जगप्रसिद्ध फिलाडेल्फिया फ्लावर शो ची जागा आणि तारखा दोन्ही पँडेमिकमुळे बदलल्या आहेत. त्यामुळे माझं बागकामाचं वेळापत्रक गंडलंय.
सेंट पॅट्रिक डे ला वाटाणे आणि हिवाळी भाज्या अंगणात लावणे वगैरे पूर्वापार आलेले संकेत आता नव्याने आत्मसात करायला लागणार 
तरी अर्थ डे चं निमित्त साधून हा धागा उघडतेय.
तुमचे यंदाचे प्लान काय, नवीन काय लावणार, शंका / कुशंका, रोपे, बी बियाणांचे ऑन लाइन किंवा इन पर्सन सोर्सेस अशा सगळ्या माहितीच्या देवाण घेवाणीसाठी हा धागा
नमस्कार!
दिनांक एक जुलै २०२१ पासुन माझ्या मुळ गावी म्हणजे करडकवाडी अर्थात मुकिंदपुर, ता. नेवासा, जि , अहमदनगर येथे शेती संबंधित व्यवसाय सुरु केला आहे.
सर्व प्रकाराची शेती अर्थात भाजीपाला, फळबाग, ऊस, मत्स्यशेती तसेच गावाकडील शेती, कुंडीतील शेती, टेरेस गार्डन, किचन गार्डन, इत्यादी सर्व प्रकाराच्या शेतीला लागणारे जीवाणु समृद्ध बायोस्लरी आणि फॉस्फेट रिच ऑर्गनिक मॅन्युअर (प्रोम) तयार करणे आणि विक्री करणे हा मुख्य उद्योग आहे.
नमस्कार, मला आमच्या बागकामाच्या व्यवसायाची माहिती द्यायची आहे. आमचा रोपांचा व्यवसाय आहे. शोभेची झाडं आम्ही विकतो. सविस्तर माहितीसाठी खाली लिंक देत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे काही अडचणी येत आहेत. एखाद्या नर्सरीला आवश्यक ती रोपे पुरवल्यावर त्या रोपांच्या रिकाम्या कुंड्या, आणि पॅकिंग करताना वजन जास्त होऊ नये म्हणून काढावी लागणारी माती/ कोकोपीट यांचा खूप साठा आमच्याकडे आहे जो आम्हाला विकत द्यायचा आहे. साधारण ४" मापाच्या कुंड्या आहेत आणि कोकोपीट, माती आहे. पुण्यात असतो. संपर्कासाठी नंबर देत आहे, इच्छुकांनी कृपया संपर्क करावा.
मने, उठ ! मार्च चा पहिला पंधरवडा उलटून गेला. नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे तुमच्याइथला जगप्रसिद्ध फ्लावर शो संपल्यालाही आठ दिवस झाले असते. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यात फ्लावर शो नाही. आसपास सगळीकडे फेब्रुवारीच्या अखेरीस झालेल्या हिम वर्षावाचे ढीग दिवसेंदिवस तसेच पडून होते. पण म्हणून हेलेबोअर्स आणि क्रोकसेस फुलायचे थांबले नाहीत. बर्फ वितळला तसे या फुलांच्या बरोबरीने अर्ली स्प्रिंग वीड्स जोमाने हजेरी लावू लागलेत. डॅफोडिलचे कंद माना वर काढतायत. ब्लू बर्ड्स आणि रॉबिन्स दिसायला लागलेत.
चिपळूणला सासरी एक तलाव आहे. त्यात अत्यंत सुंदर अशी फिकट गुलाबी रंगाची कमळं फुलतात. त्यातले एक-दोन कांदे आणुन बागेत लावायचा विचार आहे. कुंडीत लावता येतील का? आणि काय काय तयारी लागेल? चिखलात लावायचे की स्वच्छ पाण्यात? कुणाच्या बागेत आहेत का?
कागदोपत्री इथला स्प्रिंग सुरु झाला म्हणे. गार्डन सेंटर्स मधे बियांची पाकिटे, अंगणातल्या गवतासाठी वीड & फीड ची पोती , माती, कॉम्पोस्ट , सीड स्टार्टिंग मिक्स यांच्या बॅगा दिसायला लागल्या. फोर्सिथिया, मॅग्नोलिया, चेरी ब्लॉसम यांच्या फांद्या टपोर्या कळ्यांनी डवरल्या आहेत. क्रोकस , हायासिंथ, डॅफोडिल्स बहरले आहेत. बर्फाच्छादित रस्ते आणि अंगण काही काळा करता विसरायला हरकत नाही ( बहुतेक) .
इथल्या मंडळींचे बागकामाचे काय बेत यावर्षी ? विंटर सोइंग केलं का कोणी ? अर्ली स्प्रिंग व्हरायटीज काय काय लावणार ?
भारतात किंवा परदेशात विविध प्रकारचे बागकाम /शेतीकामासंबंधी लहान-मोठे अभ्यासक्रम आणि कार्यशाळा होत असतात. काहीवेळा प्रत्यक्ष जाऊन सहभाग घेणे अपेक्षित असते तर काही वेळा ऑनलाईन कोर्स किंवा वेबिनार असे स्वरुप असते. तुम्हाला अशा उपक्रमांबद्दल माहिती असेल तर ती माहिती इतरांना देण्यासाठी हा धागा.
मिनू* आईला म्हणाली " आई, मार्च महिना सुरु झाला . फ्लावर शो च्या जाहिराती झळकतायत जिथे तिथे. बियांचे, कंद मुळांचे कॅट्लॉग्ज यायला लागलेत. फोर्सिथिया, विच हेझल फुललेत इकडे तिकडे. क्रोकस आणि डॅफोडिल्स ची हिरवी पाती डोकावयला लागले. होस्टाचे कोंब उगवून आले. अजून मायबोलीवर धागा कसा आला नाही यंदाच्या बागकामाचा ? "
कोण कोण येणार फ्लावर शो बघायला यंदा ? बागकामाचे काय प्लान्स? लिहा इथे पटापट
https://theflowershow.com/plan-your-visit/show-info/