काळोख

अनोळखी सावल्या

Submitted by Meghvalli on 28 March, 2024 - 07:29

एकांतात दुरुन बोलावी कोण मला
सावल्या कुणाच्या खुणावतात मला
गुप्प अंधार,आणि दुसरे ना काहीच
त्या गडदांत सुद्धा कोण दिसे मला
मन बेचैन, भीतीने दाटले रोमांच
सुर भयाण, निरंतर ऐकु येती मला
ते डोळे मजवर सतत नजर ठेवून
काळोखातून वटारत असती मला
सांगा कुणी तरी कोण ते अनोळखी
ज्यांची ओळख वाटते नकोशी मला

गुरुवार , २८/०३/२०२४ , ०४:२७ PM
अजय सरदेसाई (मेघ)
https://meghvalli.blogspot.com/

चल

Submitted by Meghvalli on 23 March, 2024 - 08:08

पुढे वाट काळोखी
चल ओंजळीत
उजेड घेऊन जाऊ

नसुदे निवारा कुठे
चल चांदण्यांचे
पांघरून करुन राहु

हा प्रवास आहे दुर्धर
चल वाटेसाठी
स्वप्नांची शिदोरी घेऊ

येतील वाटेत क्षण
चल गुंफून
आठवणी मनांत ठेऊ

अजय सरदेसाई (मेघ)
१६/३/२०२२ , ७:०० PM

meghvalli.blogspot.com

परिमाण

Submitted by आर्त on 22 May, 2021 - 11:14

काळीज माझे फक्त का? हा प्राण तू घेऊन जा,
हे प्रेम म्हणजे काय ते परिमाण तू घेऊन जा.

आयुष्य सारे शाप मी खाऊन अंगी काढले,
'करणार नाही कौतुके', ही आण तू घेऊन जा.

झाले पुरे मज रेटणे, हे एकदाचे संपवू,
ही आणलेली प्रेरणा अन त्राण तू घेऊन जा.

होती अगोदर जीवनी शांती किती, सांगू तुला,
जी भावनांची खोदली ती खाण तू घेऊन जा.

आहे म्हणाली प्रेम पण तू प्रेम ना केले कधी,
खोटेच शब्दांचे तुझे हे बाण तू घेऊन जा.

मज शोक करण्या पाहिजे अंधार आणिक आसवे,
या चांदण्यांची नाटकी ही घाण तू घेऊन जा.

विषय: 

दीपस्तंभ

Submitted by तो मी नव्हेच on 6 August, 2020 - 02:12

तो वादळात आहे उभा दीपस्तंभासारखा
आणि करतो आहे प्रतिक्षा युगायुगांपासून
त्याच्यापर्यंत पोहचणार्या माणसाची
पण काळोख ही होतो कधीकधी वरचढ
अन् झाकू पाहतो प्रकाशास धुके पांघरून
पण कालातीत असणारा तो दीपस्तंभ
तळपतो, देत राहतो प्रकाश नेहमीसारखाच
करीत राहतो बिकट वाट सोपी पामरांसाठी
आणि एक दिवस मानवीय प्रयत्नांना येते यश
दिसू लागतो दीपस्तंभ अन् त्याच्या प्रकाश पुन्हा
माणूस वाजवेल तुतारी काळोखावरील विजयाची
आनंद होताच, आहेच अन् द्विगुणित ही झालाय
अन् सजवेल दीपस्तंभ स्वतःच्या मगदुराप्रमाणे

शब्दखुणा: 

"काळोख"

Submitted by am_Ruta on 11 June, 2020 - 08:11

आकाशी चांदण्या
मुक्तपणे सांडल्या,
त्यांच्या उरी मात्र
मिट्ट काळोखच दाटला...

मूकपणे वावरताना
काळजचा ठोका चुकला,
पदराला हात घातला गेला
या जाणिवेनेच जीव नकोसा झाला...

चरित्र लिहिता लिहिता
चरित्र्यावरच घाला घातला,
आशिर्वाद देणारा हातच लज्जास्पद
स्पर्श करायला धजला..

शरीराचा येथेच्छ आस्वाद घेऊन
राक्षस संतुष्ट झाला,
चोळा मोळा झालेला जीव मात्र
निपचीत पडून राहिला...

इतक्यावरच थांबेल
तर तो राक्षस कसला??
पुन्हा एकदा भक्ष करून त्या जीवाचा
शेवटी एकदाचा लचकाच तोडला...

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - काळोख