सारी उम्र हम मर मर के जी लिए!!

Submitted by Santosh zond on 20 April, 2021 - 22:13

सारी उम्र हम मर मर के जी लिऐ एक पल तो अब हमे जिने दो जिने दोओओ.....हे बोल आहे 3 ईडीयट्स मधल्या गाण्याचे,रोज तीच न्युज,पुन्हा तोच शब्द,पुन्हा तेच मन हेलावुन सोडणारे दृष्य,पुन्हा एकदा परीक्षांच्या वाढवल्या जाणार्‍या तारखा,हे सगळ होत असतांना अवतीभोवती होत जाणार वातावरण आणी या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांंची बिकट होत जाणारी मानसिकता,मध्येच असं वाटु लागतं की कदाचित एक दिवस हे सगळ संपेल,भीतीत वावरणाऱ्या या जगात जगण्याची एक उम्मीद पुन्हा मिळेल पण पुन्हा तोच भीतिदायक कानात घुमणारा अँब्युलन्सचा आवाज,पुन्हा तेच ओसाड पडलेले रस्ते,सध्या चालु असलेल्या कोरोना युद्धात शत्रू कोण आणी मित्र कोण हेच विद्यार्थ्यांना समजत नहीये.आयुष्यभर पुस्तकांच ओझ सांभाळत सांभाळत परिस्थितीशी दोन हात करत एक विद्यार्थी रात्रंदिवस एक करुन शिकत असतो,रक्ताचं पाणी करुन शेतात कष्ट करणाऱ्या आईवडिलांचे चेहरे आठवुन एक विद्यार्थी शिकत असतो,अभ्यासाशिवाय त्याला काहीच पर्याय नसतो पण या सगळ्यानंतर सुद्धा त्याच्या हाती काय येतय तर काहीच नाही,कुठे परीक्षा न घेता उत्तीर्ण केलं जातंय तर कुठे आँनलाईन शिकवण्यांचा भडीमार केला जातोय पण या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांंच्या मानसिक परीस्थितीचा कुणी विचारच करत नाहीये मग त्यातुन येणारं नैराश्य,पुढे जाऊन त्याने जर टोकाचं पाऊल उचललच तर या सगळ्यांना जीम्मेदार कोण?

संतोष झोंड
(जि.औरंगाबाद)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाला उपदेश करण्याइतकी पात्रता नाही आणि दुसऱ्यांच्या अडचणी अनोळखी माणसाला शंभर टक्के समजणं कठीण आहे, पण..
धीर धरावा. सगळीकडेच कठीण परिस्थिती आहे. काळज्या करून करून, वाईट बातम्या ऐकून डोक्याला त्रास होत असतो. पण.हेही दिवस जातील. आपली आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांची काळजी घेत रहाणे. बचेंगे तो और भी लडेंगे!

>>>>>वावे
बरोबर आहे तमचं लेख वाचाल्याबददल धन्यवाद,हे दिवस तर निघून जातीलच पण यामध्ये विद्यार्थ्यांच जे नुकसान झालय त्याचाही भविष्यात विचार व्हावा एवढंच!!

धीर धरावा. सगळीकडेच कठीण परिस्थिती आहे. काळज्या करून करून, वाईट बातम्या ऐकून डोक्याला त्रास होत असतो. पण.हेही दिवस जातील. आपली आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांची काळजी घेत रहाणे. बचेंगे तो और भी लडेंगे! +१

महामारीच्या काळात परिस्थिती कठिण आहे... आणि प्रत्येकाचे नुकसान ( अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझो, मुकेश अंबानी, इलॉन मस्क आदी लोक वगळता) होत आहे. काहींचे आर्थिक, काहींचे मानसिक तर काहींचे दोन्ही. लहान मुले असतील, तर त्यांच्यावरचे अपेक्षांचे ओझे कमी करा.... एक संपुर्ण वर्षे वाया गेल्याने (तसे ते वायाही जात नाही) काही फरक पडत नाही हे त्यांना पटवून सांगा. सिर सलामत असेल तर पगडी पचास.
झळ सोसायची... ( लॉकडाऊनचे, बेरोजगारीचे , शैक्षणिक नुकसानीचे ) चटके सहन करायचे....

उगाच खोट्या " सकारात्मक " गोष्टी सांगून त्यांची सतत दिशाभूल करण्यात आणि परिस्थिती पासून पळून जाण्यात अर्थ नाही. नियमीत बातम्या वाचा, एका... महामारीच्या विरोधात हे युद्ध आहे. आणि प्रत्येकाला आपले योगदान द्यायचे आहे.

मनुष्यस्वभावाचे अनेक चांगले अनुभव पण याच काळात आले आहेत, तसेच अत्यंत ओंगळवाणे अनुभव पण मिळाले आहेत. या परिस्थिती मधे पण औषधांचा काळाबाजार, किंमती मधे अचानक अनेक पटींनी वाढ... पण त्याच वेळी प्रचंड तुटवडा असलेले आणि स्वत:ला मिळालेले वेंटिलेटर नाकारणारे.... जेणेकरुन ते दुसर्‍या "तरुणा" मिळावे अशी सद्भावना. कोरोनाच्या लसी मधे भेसळ....

