दुबई

वादी

Submitted by Theurbannomad on 26 May, 2020 - 20:42

अली आणि फाझल आपल्या उंटांना शक्य तितक्या वेगात दौडवत होते. तीन दिवसांपूर्वी मिस्र देशातल्या बाजारात त्यांनी आपला माल चांगल्या चढ्या किमतीला विकला होता. खिशात अपेक्षेपेक्षा जास्त माल खुळखुळत होता. या वेळच्या व्यापारात त्यांना चांगलाच धनलाभ झाल्यामुळे त्यांनी हात सैल सोडून खरेदी केली होती. परतीच्या वाटेवर ठराविक अंतरावर असलेल्या वस्त्या त्यांच्या परिचयाच्या होत्या.

विषय: 
प्रांत/गाव: 

जपानी वामन

Submitted by Theurbannomad on 3 May, 2020 - 16:17

" मॅन, वॉन्ट तवू काम फो फीशींग?" आपल्या जपानी हेल असलेल्या इंग्रजीत हिराकू मला आग्रह करत होता. माझ्या दुबईतल्या सुरुवातीच्या ' स्ट्रगल ' च्या दिवसात एका खोलीत तीन डोकी अशा पद्धतीने राहत असल्यामुळे अनेकदा तऱ्हेतऱ्हेचे लोक माझे रूममेट म्हणून माझ्याबरोबर राहिले आहेत, त्यातला हिराकू हा एक विक्षिप्त प्राणी. समुद्र, मासे, वाळू, जहाज आणि भटकंती या विश्वात सतत रममाण असणारा आणि दुबईला दर शनिवारी विशेष परवाना घेऊन खोल समुद्रात मासेमारी करायला जाणारा हा माझा 'रूममेट' लाघवी स्वभावाचा असला, तरी पंचेचाळीस डिग्रीच्या उष्णतेत मासेमारीला जायच्या जीवघेण्या साहसाची मला तरी भीती वाटत होती.

प्रांत/गाव: 

बाबा बंगाली

Submitted by Theurbannomad on 27 April, 2020 - 17:33

काही माणसांशी आपली मैत्री का होते, कशी होते आणि अचानक ती का तुटते, याचं उत्तर ' योगायोग ' याशिवाय वेगळं काही मिळणं कठीण असतं. मुळात ती मैत्री होणंच एक मोठं आश्चर्य असू शकतं. कोणाशीही चटकन संवाद साधू शकणाऱ्या आणि चित्रविचित्र माणसांची सोबत आवडणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीवर मुद्दाम एखाद्या व्यक्तीपासून लांब राहायचा प्रयत्न करायची वेळ तशी अभावानेच आलेली आहे.

प्रांत/गाव: 

मल्याळी बहिर्जी

Submitted by Theurbannomad on 22 April, 2020 - 05:25

मल्याळी माणसांशी माझं विशेष संबंध आखाती देशांमध्ये काम करतानाच आला. मुंबईला मुळात मल्याळी लोक तसे कमीच, त्यात मुंबईला एकदा राहायला सुरुवात झाली, की मल्याळीच काय पण अगदी परग्रहवासी सुद्धा सहज मुंबईकर होत असल्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये भेटलेले मल्याळी महाभाग मला फारसे वेगळे कधीच वाटले नाहीत. एक-दोन मित्रांच्या घरी गेल्यावर तितक्यापुरते कानावर पडलेले जड मल्याळी उच्चार आणि एका मैत्रिणीच्या मुंबईतच पार पडलेल्या लग्नसमारंभात केरळहून अगदी पारंपारिक वेशात आलेले शंभर-एक वऱ्हाडी यापलीकडे विशुद्ध मल्याळी अनुभव माझ्यापाशी नसल्यातच जमा होते.

प्रांत/गाव: 

पूर्ण झालेला अपूर्णांक

Submitted by Theurbannomad on 20 April, 2020 - 05:56

एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये चहा घेत असताना अचानक समोर एक मिठाईचा भला मोठा डबा घेऊन आमचा 'ऑफिस बॉय' आला. इतका मोठा डबा, त्यात तऱ्हेतऱ्हेची वर्ख लावलेली मिठाई आणि वर अजून एका छोट्या डब्यात प्रत्येकाला वेगळी चॉकलेट्स हे सगळं नक्की कशासाठी चाललंय याचा मला उलगडा होईना. शेवटी त्याने " वो हाला है ना, उसको बेटा हुआ...उसकी मिठाई है..." अशी माहिती पुरवली.

