भेटले

सरणावर ते स्वप्न भेटले

Submitted by जीजी on 2 July, 2021 - 07:11

जीवनभर मी ज्यास शोधले
सरणावर ते स्वप्न भेटले

भिरभिरणारे फूलपाखरू
बघुनी मज गालात हासले

बोलायाचे ठरवले मनी
पण ओठावर शब्द थांबले

हसतमुखाने करुन अलविदा
दुनियेने मज दूर लोटले

पून्हा हिच ती चूक भोवली
आभासाने हृदय धडकले

जीवन मृत्यू , खेळ चालतो
या खेळावर विश्व चालले

जी जी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - भेटले