अमेरीकेतील दुसर्‍या पिढीतील मुलांचा जलसंधारण प्रकल्पासाठी मदतीचा हात

Submitted by विकासदेशपांडे on 16 May, 2016 - 19:21

अमेरीकेतील बॉस्टन भागातील काही शा़ळेतील (भारतीय / मराठी मूळ असलेल्या) मुलांनी उत्साहाने चालू केलेल्या एका समुहदान (क्राउड फंडींग) प्रकल्पाबद्दल माहिती आणि आवाहन... मुलांनी तयार केलेली एक अ‍ॅनिमेटेड चित्रफित येथे पहाता येईल.

अहमदनगर जिल्ह्यातील फक्रबाद नामक अतिग्रामिण भागात इतर भागांप्रमाणेच पाण्याचे दुर्भिक्ष आहे. गेले चार वर्षे दुष्काळ पडल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी जवळपास ४०० फुटांनी खाली गेली आहे. येथील शेतकर्‍यांचे तसेच एकंदरीत गावातील जनतेचे हाल चालले आहेत. पाणी नसल्याने स्थानिक कामांवर आपत्ती आली आहे. त्याचे परीणाम घरादारात आणि मुलांच्या शिक्षणावर पण होऊ लागले आहेत.

त्यावर उपाय म्हणून १९७३ साली अधिकृत नोंदवल्या गेलेल्या आर एस एस जनकल्याण समितीने स्थानिक लोकांना एकत्र करून हा प्रश्न सोडवण्याचा ध्यास घेतला. या प्रकल्पामधून ८ कोटी ५५ लाख पाणी साठवण्याची आणि त्याच्या आठपट पाणी झिरपून भूगर्भाची पातळी वाढवण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. त्यातून जवळपास ५० एकर शेतजमिन आणि २०० एकर सभोवतालचा परीसर बहरणार आहे. हा प्रकल्प चालू असताना निघालेला मुरूम आणि माती ही इतरत्र रस्ता तयार करण्यासाठी वापरून गाव अधिक बाहेरच्या भागासाठी जोडण्याचा प्रकल्प देखील आपोआप केला गेला.

या प्रकल्पाचे वैशिष्ठ्य असे की त्यात आधी गावकर्‍यांनी स्वत:चे पैसे आणि श्रम पणाला लावले. त्याला मग प्राज फाउंडेशनने सढळ हाताने मदत केल्याने प्रकल्प जवळपास नव्वद टक्के पुरा झाला. तरी देखील अजून अमेरीकन डॉलर्सच्या हिशेबात $१०,००० ची अवशक्यता आहे. त्या संदर्भात त्याच भागातील रहीवासी आणि या प्रकल्पात पहील्यापासून असलेले ज्येष्ठ नागरीक श्री माणिकराव देशपांडे (प्रस्तुत लेखकाशी नाते नाही) यांनी त्यांच्या बॉस्टनमधील स्नेहसंबंधियांशी संपर्क साधून विचारणा केली... ही जेंव्हा मुलांनी ऐकली तेंव्हा त्यांना आपणहून काहीतरी करावेसे वाटले आणि Support water conservation project in drought hit त्यांनी चालू केले.

या प्रकल्पासाठी पैसे गोळा करून ते जास्तित जास्त तसेच योग्य आणि कायदेशीर मार्गाने मिळावेत म्हणून अमेरीकेतील सेवा इंटरनॅशनल या संघटनेने पुढाकार घेतला. सेवा इंटरनॅशनल ही अमेरीकेत इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसेसच्या नियमानुसार ५०१(c)(3) म्हणून, म्हणजे थोडक्यातविनानफा तत्वावर चालणारी सेवाभावी संस्था म्हणून नोंदवली गेली आहे. (अमेरीकेत यामुळे tax deduction चा लाभ घेता येऊ शकेल).

आवाहन

अमेरीकेतील आणि जगात कुठेही असलेल्या मायबोलीकरांना विनंती की या प्रकल्पाच्या पानाला भेट द्यावीत आणि शक्य असेल त्यानुसार मदत करावी. तसेच आपल्या स्नेहसंबंधियांना देखील अवश्य सांगावेत...

डॉलर्सच्या रुपात नक्की किती केलीत यापेक्षा केलीत याला अधिक महत्व आहे कारण जसे आपले दान हे दुष्काळनिवारणासाठी आणि शेतकर्‍यांच्या उद्धारासाठी वापरले जाणार आहे, तसेच या दानामुळे आपण काही तरी चांगले काम केले तर आपल्याला मोठ्या लोकांकडून प्रतिसाद मिळू शकतो असे नवीन पिढीला वाटून भारताशी आणि (अक्षरशः) मराठी मातीशी नाते जोडता येणार आहे.

मुलांच्या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास येथे संपर्क साधू शकता तसेच माझ्याशी vvdeshpande (at) gmail (dot) com वर संपर्क साधू शकता.

फक्राबादच्या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया श्री. माणिकराव देशपांडे यांच्याशी manikdeshpande1950 (at) gmail (dot) com वर अथवा +91 94214 36703 वर संपर्क साधावात.

आर एस एस जनकल्याण समितीबद्दल ची माहिती त्यांच्या संस्थळावरून:

Name of Institution: Rashtriya Swayamsevak Sangh Jankalyan Samiti Maharashtra Prant

Date of Formation : 9th February 1973

Constitutional Details: Constituted under the Society Registration Act and Bombay Public Trust Act

Society Registration Act: MAH-805 PUNE

Bombay Public Trust Act: F 617 PUNE

Income Tax Permanent Account Number (PAN): AAATR1130J

Section 80G Approval: PN/CIT-III/Tech/80G/274A/2009-10/1567 Dated 27th October 2010

Foreign Exchange Contribution Regulation Act Approval: 083930321

Group content visibility: 
Public - accessible to all site users