सेवा

सगुण स्वरूप स्वामी गजानन

Submitted by कविन on 23 August, 2020 - 08:42

सगुण स्वरुप स्वामी गजानन
आनंदनिधान स्वामी गजानन

तुच माझा राम, तुच माझा शाम
कैवल्याचे धाम तुची, मुखी तुझे नाम

मी तुझे बालक, स्वामी गजानन
आनंदनिधान स्वामी गजानन

करुणाकरा तू, तूची दयाळा
माता पिता तूची, सखा तू कृपाळा

माहेरची माझे स्वामी गजानन
आनंदनिधान स्वामी गजानन

संकटात येसी, तूची रे धावुनी
योगायोग तूची, देसी घडवुनी

भक्तांची काळजी, तुला गजानन
आनंदनिधान स्वामी गजानन

आशिर्वचन द्यावे, हेची आता देवा
सत्संग घडावा, घडो नित्य सेवा

कृपाछत्र माझे स्वामी गजानन
आनंदनिधान स्वामी गजानन

अमेरीकेतील दुसर्‍या पिढीतील मुलांचा जलसंधारण प्रकल्पासाठी मदतीचा हात

Submitted by विकासदेशपांडे on 16 May, 2016 - 19:21

अमेरीकेतील बॉस्टन भागातील काही शा़ळेतील (भारतीय / मराठी मूळ असलेल्या) मुलांनी उत्साहाने चालू केलेल्या एका समुहदान (क्राउड फंडींग) प्रकल्पाबद्दल माहिती आणि आवाहन... मुलांनी तयार केलेली एक अ‍ॅनिमेटेड चित्रफित येथे पहाता येईल.

नर्स / आयाबाईंची सेवा देणार्‍या संस्था अथवा व्यक्ती

Submitted by काया on 19 March, 2013 - 07:06

मी बोरिवली / दहिसर भागात सेवा देणार्‍या अशा संस्था अथवा व्यक्ती यान्च्या शोधात आहे. आमच्या घरी राहणार्‍या आणि व्रुद्धापकाळाने अन्थरूणाला खिळून असलेल्या आमच्या नातेवाईकासाठी (वय वर्षे ८९) दिवसभरासाठी एका आयाबाईची लवकरात लवकर गरज आहे.
तर अशा सन्स्थान्चे पत्ते अथवा फोन नम्बर कुणाला माहित असल्यास कृपया कळवावे.
(अथवा हि माहिती मायबोलीवर उपलब्ध असल्यास लिन्क द्यावी.)

Subscribe to RSS - सेवा