जिवन

सारी उम्र हम मर मर के जी लिए!!

Submitted by Santosh zond on 20 April, 2021 - 22:13

सारी उम्र हम मर मर के जी लिऐ एक पल तो अब हमे जिने दो जिने दोओओ.....हे बोल आहे 3 ईडीयट्स मधल्या गाण्याचे,रोज तीच न्युज,पुन्हा तोच शब्द,पुन्हा तेच मन हेलावुन सोडणारे दृष्य,पुन्हा एकदा परीक्षांच्या वाढवल्या जाणार्‍या तारखा,हे सगळ होत असतांना अवतीभोवती होत जाणार वातावरण आणी या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांंची बिकट होत जाणारी मानसिकता,मध्येच असं वाटु लागतं की कदाचित एक दिवस हे सगळ संपेल,भीतीत वावरणाऱ्या या जगात जगण्याची एक उम्मीद पुन्हा मिळेल पण पुन्हा तोच भीतिदायक कानात घुमणारा अँब्युलन्सचा आवाज,पुन्हा तेच ओसाड पडलेले रस्ते,सध्या चालु असलेल्या कोरोना युद्धात शत्रू कोण आणी मित्र कोण हेच विद्यार्थ्या

जिवनाचे चक्रव्यूव्ह

Submitted by Rudraa on 30 March, 2021 - 07:06

चालता बोलता,
नकळत गुंतत राहिला.....
सुटता सुटेना गाठी ,
आयुष्याचा प्रत्येक क्षण गुत्यांत गुंतवला .....

पुर्ण झाले जाळे,
उमगले चकव्यूव्ह ......
निसटता घेता पाय ,
अंत काही सापडेना......

शोधता शोधता वाटा,
पुन्हा त्यात अडकला .....
अंताचा शेवट नाही ,
पण पुन्हा सुरुवातीस येऊन पोहचला .......

संपली जीवनयात्रा ,
थकला हा देह ........
नाही सापडली सुरुवात ,
नाही समजला त्यास त्याचा अंत......

रुद्रा.....

शब्दखुणा: 

याचे नाव जीवन

Submitted by सुरेखा मादनाईक on 22 September, 2019 - 10:19

चालणारे दोन पाय किती विसंगत?
एक पुढे नि एक मागे
पुढच्याला अभिमान नसतो,
मागच्याला कमीपणा नसतो
कारण त्यांना ठाऊक असतं
क्षणात हे बदलणारं असतं
याचचं नाव जीवन असतं

-सुरेखा मादनाईक

शब्दखुणा: 

हसत- हसत जीवन जगून तर बघ.

Submitted by अनिकेत भांदककर on 11 December, 2014 - 10:06

हसत- हसत जीवन जगून तर बघ.

नेहमी प्रसन्न राहील मन
कधी चिंतेला दूर सारून तर बघ

नाही मिळणार असफलता
कधी सफलतेची आशा करून तर बघ

नाही करावा लागेल अपयशाचा सामना
कधी जिंकण्याचा प्रयत्न करून तर बघ

कुणास ठाऊक कोणती नवीन उमंग जागी होईल
कधी आत्मविश्वास मनामध्ये भरून तर बघ

होऊन जाईल कठीण काम सोपे
कधी चेहऱ्यावर हलकेसे हास्य आणून तर बघ

कुणास ठाऊक एखादी नवीन वाट सापडेल
कधी हिमतीने कामाची सुरवात करून तर बघ

सहज ध्येय गाठता येईल जीवनाचे
हसत- हसत जीवन जगून तर बघ.

- अनिकेत भांदककर

शब्दखुणा: 

राजाराम सीताराम........भाग १०......एक गोली एक दुश्मन। ..भाग २

Submitted by रणजित चितळे on 11 December, 2011 - 10:31

ह्या आधीचे ९ भाग येथे वाचायला मिळतील

ह्या आधीचे..........

