चांगले आंबे विक्रेते हवे आहेत

Submitted by झंपी on 25 March, 2017 - 21:46

कोणाला चांगले हापुस, पायरी वगैरे आंबे विक्रेते माहीती आहेत का?

ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मित्र/परीवारांनी अनुभव घेतला आहे.

मला मुंबईत कोणाला तरी भेट पाठवून द्यायचीय. ऑनलाईन पैसे भरायचे असतील तर उत्तम.
नसली तरी पैसे पोस्ट करेन पण खात्रीशीर ठिकाण माहीती हवे आहे. ( काळेबंधू आंबेवाले नको आहेत, खूपच वाईट अनुभव आहे दोन वर्षाचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हाट्स अप वर एक पोस्ट आली आहे आंबा वितरणाबाबतीत एका ग्रुपची . अर्थात मी काही खरेदी केलेली नाही . इथे शेयर करू कि नको या संभ्रमात आहे Happy

आंबे म्हणजे आंबेच

आजोळी कोणीच न राहिल्याने इकडे तिकडे आंबे विकत घेवून खावे लागतात. आता तर कोणाला भेट द्यायचे आहेत तेव्हा खात्रीचे विक्रेते हवेत.

रानडे रोड,दादर येथे पणशीकर दुकानाजवळ "जाधव बंधू" असतात. खात्रीशीर आणि चांगले आंबे असतात. ख़राब निघालाच तर बदलून पण देतात..

ही जाहीरात नाही, पण आंबे खरच छान असतात.

https://www.placeoforigin.in/mangoes ह्या साईटवरुन मी गेल्या वर्षी आंबे पाठवले होते.खाणार्‍याने चांगले होते असे म्हटले होते.खखोतोजा.

झंपी,
www.mangowale.com
चांगली साईट आहे. मागच्या वर्षी लंडन ला पाठवले होते आंबे.
फळ कसं होतं माहित नाही.

मी तुम्हाला आंबे मुंबई मध्ये देवू शकतो. मी देवगडचा आहे आणि आंबे माझ्या सासर्यांच्या घरचे आहेत. नैसर्गिकरीत्या गवतात पिकवलेले आहेत. तुम्ही मला ९४२११४६४८६ या नंबर वर फोन करु शकता. अधिक माहिती देईन.

देवगड हापूस मुम्बईत
गेल्यावर्षी घेतले होते . छान होते.

आता मेसेज आला आहे त्यान्चा.
नम्बर ८०८७९४८४४२ (सुरेश) Andheri to Borivali
give him reference Mr Patkar