मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
मुंबई ग्राहक पंचायत पुणे विभाग
ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था
सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,
पहिल्या भागाच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल, तसेच प्रतिक्रिया/सूचनांबद्दलही धन्यवाद.
मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन
नमस्कार,
आज गुढीपाडवा, आजच्याच दिवशी म्हणजे 1975 च्या गुढीपाडव्याला मुंबई ग्राहक पंचायतीची गुढी रोवली गेली. 41 वर्षे अव्याहत पणे ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ तसेच सदस्यांकरीता उपयोगी वाणसामान, वस्तुंचे मासिक वितरण अशा विविध उपक्रमांतून मुंबई ग्राहक पंचायतीचे काम वाढतच आहे. आज जवळपास 36000 कुटुंब सदस्य संख्या असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीचा वटवृक्ष बहरतच आहे.
१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने...
"ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे; उत्पादक, व्यापारी, सेवांचे पुरवठादार इ. वर्गांचा तो पोशिंदा आहे, त्याच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती मिळते इ. वाक्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात वाचतांना मन सुखावते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकाला कशी वागणूक दिली जाते याचे दर्शन याच संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सत्यकथांवरून घडते. ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती स्थान आणि त्याचे मूलभूत हक्क यांचा प्रथम उच्चार केला तो अमेरिकेचे प्रे. जॉन एफ. केनेडी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून तेथील प्रतीनिधीगृहात १५ मार्च १९६२ रोजी केलेल्या पहिल्या भाषणात! आपण सर्वजण ग्राहक आहोत.