आपण आपल्या परिने काळजी घेत रहायची. मानवतेची, आपल्या सहनशिलतेची एक परिक्षाच आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विज्ञानावर आधारित निर्णय हेच मानवतेला या महामारीतून बाहेर काढतील.

उदय, +१
बिनधास्त सिनेमाच्या शेवटी त्या कॉलेजच्या प्राचार्य मुलीच्या आईला सांगतात ते आठवलं - मुली लपून राहिलेल्या असतात त्यामुळे त्यांचं कॉलेज बुडतं. पण त्या प्राचार्य सांगतात की कॉलेज बुडलं तरी त्यांचं शिक्षण थांबलेलं नाही.
तसंच सध्याच्या काळात मुलांचं झालं आहे. पण चार भिंतींच्या आत मिळणाऱ्या पुस्तकी ज्ञानाइतकंच किंबहुना किंचित जास्त महत्त्वाचं ज्ञान हे जगात जगत असताना मिळत असतं. हा जगाची उलथापालथ घडवणाऱ्या महामारीचा अनुभव त्यांना खूप काही शिकवून जाईल. मुलांनी किंवा पालकांनी आजिबातच घाबरून जाऊ नये!

हा कोरोना काळ प्रत्येकालाच कसल्या ना कसल्या अडचणींना तोंड द्यायला लावत आहे. विद्यार्थी असो वा शिक्षक असो वा वकील, डॉक्टर, अ‍ॅक्टर अथवा सर्वसामान्य माणुस अगदी भिकारीही कोरोनामुळे येणार्‍या अडचणींचा सामना करत आहेत. जीवन-मरणाच्या खेळातून सही-सलामत बाहेर पडणे हेच एकमेव उद्दिष्ट ठेवणे सद्ध्या तरी क्रमप्राप्त आहे.

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान पुढे-मागे भरून येऊ शकतं परंतु गेलेला जीव पुन्हा परत येऊ शकत नाही. सर्वांनीच परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे असे मला वाट्ते.

उगाच खोट्या " सकारात्मक " गोष्टी सांगून त्यांची सतत दिशाभूल करण्यात आणि परिस्थिती पासून पळून जाण्यात अर्थ नाही. नियमीत बातम्या वाचा, एका... महामारीच्या विरोधात हे युद्ध आहे. आणि प्रत्येकाला आपले योगदान द्यायचे आहे.

+१११११ कडक.

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो,
चाकोरीचे खरडून कागद सहिस पाठवतो
व्याप नको मज कुठलाही अन ताप नको आहे
उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नांशी अवघ्या पर्वा करार मी केलं
मी न छळावें त्यांना त्यांनी छळू नये मजला ।

- संदीप खरे

रोज तीच न्युज,पुन्हा तोच शब्द,पुन्हा तेच मन हेलावुन सोडणारे दृष्य,
>>>>>>>
टीव्हीवरच्या न्यूज बघणे सोडा. आम्ही गेल्या मार्चपासून कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यापासून न्यूज चॅनेल लावलाच नाहीये.
उगाच अतिरीक्त नकारात्मकता वातावरणात भरून राहते.

पण या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांंच्या मानसिक परीस्थितीचा कुणी विचारच करत नाहीये मग त्यातुन येणारं नैराश्य,पुढे जाऊन त्याने जर टोकाचं पाऊल उचललच तर या सगळ्यांना जीम्मेदार कोण?
>>>>>>>
देव न करो अशी वेळ येवो.
पण जबाबदार कोणाला ठरवायचे झाल्यास मग मूळापर्यंत जावे लागेल. परीक्षेच्या निकालांवर आयुष्य अवलंबून असणारी, मुलांवर ताण टाकणारी आपली शिक्षणपद्धतीच सदोष म्हणावी लागेल.
दुसरे म्हणजे अश्यावेळी पालकांनी मुलांना धीर देत, त्यांच्या पाठीशी ऊभे राहत, हि एखादी परीक्षा, हे एखाद दुसरे शैक्षणिक वर्ष, जे काही असेल ते हे ईतकेच म्हणजेच अख्खे आयुष्य नाही हे मुलांच्या मनावर बिंबवायला हवे.
मला माझा अनुभव लिहावास वाटतोय, किंबहुना आधीही तो लिहायचा डोक्यात होतेच. बघूया कसे वेळ मिळतो ते..

<< दुसरे म्हणजे अश्यावेळी पालकांनी मुलांना धीर देत, त्यांच्या पाठीशी ऊभे राहत, हि एखादी परीक्षा, हे एखाद दुसरे शैक्षणिक वर्ष, जे काही असेल ते हे ईतकेच म्हणजेच अख्खे आयुष्य नाही हे मुलांच्या मनावर बिंबवायला हवे. >>

------- सहमत....
जिथे शक्य असेल तिथे इतरांना पण मदत करा. नोकरी गेली आहे , उद्योग धंदा / कामे नाही... आपल्या आवाक्यात असलेली मदर जरुर करावी.