प्रेम

ध्रुवतारा!

Submitted by mi manasi on 5 June, 2023 - 01:12

आवडलं असतं मला..
तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत जगायला
आवडलं असतं..तुझा चंद्र व्हायला

आवडलं असतं..
जर मीच असते तुझ्या हृदयात
कलेकलेने वाढणारं प्रेमसुद्धा
आणि दुराव्यातला विरहसुद्धा..
आवडलं असतं..
जर दोन्हीचं कारण मीच असते
आणि तसं तू म्हणाला असतास
असंख्य नक्षत्र ताऱ्यांना विसरुन..
मलाच शोधत हरवला असतास
तर आवडलं असतं मला.. हरवायला
आवडलं असतं..तुझा चंद्र व्हायला

उमलून आले पुन्हा... प्रेम हे

Submitted by प्रथमेश काटे on 16 April, 2023 - 08:33

उमलून आले पुन्हा..
प्रेम हे !

" वंदना अगं झाला की नाही डबा ? "

हॉलमधून, ऑफिसला निघण्याच्या घाईत असलेल्या अनिलने मोठ्याने विचारलं. अर्थात पत्नी पर्यंत आवाज पोहोचावा म्हणून ; पण आता त्याच्या आवाजात किंचित रागही जाणवत होता.

शब्दखुणा: 

सुटका

Submitted by आर्त on 6 February, 2023 - 03:01

हाय ही सुरुवात का अंत याला मी म्हणू?
लाभली सुटका मला, का तरी येते रडू?

सर्व, अगदी सर्व हे, नेहमी होते तुझे,
फक्त ते केले कधी, आपुले नाहीस तू.

उसवले नाते कधी, समजले नाही मला
बंध नव्हते रेशमी, ठिगळ होते ते जणू

तू दिलाची जान, पण सांगणे ही गौण हे,
प्रेयसी होतीस पण तू अता त्याची वधू.

पण तुझे भागेल का अन् कसे माझ्याविना?
सागराची प्यास तू, मी वर्षावाचा ऋतू.

रोखण्या मजला तुम्ही, पंख माझे छाटले,
मी बघा पंखांविना लागलो आता उडू.

कर पुन्हा बंधी तुझा, तू मला रे जीवना,
हा सुखी संन्यास मज, येत नाही रे रुचू

अक्षय जाणीव

Submitted by अक्षय समेळ on 15 November, 2021 - 02:10

जे जे तुला बोलायचे राहून गेले होते
ते ते कागदावर आपसूक मांडले गेले
एक एक शब्द अश्रूंनी भिजला होता
विरहाच्या अग्नीत कागद ही जळाला

राख होऊन कागदाची विभूती झाली
अनेकांच्या भाळी श्रद्धापूर्वक सजली
भक्तगणांची आता ना भासते उणीव
तरी मनात उरते तुझी अक्षय जाणीव

- अक्षय समेळ

जमले नाही...

Submitted by अक्षय समेळ on 30 October, 2021 - 03:13

शोधितो आहे मिळाला अजून नाही
तुझ्या आठवणींना पर्याय असा काही
गुंफून शब्दांची माळ काव्य केले किती
मंत्रमुग्ध असे लिहणे काही जमले नाही

तुझ्या सुखात नेहमी माझे सुख मानले
समाधान मात्र तुझ्याकडे उधार राहिले
काही दिवस देवदास सारखे जगून पाहिले
मद्याचा सहवास करणे मात्र जमले नाही

अपेक्षा होती मला भरघोस परताव्याची
हृदयाची गुंतवणूक मात्र चुकीची निघाली
नफा ना तोटा ह्या तत्वावर संधी तर झाली
केलेल्या संधीचे सोने करणे मात्र जमले नाही

- अक्षय समेळ.

इतकीच खंत - भाग १

Submitted by अक्षय समेळ on 13 October, 2021 - 01:02

"माणगाव आलंय, ज्यांना उतरायचं आहे त्यानी पटकन उतरा. गाडी जास्त वेळ स्टॉपवर थांबणार नाही." कंडक्टर नेहमीच्या सवयीने ओरडला.

त्या आवाजामुळे अजिंक्य खडबडून जागा झाला आणि घाई घाईने आपले सामान उतरवू लागला.

