नव-याला कसे रिझवावे ?
हल्ली कामाच्या ओझाखाली बिच्चारे नवरे दबून आणि दमून गेलेले असतात. त्यामुळे घरी आल्यावर त्यांना कसलाही उत्साह नसतो.
चहापाणी झाले की लगेचच लॅपटॉप उघडून कामाचं ओझं उरकायचा प्रयत्न चालू होतो.
बायकांना मग राग येतो. हा प्राणी मग घरी तरी का येतो असं होऊन जातं ..
पण दिवसभर टीव्हीपुढं लोळत तुपारे, मानबा बघून नव-याच्या मनःस्थितीचा अंदाज येत नाही.
नव-याला बायकोने रिझवावे लागते असे आजीने सांगितले होते. पण नेमके काय करायचे हे सांगितले नाही.
मी मग गाणी म्हणून त्याला खूष करायचा प्रयत्न केला
रूठे रूठे सैय्या, मनाऊ कैसे