योसेमिटी- माहिती हवी आहे

Submitted by माउ on 20 May, 2016 - 14:34

योसेमिटी मधे फिरण्याबद्दल माहिती हवी आहे...
मे महिन्यात शेवटच्या वीकांताला २-३ दिवस योसेमिटीला जाण्याचा प्लान ठरत आहे...तिथे २ दिवसात पहाण्यासारखे काय आहे?

सध्या हे पहाण्याचा प्लान आहे-
1. योसेमिटी Valley
2. Half Dome
3. योसेमिटी Falls
4. Glacier Point
5. Vernal Falls
6. Tunnel View

ह्यातले काय पहाण्यासारखे (मस्ट सी) आहे?
जाणकारांनी क्रुपया माहिती द्यावी...

धन्यवाद!

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिर्षकामध्ये 'योसेमिटी, माहिती हवी आहे' असा बदल करा.

प्रवासाचे अनुभव मध्ये फक्त योसेमिटी इतकेच वाचून तुम्ही प्रवास वर्णन लिहिले कि तुम्हाला माहिती हवी आहे हे कसे कळणार?

हाफ डोम, व्हर्नल फॉल्स ला हाईक करून जाणार का? Happy

अन्यथा बरीच ठिकाणं व्हॅली मधून, ग्लेशियर पॉइण्ट वरून "दिसतात".

जुलै च्या तिसर्या आठवड्यात गुरवार- शुक्रवार योसेमिटीला दोन दिवस जाण्याचा बेत झाला आहे.

पार्क पासुन १ तासाच्या अतंरावरील हॉटेल ( oakhurst, २५ की मी अंतर आहे पण गुगल वर १ तास लागेल असे दाखवत आहे) मधुन सकाळी ८ वाजता निघुन

1. Glacier Point
२. Tunnel View
3. योसेमिटी Valley
4. योसेमिटी Falls मग Yosemite Valley Lodge वर मुक्काम

दुसर्या दिवशी सकाळी उठुन Vernal Fall हाईक करुन संध्याकाळी सॅन होसे मध्ये रात्री मुक्कामाला जायचे.

जाणकारानी यात काही बदल असतिल तर सुचवावेत. हॉटेल /लॉज चे बुकिंग सोडले तर प्लॅन पुर्णपणे felxible आहे.

Glacier Point/ Tunnel View मध्ये पार्कींग मिळण्याची शक्यता किती?

काही "must see" miss केल का?