बागकाम

चवळी

Submitted by सायली मोकाटे-जोग on 28 September, 2017 - 00:39

काही दिवसांपूर्वी चवळी काढली आणि लक्षात आलं, चवळीला भुंगा लागलाय. कडधान्यं मी शक्यतो फ्रिजरमध्ये टाकते म्हणजे किडे-भुंग्यांचा त्रास होत नाही. नेमकी ही नवी आणलेली चवळी गडबडीत बाहेर राहून गेली. संपवायच्या दृष्टीने मग मी ती सगळीच भिजवली. ‘रोजच्या व्यस्त वेळापत्रकात विसरघोळ घातला की हे असं पुढे काम वाढतं’… डोक्यातल्या विचार भुंग्यासोबत भिजलेली चवळी पटापट निवडायला घेतली. नेहमीसारखा खराब भाग बाजूला काढून उरलेलं दल घेण्याची काटकसर बाजूला ठेवत मी भुंगा लागलेल्या सगळ्या आख्या चवळ्याच बाजूला काढल्या आणि पुढच्या स्वयंपाकाला लागले.

शब्दखुणा: 

अमेरिका: थंडी सुरु होण्याच्या अगोदर घरात कुंड्या आणताना तुम्ही काय काळजी घेता?

Submitted by अजय on 11 September, 2017 - 11:40

आयुष्यात दुसर्‍यांदा काहीतरी बागेत लावायचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात झणझणीत मीर्च्या लावल्या होत्या काही वर्षांपूर्वी. पण ज्या आल्या त्या काकडीसारख्या खाता येतील अशा सपक आल्या. त्याचं खापर बोस्टनच्या हवेवर फोडण्यात आलं. या वर्षी आलं लावलं, ते आलं. पण आल्याचं झाड खूप हळु वाढतं. जमीनी बाहेर कोंब यायला ५-६ आठवडे लागले. आता कुंडीत ४ आणि जमिनीमधे ६ अशी रोपटी आहेत. नेटवर बोस्टनच्या हवेत आले बाहेर जगते का नाही यावर दुमत आहे. त्यामुळे कुंडीतली घरात आणि जमिनीतली तशीच या हिवाळ्यात ठेवून प्रयोग करून पाहणार आहे.

विषय: 

पंख पसरून उडणारी डुकरे

Submitted by उडता डुक्कर on 1 August, 2017 - 08:30

पंख पसरून उडणारी डुकरे

तू माझे काय झाले याची पर्वा केली नाहीस
आणि मी हि तुझी
कंटाळा आणि वेदनांशी सामना करीत आपण चाललो आहोत वेड्यावाकड्या मार्गावर
कधीतरी पावसाकढे बघत
कोणत्या नालायकाला दोष दयावा याचा विचार करीत
आणि बघत ती पंख पसरून उडणारी डुकरे

-उडता डुक्कर

(रूपांतरित / आधारित / प्रचोरीत)

आम्ही सारे नवशिके !!!!!!

Submitted by अतरंगी on 15 July, 2017 - 05:28

लोकांच्या मते एक वय असतं उत्साहाचं, उमेदीचं, काहीतरी शिकण्याचं, करून दाखवण्याचं........ त्या मताला कधीही काडीमात्र सुद्धा किंमत देऊ नये. Wink

पण कॉलेज संपलं, नोकरी लागली, लग्न संसार यात अडकलं की नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा उत्साह कमी होत जातो. वय, वेळ, affordability, संकोच, संसाराच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या नजरा/टोमणे.... एक ना अनेक कारणं....

अरे आता या वयात कुठं जाऊ गाडी शिकायला?

अरे पण वेळ कुठंय? मुलांच्या शाळा, माझा जॉब, घराची कामं, जाणार कधी?

भारताच्या पुढचे प्रदुषणाचे आव्हान !!

Submitted by मिलिंद जाधव on 8 July, 2017 - 13:37

डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक
गार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.

श्रीलंका : लुनुगंगा इस्टेट : आर्किटेक्ट जेफ्री बावा यांचे विकांत घर

Submitted by अ'निरु'द्ध on 10 June, 2017 - 16:21
lunuganga estate

श्रीलंका : लुनुगंगा इस्टेट : आर्किटेक्ट जेफ्री बावा यांचे विकांत घर...
(Srilanka : Lunuganga Estate, The Weekend Cottage of Architect Geofferrey Bawa)

आमची काही व्यावसायिकांची एक study tour प्रथितशय श्रीलंकन आर्किटेक्ट जेफ्री बावा यांची कामे बघण्यासाठी श्रीलंकेला गेली होती.

त्यांनी बनवलेल्या वास्तु, हॉटेल्स हे पाहिल्यानंतर पुढचा टप्पा होता त्यांचे विकांत घर (Week End Cottage) पहाण्याचा ज्याचं नावं आहे "लुनुगंगा इस्टेट".

प्रचि -०१ : तिथे जाण्यापूर्वी ह्या एका छान हॉटेलमधे आम्ही पोटपूजा केली.

हळदी चे पान

Submitted by Rupali Akole on 7 June, 2017 - 08:37

हळदी ची कुंडीत लागवड,त्याच्या पानांन ची पाककृती,आयुर्वेदिक महत्व इत्यादि ची माहिती हवी आहे.

बुलबुल येती आमच्या घरा...

Submitted by अ'निरु'द्ध on 17 May, 2017 - 06:11

बुलबुल येती आमच्या घरा...
(The Bulbul Babies At Our Balcony)

(Red Vented Bulbul)

निसर्गसेवक मित्र

Submitted by सेन्साय on 26 March, 2017 - 13:46

पर्यावरण हा एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे..... त्यावर निसर्गातील सहजीवन जीवन अवलंबून आहे..... आजच्या आपल्या जीवनशैलीमुळे सर्वच बाबीत समतोल बिघडत चालला आहे व त्याचे परिणाम सर्वत्र जाणवू लागले आहेत.... त्यासाठी आपण सर्वानी पर्यावरण संवर्धनाचे पर्याय निवडले पाहिजेत, हे तर सर्वच सुजाण नागरिकांना पटत असते मात्र नकी काय करायचे ह्याची माहिती व शास्त्र शुद्ध ज्ञान बरेचदा नसते. इच्छा शक्ती उत्तम असली तरी योग्य माहितीच्या अभावाने उचित कार्य घडत नाही व हताश उद्गार काढून हे विषय काळाच्या ओघात विस्मरणात जातात. ह्यासाठी आधी निसर्गाच्याच आपल्या छोट्या मित्रांची थोडी ओळख करून घेवूया.

चांगले आंबे विक्रेते हवे आहेत

Submitted by झंपी on 25 March, 2017 - 21:46

कोणाला चांगले हापुस, पायरी वगैरे आंबे विक्रेते माहीती आहेत का?

ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मित्र/परीवारांनी अनुभव घेतला आहे.

मला मुंबईत कोणाला तरी भेट पाठवून द्यायचीय. ऑनलाईन पैसे भरायचे असतील तर उत्तम.
नसली तरी पैसे पोस्ट करेन पण खात्रीशीर ठिकाण माहीती हवे आहे. ( काळेबंधू आंबेवाले नको आहेत, खूपच वाईट अनुभव आहे दोन वर्षाचा.

Pages

Subscribe to RSS - बागकाम