बागकाम

फुलझाडं (Nature's Beauty)

Submitted by अक्षता08 on 4 April, 2020 - 23:30

बागकामाची किंवा झाडांची कुणाला आवड असो वा नसो परंतु फुलझाडं किंवा फुलांची आवड नसणाऱ्या व्यक्ती तुरळकच.
फुलांचे विविध प्रकार आहेत.काही फुले फक्त शोभेची असतात तर काहींचा गंध अगदी सुरेख असतो, काहींचा उपयोग खाण्यासाठी केला जातो तर काहींचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
फुलं कोणत्याही प्रकारची असो ते आपलं मन प्रसन्न करण्याच काम नक्कीच करतात.

विषय: 
शब्दखुणा: 

बाटलीतलं झाडं -भाग 2 (hanging pots)

Submitted by अक्षता08 on 29 March, 2020 - 00:33

फ्लॅट सिस्टिममध्ये दोन पद्धतीच्या बागकामाला वाव असतो, Balcony gardening आणि Window gardening. त्यामध्येही प्रामुख्याने window gardening मध्ये कुंड्या ठेवायला अतिशय कमी जागा असते. Hanging pots हा प्रकार कमीत कमी जागा व्यापतो. (ही कल्पना मला सुचलेली नसून मी एका व्हिडीओ मध्ये बघितलेली आहे)

विषय: 

बाटलीतील झाडं (Easy to grow)

Submitted by अक्षता08 on 22 March, 2020 - 00:07

घरी कमी जागा असल्यामुळे, वेळ नसल्यामुळे बर्‍याचदा आवड असुनही आपल्याला झाडं लावता येत नाहीत. परंतु, झाडं कुंडीतच लावली पाहिजे हे गरजेचे नाही. बाटलीमध्येही आपण झाडं लावु शकतो. वापरात नसलेल्या बाटलीमध्ये (किंवा ग्लासात) पाणी घालुन त्यात आवडत्या झाडाची/ रोपट्याची फांदी कापून ठेवावी. मात्र, झाडाची जशी वाढ कींवा जसा बहर आपल्याला मातीत असलेल्या रोपट्याला मिळेल तसाच पाण्यात ठेवलेल्या रोपट्याला नाही मिळणार. परंतु, काही नसण्यापेक्षा काहीतरी असणं कधीही चांगल.

विषय: 

कढीपत्ता (Curry leaves- Easy to grow tropical plant )

Submitted by अक्षता08 on 15 March, 2020 - 00:22

घराघरात दररोज लागणारी गोष्ट म्हणजे कढीपत्ता.हाच कढीपत्ता आपल्याला घरातुनही मिळू शकतो.

विषय: 

Pudina (पुदीना)- a plant to start kitchen gardening

Submitted by अक्षता08 on 8 March, 2020 - 00:29

एका संध्याकाळी बाल्कनीमध्ये चहा पीत असताना अचानक विचार आला. आपण का म्हणून balcony/kitchen garden सुरु करु नये ?
पण ज्या गोष्टीत आपल्याला शुन्य अनुभव किंवा माहिती आहे त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ?
मग videos बघुन, blogs आणि पूस्तकं वाचून
प्राथमिक माहिती मिळाली.
पण जोपर्यंत आपण स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत पूस्तकी ज्ञान (therotical knowledge) उपयोगी नाही.
तर, शेवटी पुदीना लावायच ठरलं
पण पुदीनाच का?
ज्यांना बागकामामधला काही अनुभव नाही ते ही पुदीना लावुन, जगवुन वाढवु शकतात म्हणुन.