……………. उस किकर को दाये छोडके आना। पहले तीन लुंगा। बाकीची मुले छू झाली व मला मनातल्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या. बऱ्याच वेळाला त्या झाडाला शिवून झाल्यावर कॅप्टन गिलने, ज्यांनी ज्यांनी आतून स्वेटर घातले होते त्यांना काढायला लावून त्याची होळी पेटवली. किती जणांच्या आस्था त्या होळीत पेटल्या गेल्या असतील आम्हालाच ठाऊक. त्या दिवसा पासून पुढे कधी कोणी गणवेशात स्वतःहून फेरबदल करण्याच्या भानगडीत पडले नाही………….

गुलमोहर: 

पुढे सरकत रहा

Submitted by रणजित चितळे on 7 June, 2011 - 06:50

पुण्याच्या पीएमटी बस मध्ये जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा खिडकीवर जागे जागेवर लिहिलेल्या एका सूचनेकडे माझे लक्ष वेधले जाते. ‘पुढे सरकत राहा’ अशी सूचना दोन्ही कडच्या बाकांमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लिहिलेली असते. ही सूचना मागच्या दारातून येणाऱ्या प्रवाशांना उभे राहायला जागा मिळावी व, पुढच्या दारातून उतरणाऱ्या प्रवाशांना उतरण्याची सुविधा व्हावी अशा साठी असते.

ह्या एका वाक्याने माझ्या विचारांची गाडी बस सुरू होण्या अगोदरच सुरू होते. आपल्या आयुष्या साठी हे वाक्य किती सूचक आहे. वेगवेगळ्या पातळीवरून बघितले तर त्यातून केवढा बोध मिळतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कसं विसरणार?

Submitted by मी विडंबनकार on 24 March, 2011 - 03:22

आईच्या हातची न्याहरी,
आईच्या हातचं जेवण.
एवढं प्रेम पुढे कोण देणार?
आईच्या मऊ कुशिलाच काय,
आईने पाठीवर दिलेल्या धपाट्यालासुद्धा , कसं विसरणार?

माझ्यावर कुणी बोट उचललं,
तिला सहन होत नसे,
तिच्या दिलखुलास हास्यालाच काय,
तिच्या डोळ्यातील पाण्यालासुद्धा , कसं विसरणार?

तू बोलायला शिकवलेला एक एक शब्द
तू खाऊ घातलेला एक एक मायेचा घास
तू चालायला शिकवलेलं एक एक पाउलच काय
तर चालताना अडखळून पडताना सावरलेलंसुद्धा , कसं विसरणार ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

निम्मा रस्ता चालला

Submitted by पाषाणभेद on 23 October, 2010 - 01:45

निम्मा रस्ता चालला

पार्‍श्वभुमी:हिरो मोठ्या संकटात आहे. तो मनाला प्रश्न विचारतो. कोरस म्हणजे त्याचे +ve मनच आहे.
(एक दुसराही विचार असा करता येईल:-
रस्ता=जिवन, चालणे=जिवन जगणे, थांबणे= मृत्यू )

कोरसः
निम्मा रस्ता चालला
मागं वळतो कशाला?
म्होरं जायाचं जायाचं
आता थांबतो कशाला? ||धृ||
.
.
.
.
हिरो:
वाट अवघड, मधी दगड
बाजू करू कसा? ||१||

नाही माहित कुठं जायाचं

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम

Submitted by पाषाणभेद on 9 October, 2010 - 00:11

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम

(आज सकाळी नाशिकचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांची अंत्ययात्रा बघीतली. त्यांच्या नविन पंडीत कॉलनीच्या हॉस्पीटलाच्या शेजारच्या बिल्डींगमध्येच माझ्या कंपनीचे ऑफीस आहे. मी नाईट शिफ्ट करत होतो. ऑफीसमधल्या काचेमधून त्यांच्या अंत्ययात्रेचा सोहळा पाहत होतो. त्याचवेळी खालील कवीता सुचली. डॉ. पवारांना श्रद्धांजली. )

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम
जेव्हा जातो जीव, तेव्हा बोला रामनाम ||धृ||

जिवंत असता पुण्य कमवावे
पाप दुराचारा सोडूनी द्यावे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जिवन