प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.
सिंगापुरात जुन्या शहराच्या जवळपास मध्यभागी 'फोर्ट कॅनिंग हिल' नावाची एक टेकडी आहे. सिंगापुराची पर्वतीच म्हणा ना! पर्वतीला जसा इतिहास, तसाच या टेकडीलाही. पर्वतीला जशी नानासाहेब पेशव्यांची समाधी तशी इथे 'राजा परमेश्वर' ऊर्फ 'इस्कंदर शाह' (इ.स. १३४४ - १४१४) या मलाक्क्याच्या पहिल्या सुलतानाची (आणि योगायोगाने सिंगापुराच्या शेवटच्या राजाची) कबर आहे. 'बुकित लारांगान' (मलय भाषेत बुकित = टेकडी, लारांगान = राखीव, निषिद्ध/इंग्रजीतल्या 'फर्बिडन' अशा अर्थी) नावाची ही टेकडी या इस्कंदर शाहाच्या काळापूर्वीपासून स्थानिक मलय राजांचं समाधिस्थान मानली जात होती.पुढे इ.स.
सिंगापूरबद्दल मायबोलीकरांच्या गप्पा