तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?

Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?

ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.

२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.

हा मुद्दा होता, जर गावातील पाणी अश्या प्रकारे दुषीत अ सेल तर ही जनता हेच पाणी वापरून तग तरी कशी धरून आहे? जर ह्या पाण्या बद्दल जनतेला माहीती असती तर जनेतेने ते पाणी शुद्ध करण्यासाठी एका तरी treatment चा पर्याय निवडला असता. ह्या पर्यायत पाणी उकळवणे, पाणी शूद्धी करणासाथी ULTRA Violet
उपकरणाचां वापर करणे. पण ही ठरली जनता ज्यांची एका वेळेची जेवायची मारामार तेथे पाणी शूद्धीकरण
म्हणजे डोक्यावरून पाणी. ज्यांच्या घरात झीरो चा दिवा लावयला विज नाही तिथे ULTRA Violet उपकरण?

पण आमची ही सर्व्व जनता ह्या विशाणु जिवाणु ना पुरुन उरली. कशी? हा प्रश्न ह्या टीम ला पडला होता.
ह्या नंतर NATURE च्या झालेल्या संशोधन चा विषय बदलला हे तुमच्या लक्षात आले असेलच.
त्या NATURE च्या टीमने पितळेची भांडीच उचलली, पाण्या ची SAMPLES घेतली. प्रयोगशाळेत नेउन
रीतसर प्रयोग केले गेले व

निश्कर्ष असा नि घाला कि पितळे च्या भांड्यांत दुषीत पाणी २४ तासात पिण्या एवढे
शुद्ध होते, कुठलीही उर्जा न वापरता !!. कारण.... पितळे तील तांब्याचे अणु. ह्याच अणु मुळे पाणी शूद्धीकरण
होते. http://www.nature.com/news/2005/050404/full/news050404-14.html ह्या लेखात स्पष्टपणे नमूद केले आहे कि हा शोध NATURE च्या टीमने लावला व त्याचा उपयोग भारता सारख्या देशाला घ्यावयास हवा. खरं कि नाही??

आता विषय दुसरा: जस्त (ZINC) चा शोध Andreas Maggraff 1746 ला लावला. पण भारतात् जस्त (ZINC) ची निर्मीती (शूद्धीकरण) BC 400 च्या पूर्वी पा सून होतय! ह्या ZINC शूद्धीकरणाची पद्धत फक्त भारतीयांनाच अवगत होती. ह्या ZINC च्या खाणी चे अवशेष राजस्थानात अजुन ही पाहायला मिळतात. जर ZINC चे शूद्धीकरण व व्यापरी उत्पादन भारतात BC 400 पासून होत होते तर Andreas Maggraff ला ह्या शोधाच Credit कसे दिले गेले?

Zinc & Copper चे मिष्रधातू बनवणे फार मुश्कील काम, ह्याचे कारण ह्या धातूंचा Melting Temp. Copper
वितळे पर्यंत Zinc वितळून उडुन जाई. भारतीयानी एक स्पेशल प्रोसेस तयार करून Brass ला जन्म दिला.
भारत पितळेची भांडी जवळ जवळ १५००-१७०० वर्षा पासून वापरतोय. भारतातू न ही भांडी परदेशात गेली.

पितळेच्या भांड्यांपुर्वी तांब्याची भांडी भारतात उपलब्ध होतीच. मग पितळेच्या मागे का ? कारण तांब्याची
किम्मत, ती ईतकी जास्त होती कि जर तांब्या चे गुणधर्म सारखे ठेउन सर्वसाधारण जनतेला, पर्यायी धातूंची भांडी द्यावी हा च विचार ह्या मागे असला पाहीजे. त्या मुळेच देव पुजे साठी तांब्याची पण सर्व साधारण कामा साठी पितळेची हा पर्याय निघाला असावा !!!!

आता आपली जनता ही भांडी कशी वापरते ? पहेले पाण्याला जाऊन घागर पाण्या ने स्वच्छ धुते. हाती
राखुन्डी लागली तर ठीकच नाही तर माती, नारळाची किशी सुद्धा चालते. घागर मस्त चकचकीत झाली पाहीजे.
हे सर्व्वे आपली जनता परंपरेने करत आलीय. पण ह्याच भां ड्याच्या चकचकीत पणा मुळेच पाणी शूद्धीकरण
क्रिया सुरळीत होत होती.

ठोक्याचे भांडे !! तांब्या - पितळेची भांड्यांना आपण का ठोके लाउन घेत होतो ? उत्तर परत एकदा तेच, भांड्याचा चकचकीत पणा !