"तुम्हाला इथे उतरायचे आहे का?" अजिंक्यच्या शेजारील प्रवाशी उठून बाजूला होत विचारू लागला.

"हो." अजिंक्यने स्मितहास्य करत उत्तर दिले आणि उतरण्यासाठी दरवाजा जवळ जाऊ लागला.

"अहो! लवकर उतरा चला, गाडीला जास्त वेळ थांबता येणार नाही" कंडक्टर थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला.

अजिंक्य उत्तर न देताच खाली उतरला आणि सवयीप्रमाणे स्टॉपवर असलेल्या नवनाथ रसवंती गृहात शिरला.

प्रेमाचा जुगार

Submitted by अक्षय समेळ on 7 October, 2021 - 01:06

भिडताच नजरेला नजर आपली
प्रेमाचा सजला जुगार पटलावरी
फेकले फासे, पहिले दान पडले
पहिल्याच पणाला हृदय अर्पिले

हळूहळू स्वतःचा विसर पडला
जसा खेळ चांगलाच रंगात आला
हारता हारता कळलेच न मजला
प्राण माझा कधी पणाला लागला

उरले नव्हते आता मज जवळ काही
जिंकली होती ती शेवटचे दान ही
संपला होता प्रेमाचा जुगार पटलावरी
हाती माझ्या मात्र काहीच लागले नाही

- अक्षय समेळ.

ती मी ती मी

Submitted by स्वेन on 7 June, 2021 - 02:35

- अहो, बघा ना.... माझ्या चेहेऱ्यावर सुरकुत्या वाढायला लागलेत... म्हातारी झाले मी आता....

मी - अगं असू दे . छान दिसतेस .... अनुभवाची निशाणी म्हणजे सुरकुत्या. ! मला तर मस्त वाटतायत. आठवतंय तुला? मी बऱ्याचदा निराश व्हायचो, हताश व्हायचो, तेंव्हां तू खळखळून हसायचीस आणि मनावरचे मळभ क्षणात दूर करायचीस. काही वेळा तर तू मला बरं वाटावं म्हणून माझ्या शिळ्या आणि त्याच त्याच विनोदांवर मनापासून हसायचीस. म्हणून त्या सुरकुत्या पडल्यायत. मला अशीच आवडतेस तू.

परिमाण

Submitted by आर्त on 22 May, 2021 - 11:14

काळीज माझे फक्त का? हा प्राण तू घेऊन जा,
हे प्रेम म्हणजे काय ते परिमाण तू घेऊन जा.

आयुष्य सारे शाप मी खाऊन अंगी काढले,
'करणार नाही कौतुके', ही आण तू घेऊन जा.

झाले पुरे मज रेटणे, हे एकदाचे संपवू,
ही आणलेली प्रेरणा अन त्राण तू घेऊन जा.

होती अगोदर जीवनी शांती किती, सांगू तुला,
जी भावनांची खोदली ती खाण तू घेऊन जा.

आहे म्हणाली प्रेम पण तू प्रेम ना केले कधी,
खोटेच शब्दांचे तुझे हे बाण तू घेऊन जा.

मज शोक करण्या पाहिजे अंधार आणिक आसवे,
या चांदण्यांची नाटकी ही घाण तू घेऊन जा.

विषय: 

नजरेतील अव्यक्त प्रेम...

Submitted by सुर्या--- on 23 April, 2021 - 04:37

पाहता क्षणीच भुललो...
अन मागे मागे फिरलो...

ति तिथं मी असा प्रवास रंगला...
अन नजरानजरीचा खेळ खूप दंगला...

आमच्यातील प्रितबंध मित्रांनी हेरले...
येता जाता शब्दांनी दोघांनाही घेरले...

नजरेतील बाण आता समोर येऊन थाटले...
शब्दसुमांच्या प्रीतफुलांची गोडी ओठी दाटले...

नेत्रसुखांच्या हिरवाईतून गाली खळी खुळे...
अबोल प्रीतीचे मनोमनी इंद्रधनुष्य फुले...

दिवसागणिक दिवस सरले...
शब्द न ओठांवरती फिरले...

प्रेम नजरेतून व्यक्त झालेले...
कधी शब्दांनी ना स्पष्ट केले...

विषय: 

Pages

Subscribe to RSS - प्रेम