंदणीकृत संस्थांद्वारे जसे मोठे उपक्रम व सेवाकार्य प्रकल्प हाती घेतले जातात तसेच अगदी छोट्या पातळीवरही एकट्या दुकट्या लोकांनी मोठ्या तळमळीने चालू ठेवलेल्या कल्याणकार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते खरी, परंतु ही माहिती इतर लाटांमध्ये विरूनही जाते. तर या धाग्याचा उद्देश हा की, अशा प्रकारचे चांगले काम व उपक्रम संकलित स्वरूपात आपल्या माहितीसाठी एकत्र पाहाता यावेत.
यावर्षी एकूण जमा झालेल्या देणगीतील रुपये २५,०००/- (पंचवीस हजार) फक्त एवढी देणगी सावली सेवा ट्रस्टला देवदासींच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्यात आली.
सदर देणगीतून ट्रस्टने मुलांच्या शाळा-कॉलेजेसचे शुल्क भरणे तसेच गणवेश, चपला, बूट, दप्तरे इत्यादींची खरेदी केली. त्यांच्या पावत्या त्यांनी पाठवल्या आहेत.
तसेच देणगीदार आणि सावली सेवा ट्रस्टला मदतीचा हात पुढे करणार्या सर्व स्वयंसेवकांचे आभार मानणारे पत्रही त्यांनी मुलांच्या प्रगतीच्या अहवालासकट पाठवले आहे.
१) आभारपत्र