आताची परीस्थीती : ही तांब्या - पितळेची भां डी गेलीत अडगळीच्या खोल्यात. काही भंगारात काढली गेलीत.
त्या भांड्याची जागा आता फक्त वरुन चकचकीत दिसणार्या प्लास्टीकच्या भांड्यानी घेतलीय.

वरून चकचकीत दिसणारी प्लास्टीकची भांडी पाणी साठवुन ठेवण्या पलिकडे जाऊ शकतील ?

स्त्रोतः बरेच वर्षा पासुन मनात हा विषय घोळत होता. ह्या वि षया ची व्याप्ती फार मोठी आहे व सर्व जनतेची
ह्या विषया बद्दल जा गरुक ता करणे गरजे च आहे.
माहिती जाला वरुन,
http://www.inae.org/metallurgy/archives_pdf/smelt%20zinc.pdf

त. टि: समस्त पि तळे, तांबे परीवारांनी माफी ध्यावी !!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान संशोधन . पण भारतात ही भांडी होती कारण सोने चांदी परवडत नव्हते आणि दुसरे कुठले धातू मिळत नव्हते.. भारतातल्या लोकाना आणि हिंदु संस्कृतीला जंतुनाशकाचे ज्ञान होते असा याचा अर्थ नव्हे, अन्यथा आज आपण स्टीलची भांडी वापरलीच नस्ती नै का?

शिवाय भारतात इतके दूशीत पाणी असूनही जन्ता जिवंत कशी हा प्रश्नदेखील त्या परकीयाना प्रथम पडला.. आपल्यातल्या कुणाला हा प्रश्न का पडला नाही?

शिवाय जंतुनाशकाचा गुण दाखवायला भांडे कायमस्वरुपी रोज वापरायला हवे. नुस्ते पळीभर आचमन करुन हा फायदा कसा होणार नै का? Proud

जर ZINC चे शूद्धीकरण व व्यापरी उत्पादन भारतात BC 400 पासून होत होते तर Andreas Maggraff ला ह्या शोधाच Credit कसे दिले गेले?

नुस्ते एखादे ज्ञान असून भागत नाही, ते जगाला दाखवून त्याचे रजिस्टेशन पेटंट करुन घ्यावे लागते.. त्या बाबतीत आपण मागेच आहोत...

जमोप्या !!

लेख पुर्ण लिवायच्या आधीच प्रती क्रिया ??

माझ्या लेखात तुम्ही म्हणाल्या प्रमाणे कुठेही हिंदु संस्कृती हा शब्द वापरलाच नव्हता. जसा परकियांना प्रश्न
पडला तसा आपल्यातल्या कुणाला ही ( तुम्हाला सुद्धा) हा प्रश्न पडला नाही!.

तुम्हाला हि ह्यात न लिहीलेल्या हिंदु संस्कृती बद्दलच प्रश्न पडलेला दिसतोय.

समाज जागरण हाच ह्या लेखाचा उद्देश !!.. आपले सर्व थोतांड, आपण करतो ते सर्व बुरसटलेल्या विचारांचे
टाकाउ, हा विचार सोडा. जे चांगल आहे ते उचलूयात. जर तुम्हाला देव पुजा मान्य नाही तर कोणाला हरकत आहे ?

जर परकियांना आपल्याबद्दल ईतका कळवळा असता तर त्यांनी सरकार वर दबाव आणला असता. प्रसिद्धी
माध्यमा द्वारे जन प्रबोधन केले असते. हे काही झाले आहे का?

आपलीच सर्पगंधा आपलीच माहीती, आता गोळ्याच्या रुपात, high blood pressure वर राम बाण उपाय,
फक्त Made in Germany !!! ह्याला कारण कोण ?

एक विसरू नका. भारतात तुम्ही स्वतःची Individuality जोपासु शकता, पण भारता बाहेर आपण सर्व
भारतीयच, आणी आपणा सर्वा ना हे परदे शी एकाच मापाने मोजणार !