विषय: 
शब्दखुणा: 

म्हशींसंग झोपून झोपून , त्याचा रेड्यावानी झाला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 2 March, 2020 - 06:56

म्हशींसंग झोपून झोपून

त्याचा रेड्यावानी झाला

बा ला वाटलं मोठा झालाय

लगीच करू उभा मांडवाला

पोरी बघितल्या साऱ्या त्यानं

निवडली येक परी

सुनबाई मोठ्ठी झ्याक दिसतेय

बाजूच्या पोरींपेक्षा बरी

दिला ढकलुनी पाटावरती

त्याचं हात पिवळं केले

मधुचंद्राला बघून जनावर

तिच्या पोटात गोळे आले

धनी म्हणू का अजून कुणी ?

ह्यो जनावरावानी पकडतो

इचार कसला करीतच न्हाई

फक्त खालीवर त्यो चढतो

रात सरली भीतीमंदि अन

किलबिल पक्ष्यांची झाली

सुनबाईला बघण्यासाठी

शब्दखुणा: 

Succulents & hoya (सक्युलेंट्स आणि होया)

Submitted by अक्षता08 on 1 March, 2020 - 09:14

मला succulents हा प्रकार फार प्रीय आहे.
एक तर त्यांना पाण्याची जास्त गरज लागत नाही. म्हणजेच, रोज पाणी घालण्याची चिंता नाही.आणि दूसर म्हणजे ते इतके गोंडस असतात की ते घराच्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवल्यावर घराची शोभा वाढवतात.

तर, succulents म्हणजे नक्की काय ?
succulents हा झाडांचा असा वर्ग आहे ज्यांना भरपुर सुर्यप्रकाश आणि खुप कमी पाण्याची आवश्यकता असते. प्रामुख्याने वाळवंटात व कमी पाण्याच्या प्रदेशात हे बघायला मिळतात.

विषय: 

आनंदछंद ऐसा - स्वाती२

Submitted by स्वाती२ on 28 February, 2020 - 08:43

मी जेव्हा लहानपणीच्या आठवणीत मागे मागे जाते तेव्हा मला कायम आजोबा, मामा, आई, गडीमाणसे यांच्यासोबत आजोळच्या किंवा माहेरच्या आवारात लूडबूड करणारी मी दिसते. कोकणात रहाताना बागकाम हा जगण्याचाच एक भाग होता मात्र त्याचे खर्‍या अर्थाने छंदात रुपांतर झाले ते अमेरीकेत आल्यावर. भारतात असताना मला कुणी विचारले असते की तुझे छंद काय तर मी वाचन, विणकाम, हस्तकला वगैरे यादी दिली असती. पण म्हणताना आपण एखाद्या गोष्टीपासून दुरावल्याशिवाय तिचे महत्व जाणवत नाही तसे काहीसे माझे झाले. इथे अमेरीकेत लग्न होवून आले, दोन महिन्यात नव्याची नवलाई संपली, पानगळ सुरु झाली आणि काहीतरी टोचू लागले.

विषय: 

बागकाम अमेरीका २०२०

Submitted by स्वाती२ on 12 February, 2020 - 10:34

फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरु झालाय तेव्हा या वर्षीच्या बागकामाबद्दल गप्पा मारण्यासाठी धागा सुरु करत आहे.

आम्र-विक्री योग

Submitted by अनया on 27 September, 2019 - 21:12

मावळ भागातल्या एका खेड्यात आमची थोडी शेतजमीन आहे. नवऱ्याने मोठ्या आवडीने घेतली, तेव्हा अगदी माळरान होतं. त्याने दर आठवड्यात तिथे चकरा मारून, गावकऱ्यांशी मैत्री करून, कष्टाने-प्रेमाने त्या जागेला हिरवं केलं. एकट्यानेच. घरच्या आणि व्यवसायाच्या व्यापात वर्षावर्षात मी तिथे फिरकत नसे. तसाही माझा पिंड पूर्णपणे शहरी आहे. काय भाजी- फळे हवी असतील, ती भाजी बाजारातून पाव-अर्धा किलो आणावी आणि खावी एवढीच माझी झेप आहे. त्यामुळे ह्या लेखातही काही तांत्रिक चुका असल्या, तर पोटात घाला.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - बागकाम