मनातले विचार

" कथा, कविता, लेख लिहिण्याची उदासीनता!"

Submitted by चंद्रमा on 27 May, 2021 - 05:18

....... खरं तर या विषयावर लेख लिहिण्याचा विचार खूप दिवसांपासून मनामध्ये घोळत होता. आज लिहू, उद्या लिहू असं करता करता राहूनच जायचं,! जाम कंटाळा यायचा. अशा प्रक्रियेला 'प्रोक्रास्टीनेशन' म्हणतात.म्हणजे आजचं काम उद्यावर आणि उद्याचं काम परवावर! तसं बघितलं तर प्रत्येक उदयोन्मुख लेखकाच्या मनामध्ये खूप सार्‍या कल्पना आकार घेत असतात. काही तो कागदावर उतरवतो तर कधी तो विचार मनातच राहून जातो. याला कारण म्हणजे आपल्या मनातील अनामिक भीती! आपले लिखाण इतरांना आवडेल की नाही! त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावर, काय प्रतिसाद देतील. ही माझी कल्पना बालिश तर नाही ना वाटणार!

विषय: 

विचार

Submitted by वर्षु on 23 April, 2019 - 05:12

मनामध्ये विचारांची गर्दी जेव्हा जेव्हा दाटून येते
नकळत डोळ्यातले पाणी केव्हातरी आटून जाते

मोती होऊन शब्दांचे कागदावरती उमटू लागते
विहंगम विचारांची गती हातातून निसटून जाते

केविलवाण्या नजरेने आभाळात पाहू लागते
त्याचवेळी एक सर मनाला माझ्या चाटून जाते

थंड शिडकावा तनामनात ती पेरून येते
आठवणींच गाठोड मस्तिष्कात भरून जाते

किती आणि काय काय मनाच्या डोहात साठवलेले असते
सुख आणि दुःखाच्या लहरीतच मग मी स्वतःच सामावून जाते

#राधिका (वर्षा गायकवाड)

Subscribe to RSS - मनातले विचार