संस्कृती

गणपतीची मूर्ती

Submitted by अंजली on 15 August, 2011 - 10:38

अमेरीकेत सुमा फूड व्यतिरीक्त पेणच्या गणेश मूर्ती कुठे मिळतील? काही वर्षांपूर्वी आमच्या मंडळासाठी मी ऑर्डर केली होती. सध्या सुमा फूडसकडे पेणच्या गणेश मूर्ती मिळत नाहीयेत. कृपया काही माहिती असल्यास सांगा.

प्रकाशचित्र स्पर्धा (नियम) - "अदाकारी": मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 15 August, 2011 - 06:20

adakari_1.jpg

**********************************************************

"हे जीवन एक रंगमंच. कधी आपण असतो या रंगमंचावरचे कलाकार. एखाद्या नटसम्राटाप्रमाणे आपण आपल्या भावना कधी हावभावातून तर कधी नुसत्या नजरेतून व्यक्त करतो आणि कधी आपण बनतो या रंगमंचावरचे सूत्रधार. मग आपला कॅमेराच बनतो आपली नजर आणि घेऊन जातो एका अनोख्या दुनियेत. पण कधी असतो आपण फक्त एक प्रेक्षक. या जीवनाच्या रंगमंचावर उमटणार्‍या सुख-दु:ख, आशा-निराशा यांची दृश्य बघणारे... नजरेने अनुभवणारे....

कलाकुसर स्पर्धा (नियम) : "कायापालट" - मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 15 August, 2011 - 06:17

Kayapalat_0.jpg

**********************************************************

makeoverposter.jpg

**********************************************************


"कायापालट" स्पर्धेचे नियम:

१. ही स्पर्धा फक्त मायबोलीच्या सभासदांसाठी आहे.
२. या स्पर्धेसाठी तयार केलेल्या वस्तू स्वतः तयार केलेल्या असाव्यात.
३. कलाकृतीसाठी वस्तू निवडून त्याचा कायापालट करायचा आहे.

परेड स्पेक्टॅक्युलर

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

इथे आल्यापासून नवीन वर्ष सुरू झालं की करायच्या अनेक कामांमध्ये एक असतं वर्षभराचे परेड कॅलेंडर बघून कालनिर्णयावर नोंदी करून ठेवणे. आम्ही राहतो ते गाव आणि शेजारचं स्टॅमफर्ड इथे काही ना काही निमित्ताने वर्षभर परेड्स निघतात. वर्षातली पहिली सेंट पेट्रिक डे परेड झाली की मग ईस्टर परेड, इंडिपेंडन्स डे परेड, मेमोरियल डे परेड, हॅलोवीन परेड आणि वर्षाची सांगता करणारी थँक्स गिव्हिंग परेड. काही ठिकाणी सँटा परेड पण असते. इथे ईस्ट कोस्टवर न्यू यॉर्क सिटी आणि स्टॅमफर्ड ह्या दोन थँक्स गिव्हिंग परेड्स प्रसिद्ध आहेत.

प्रकार: 

रसग्रहण स्पर्धा - झुळूक अमेरिकन तोर्‍याची - लेखक - शरद वर्दे

Submitted by मंजूडी on 4 August, 2011 - 03:49

आधी शिक्षणानिमित्त, संशोधनानिमित्त, व्यवसायानिमित्त एखादी सदिच्छा भेट, नोकरीसाठी असलेल्या तुरळक संधीतील एखादी पटकावून वगैरे परदेशी जाणार्‍यांच्या तुलनेत, आता ग्लोबलायजेशनमुळे प्रचंड वाढ झाली आहे. आयटीक्षेत्राने तर परदेशवारीची दारे सताड उघडलेली आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन दशकांपासून परदेशवारी दुर्मीळ राहिलेली नाही. तरीही आपल्याकडे अजूनही 'फॉरीन रीटर्न्ड' माणसाकडे भक्तीभावाने पाहिलं जातं.

आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे

Submitted by जागोमोहनप्यारे on 28 July, 2011 - 23:27

आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे

आटपाट नगरातील ही सत्यकहाणी.

गावातील कोर्टात एक जज मॅडम होत्या. त्यांचा नवरा गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. साधारण ४० एक वय असावं.

कोर्टाशेजारीच पोलिस स्टेशनची इमारत. तिथल्या चुलबुल पाम्डेवर त्यांचं मन फिदा झालं आणि त्या दोघानी लग्न केलं.

लग्न केलं आणि गोंधळ झाला. कारण चुलबुल आधी विवाहीत असून दोन मुलांचा बाप आहे. त्याचं म्हणणं, मी दोन्ही बायकाना व्यवस्थीत करीन.

आणखी एक तिढा. बाई मुसलमान, तर बुवा हिंदु. बाईनी हिंदु धर्मानुसार कुंकू बांगड्या वापरायला सुरुवात केली.

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

Submitted by अभय आर्वीकर on 27 July, 2011 - 08:43

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय!

Submitted by फारएण्ड on 25 July, 2011 - 01:48

'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय! ही लिन्क पाहा
http://www.time.com/time/specials/packages/article/0,28804,2084354_20843...

'बॅड-अ‍ॅस' वाईव्ह्स मधे एन्ट्री, रूपर्ट मर्डॉक ची बायको, टायगर वूड्स च्या रागात त्याच्या गाडीची तोडफोड करणारी बायको या लिस्ट मधे झाशीची राणी म्हणजे सन्मान! (पेलिनबाईही आहेत त्यात, पण या लिस्ट मधे त्यांचे असणे चुकीचे नाही. अध्यक्षपदाला लायक बायकांच्या लिस्टमधे आल्या तर प्रॉब्लेम आहे Happy )

मुंबईमधली भजनीमंडळं

Submitted by शर्मिला फडके on 23 July, 2011 - 12:35

मला मुंबईमधल्या भजनीमंडळांबद्दल माहिती हवी आहे. भजनीमंडळांची परंपरा मुंबईमधे किती वर्षांपासून आहे, जुनी भजनीमंडळं कोणती, त्यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी, वैशिष्ट्य, एकुण किती भजनीमंडळं मुंबईत आहेत, लोकल ट्रेन्समधली भजनीमंडळं, त्यांचा काही एकत्रित ग्रूप-संस्था आहे का याविषयीही माहिती हवी आहे. कृपया कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी इथे जरुर सांगावी.

अति

Submitted by डी.आर्.खैरे on 15 July, 2011 - 12:21

*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे .

Pages

Subscribe to RSS - संस्कृती