विवेकजी,

१. पूर्वी तांब्या/पितळेची भांडी वापरात होती, पण ती त्यातल्या त्यात बरा आर्थिक स्तर असणार्‍या घरांतून. (या भांड्यांना आतून कल्हई नावाचा एक प्रकार करणे कंपलसरी होते. कॉपर अणूंचे प्रमाण या कल्हई मुळे नगण्य होऊन अन्न्/पाणी 'कावळण्याचे' प्रमाण कमी होत असे.) ज्या घरांचे प्रमाण खूपच कमी (टक्केवारीत)
२. दुसरं म्हणजे, पिण्याचे पाणी साठविण्यासाठी, धातूची भांडी वापरण्यापूर्वी, अन अजूनही मातीचे रांजण / माठ / घडे / खुजे इ. वापरले जातात. धातूची भांडी मुख्यत्वे स्वयंपाक शिजविण्यासाठी वापरत. माझ्या घरी अजूनही माठ च वापरला जातो.
३. आपल्या सदर्भित संशोधनातील निष्कर्षां नुसार, पाणी निर्जंतुक होण्यासाठी २४ तास लागतात. आजही कोणत्या घरांत २४ तास जुने पाणी पिण्यात येते? दर रोज भांडी विसळून पिण्याचे पाणी तरी नवेच भरले जाते. 'शिळे पाणी' पिण्यासाठी वापरत नाहीत.
४. आज प्लॅस्टिक कंटेनर्स वाढले आहेत ते बाटलीच्या रूपाने फ्रीझ मधे ठेवण्यासाठी. बाटली 'अ‍ॅक्वा गार्ड', 'आर.ओ.' इ वापरून मग भरली जाते. ते तर तुमच्या आमच्या गळी मार्केटिंगने मारलेली पाणी शुद्धीकरण यंत्रे आहेत. तत्पुर्वी, आपल्या घरापर्यंत येणारे पाणी निर्जंतुक करून पोहोचविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था (मुन्शिपाल्टी/ कार्पोरेशन) योग्य प्रकारे पार पाडत असतात. या वितरण व्यवस्थेत, वेगवेगळी खोदकामे होताना, गटारी अन पिण्याच्या पाण्याची भेसळ होत असते. पण तो वेगळा विषय आहे.
५. पूर्वीचे (म्हणजे ज्या काळी तांब्या/पितळेची भांडी सर्रास वापरात होती) पाण्याचे स्त्रोत आजच्या इतके 'कॉन्टामिनेटेड' नव्हते. वाहते पाणी पिण्यासाठी भरले जाई. अन हे वाहते पाणी निर्जंतुक करण्यासाठी भारतात निसर्ग सक्षम आहे. उन्हातील अल्ट्राव्हायोलेट किरण, हवेतील ऑक्सिजन हे दोघे एकत्रित परिणाम करून नदी/नाल्या/झर्‍यात वाहणारे पाणी निर्जंतुक करीत असतात. तसेच तरंगते कण खाली बसणे, (प्रेसिपिटेशन) तसेच वाळूने होणारे फिल्ट्रेशन या क्रीया त्यात मदत करतात. पावसाळ्यात गढूळ पणा अन पाण्याचा वेग वाढला, की साथीचे आजार पसरतात ते याच कारणाने कि नैसर्गिक निर्जंतुकीकरण तोकडे पडते अन पाणी 'खराब' होते.

तात्पर्यः
पाण्यामुळे रोग होऊन भारतीय मरून नष्ट झाले नाहीत याचे एकमेव कारण पितळी भांडी असावित असे वाटत नाही. (पटकी येऊन गावे च्या गावे मेलेली आहेत पूर्वी, कॉलर्‍याच्या लशी टोचलेल्या बर्‍याच लोकांना आठवत असतील प्रत्येक पावसाळ्यात.)

पाणी निर्जंतुक करण्या साठी तांबे उत्तम या गैरसमजातून मी बर्‍याच घरांत तांब्याची भांडी (कल्हई नसलेली) पिण्याचे पाणी भरण्यासाठी वापरलेली पाहतो. (फ्रीझ बॉटल सुद्धा तांब्याच्या) : तांबे धातूने शरीरावर होणारे दुष्परिणाम ठाऊक आहेत का?? अगदी अल्झायमर्स मधे सुद्धा तांब्याची पातळी वाढलेली सापडली आहे.
"Drinking water: With an LD50 of 30 mg/kg in rats, "gram quantities" of copper sulfate are potentially lethal in humans.[11] The suggested safe level of copper in drinking water for humans varies depending on the source, but tends to be pegged at 2.0 mg/L.[12]" <-- विकी.

या धातूचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून तर ती कल्हई करीत असत.

पिण्याचे पाणी साठविण्यासाठी तांबे चांगले अशी जी गैरसमजूत पसरते आहे, ती त्रासदायक ठरू शकते हे निदर्शनास आणून देण्यासाठी इतके लिहीले.