प्रांत/गाव: 

एक होता विदूषक

Submitted by Theurbannomad on 13 April, 2020 - 04:47

शब्दविभ्रम, नक्कल, मिमिक्री, डबिंग अशा अनेक गोष्टींमध्ये कमीजास्त प्रमाणात निपुण असणारी अनेक कलाकार मंडळी आपल्याला दृश्य आणि अदृश्य माध्यमांतून अगदी दररोज भेटत असतात.जाहिरातींच्या क्षेत्रात काम करत असणारी चेतन सशीतल, सुदेश भोसले, मेघना एरंडे अशी मंडळी शेकडो कलाकारांचे आवाज जेव्हा लीलया काढून दाखवतात, तेव्हा काही क्षण आपले डोळे, कान आणि मेंदू एकत्र काम करत आहेत की नाही अशी शंका सतत येत रहाते.

प्रांत/गाव: 

जुळ्यांचं दुखणं

Submitted by Theurbannomad on 9 April, 2020 - 10:50

काही सेकंदांच्या अंतराने एकाच आईच्या पोटी एकाच प्रसूतिगृहात एकाच दिवशी जन्माला आलेल्या दोन जुळ्या भावंडांची कुंडली अगदी तंतोतंत एकसारखीच असायला हवी , अशी शंका मला कुंडलीशास्त्राबद्दल वाचत असताना नेहेमी येत असे. अधून मधून त्या विषयातल्या काही तज्ज्ञ मंडळींना मी त्यासंबंधी प्रश्न सुद्धा करत असे आणि माझ्या मनाचं त्यांच्यापैकी कोणाच्याही उत्तराने समाधान होतं नसे. पूर्वजन्मीच्या संचिताचे परिणाम प्रत्येक आत्म्यावर वेगवेगळे होतं असतात, असं साधारण उत्तर प्रत्येकाकडून मला मिळत असे.

प्रांत/गाव: 

भगीरथ

Submitted by Theurbannomad on 8 April, 2020 - 05:53

" शुभ संध्याकाळ, मन्सूर बोलतोय.उद्या किती वाजता आणि कुठे भेटायचंय?" दिवसभराचं काम संपवून घरी निघालेलो असताना गाडीत बसणार तोच मोबाईल खणखणला आणि पलीकडून अपरिचित माणसाचा परवलीचा प्रश्न आला. दर वेळी नवा प्रोजेक्ट हातात आलं, की सुरुवातीची 'किक-ऑफ' मीटिंग होते आणि मग त्या प्रोजेक्टशी जोडलेले कोण कोण कुठून कुठून असेच फोन करत असतात. ' साईट व्हिसिट' च्या वेळी सगळे जण एकत्र आले, की संभाषणातून काही वेळातच त्यातले 'सुपीक मेंदू' आणि 'नुसत्याच कवट्या' कोण आहेत हे सरावाने आता मला ओळखता येत असल्यामुळे मी माझ्या प्रोजेक्ट ची पहिली मीटिंग 'साईट'वर घेणं पसंत करतो.

प्रांत/गाव: 

मानसीचा चित्रकार तो

Submitted by Theurbannomad on 7 April, 2020 - 09:06

काही व्यक्तींना जन्मजात कलाकार होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची देणगी मिळालेली असते। अशा व्यक्तींना कला शिकवावी लागत नाही. दूध पित्या वयातल्या आणि बोबडे शब्द बोलायला लागलेल्या लहानशा मुलाला गाणं ऐकून तंद्री कशी लागते, याचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोध घेणं मला तरी अशक्य वाटतं. कुठल्याशा पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधातून जन्मजात बरोबर आलेली ही शिदोरी ज्याच्याजवळ असते, ती व्यक्ती माझ्या मते विधात्याने केवळ सर्वसामान्य मनुष्यप्राण्यांच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठीच गंधर्वलोकातून खास या पृथ्वीतलावर पाठवलेली असते.

प्रांत/गाव: 

सूर निरागस हो

Submitted by Theurbannomad on 17 March, 2020 - 10:03

संगीताची आवड असलेला माणूस बरेच वेळा स्वतःला गाता गळा नसला तरी संगीताचा 'कान' असल्यामुळे सतत चांगल्या गायकांच्या आणि गाण्यांच्या संगतीत असतो. माझ्यासारख्या संगीत वेड्याला कुठेही गेलं तरी चांगलं संगीत कानावर पडल्यावरच खऱ्या अर्थाने त्या जागेशी नाळ जुळल्यासारखी वाटते. त्या संगीताला भौगोलिक अथवा व्याकरणात्मक बंधन नसतं. अरबी संगीतकारांच्या रबाबात अथवा मिझमारमध्ये उमटणारे सूर खरे असले, तर त्याची अनुभूती घ्यायला आपल्याला आपण अरबी नसल्याची अडचण भासत नाही. सिंगापूरमध्ये कोलिनटॉन्ग ऐकताना किंवा चीनमध्ये डिझीवर वाजवले जाणारे संथ सूर ऐकताना तंद्री लागतेच लागते.

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - दुबई