मेटॅलर्जी मधे भारतियांनी केलेली प्रगती नक्कीच वा़खाणण्यासारखी होती अन आहे. त्याबद्दल दुमत नाहीच.

----
बाकी वनस्पतीजन्य औषधे अन कुठून येतात, जुने संशोधन वगैरे वेगळ्या वादाचा मुद्दा आहे. मी स्वतः "अ‍ॅलोपॅथ" आहे. कधीतरी त्या विषयावरही बोलूच.

ता.क.
>>
एक विसरू नका. भारतात तुम्ही स्वतःची Individuality जोपासु शकता, पण भारता बाहेर आपण सर्व
भारतीयच, आणी आपणा सर्वा ना हे परदे शी एकाच मापाने मोजणार !
>>>
१००% अनुमोदन.

या धातूचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून तर ती कल्हई करीत असत.

पितळेच्या भांड्यात अन्नपदार्थ फार काळ ठेवले तर विषारी द्रव्ये तयार होतात, म्हणून तर पितळेला कल्हई करतात/ करत होते.. अगदी अनुमोदन.. पाण्याबाबत काय होते कल्पना नाही. तांब्याच्या भाम्ड्याबाबतही कल्पना नाही.

आणि ई कोलाय बॅक्टेरियाचे म्हणाल, तर बहुतेक २४ तासाच्या वर ते तसेही माणसाच्या शरीराबाहेर असतील तर मरतातच. त्यामुळे एखाद्या पाण्याच्या सँपलमध्ये सतत ई कोलाय मिळाले की त्यात अनिर्बंधपणे मानवी शौच मिसळले जात आहे, याचा पुरावा मानला जातो. २४ किंवा कदाचित ४८ तास कुठेही ठेवलेले पाणी ई कोलायसाठी तपासले तर ते निगेटिवच येईल. म्हणूनच इ कोलायसाठी सँपल वॉटर सोर्समधून घेतल्यावर शक्य तितक्या लवकर तपासायचे असते. ४८ तासानी तपासले तर त्यात काय मिळनार?

http://en.wikipedia.org/wiki/Escherichia_coli यातही दिले आहे...>>> Cells are able to survive outside the body for a limited amount of time, which makes them ideal indicator organisms to test environmental samples for fecal contamination.

इतरही जिवाणू विषाणु असतातच, पाणी शुद्धीकरण तपासणीत सगळे पाहिले जात नाहीत. त्या नेचरवाल्यानीही फक्त ई कोलाय तपासले आहेत. इतर जंतू जे दीर्घकाळ जिवंत रहातात, ते तपासले जात नाहीत.

शिवाय, पाण्याच्या अशुद्धीमध्ये केमिकल, द्रव्ये , गाळ यांचाही समावेष होतो. त्यावर पितळेच्या भांड्याचा काही रोल येणार नाही.

दूषीत पाणी पिऊनही भारतीय लोक कसे तगतात, कारण सतत एकच इन्फेक्शन शरीरात जात असेल तर आपोआपच प्रतिकार शक्ती बर्‍याच लोकांच्या अंगी तयार होत जाते, त्याना आपोआपच नैसर्गिक संरक्षण तयार होते. अर्थात सगळ्या जंतुना हा नियम लागू नाही, हेही खरेच.

हम्म..
माझे लग्न झाले तेव्हा सा.बांचा संसार आमच्या जुन्या घरी होता. पुर्ण घडवंची पितळेच्या भांड्यांची होती. जुने ते सोने त्याप्रमाणेच होती ती. अजुनही आहेत पण आम्ही सगळे नविन घरात आल्यावर ती जुन्याच घरात बांधून ठेवली. त्याची कारणे म्हणजे ती वापरायची म्हणजे दर १५ दिवसांनी चिंचेने, राखाडीने लख्ख घासावी लागत. पण हल्लीच्या कामवाल्यांनाही ह्या गोष्टी अवघड वाटतात आणि आजच्या धावपळीच्या काळात नोकरी करत ते शक्य नाही. नविन घरात आम्ही तांब्याचा बंब, अंघोळीचे मोठे घंगाळ आणले आहे. पण तेही दिवाळीतच काढतो. मला आवडतात अश्या पुरातन गोष्टी माझ्या मुलीची भातूकलीची खेळणीही तांब्या पितळेची आहेत. सा.बांनीच आणलेली. पण ती पण आता पडून आहेत. कारण ती पण मला सारखी घासावी लागायची चिंचेने. आता आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी एक कळशी तांब्याची वापरतो. व देवघरात तांब्या पितळेचीच भांडी आहेत.

इब्लिस, इंडियन चाइल्डहुड सिर्होसिस चा आणखी तांब्या पितळेचा काही संबंध आहे का? मला पेडियाट्रिकमध्ये थोडे थोडे वाचल्याचे आठवते..

इब्लिस & जमोप्या,

सर्व प्रथम तुम्ही मी दिलेली लिंक वाचलेलीच नाही.
http://www.nature.com/news/2005/050404/full/news050404-14.html

NATURE चे संशोधन व लेखाची credibility संपुर्ण जगात मान्य आहे. Please don't take it lightly.
ह्या लेखात लेख का ने स्पष्ट केले आहे कि,

The amount of live E. coli in the brass vessels dropped dramatically over time, and after 48 hours they fell to undetectable levels, Reed told the Society for General Microbiology's meeting this week in Edinburgh, UK.

The key to the result is copper, which can disrupt biological systems, Reed explains. The element acts by interfering with the membranes and enzymes of cells; for bacteria, this can mean death. Pots made of brass, an alloy of copper and zinc, shed copper particles into the water they contain.

The amounts that circulate into the brass water vessels would not harm humans, Reed adds. According to the researchers, even a person drinking 10 litres of such water in a single day would take in less than the daily recommended dose of copper or zinc.

पाणी साठवायच्या भांड्याना कलई करत नाहीत. जेवणाची भांडी मातीचीच. साउथ इंडीयन लोक आजही सर्वे जेवण अशा मातीच्याच भांड्यातुनच बनवतात.

"copper sulfate" हे अर्थातच विषारी आहे आणी म्हणु नच सारी भांडी कशी चकाचक लख्ख करवी अस म्हणालो मी म्हणजे अशा copper sulfate चा पाण्या शी संबंधच येणार नाही,

हो इब्लिस पाण्याच्या भांड्यांना कधी कल्हई केल्याच ऐकल नाही की पाहण्यात नाही. मी लहान असताना कल्हईवाले दारावर यायचे तेंव्हा आई आमच्याकडे काही टोपे होती पितळेची त्यांना कल्हई लावुन घ्यायची.

माझी आख्खी पोस्ट आपोआप गेली Sad असो
विवेक, लेख आवडला Happy

[खरे तर मी बुप्रामोडमधे जाऊन, "तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?" याचे उत्तर देण्याकरता,
१) सोनेचान्दी परवडत नव्हती
२) कुम्भारान्चा देशव्यापी सम्प झाला असेल
३) कृष्ण गोपीन्चे मातीचे माठ फोडायचा तेव्हा ते फुटू नयेत म्हणून याचा वापर सुरू झाला असेल
४) मातीची भाण्डी टीकाऊ नस्तात म्हणून असेल
५) तेव्हान्च्या पर्यावरणवाद्यान्नी ठिसूळ मातीची भान्डी बनवताना लागणार्‍या उर्जेच्या व बहुमोल मातीच्या अपव्ययाबाबत ओरडा केला असेल Wink
६) महागडी ताम्ब्या पितळेची भाण्डी सामान्य जनतेला धार्मिक निमित्ते वापरायला लावणे ही भटान्चीच कारस्थाने, नक्कीच! Proud
इत्यादी कारणमिमान्सा घेऊन उभा होतो, पण विषय गम्भिरपणे मान्डलेला दिसल्यावर मी माझा बुप्रा मोड आवरता घेतला, प्लिज नोटच]

जमोप्या, इब्लीस, Limbutimbu, जागू सर्वांना धन्यवाद !!!

भारतात खरोखरच पाण्याची कठोर समस्या अपल्या सामान्य जनते समोर आहे याची वाचकांना जाणीव झालीच
असेल !!

पाणी शुध्दिकरणाची या पेक्षा व्यवहार्य व स्वस्त सोय होउच शकत नाही आणी ह्याच कारणाने शासन,
उद्योजक किंवा कोणीही ह्या विषया कडे लक्ष् देणार नाही. ह्या विषया वर जन प्रबोधन करणे गरजेच आहे.

Personal level वर जरी जन प्रबोधन केल तरी सुद्धा खुप काही होईल.

PLEASE GIVE IT A THOUGHT !!!!

The element acts by interfering with the membranes and enzymes of cells; for bacteria, this can mean death. Pots made of brass, an alloy of copper and zinc, shed copper particles into the water they contain. >>

मग याचा परिणाम माणसाच्या शरीरातल्या पेशींवर पण तसाच होणार नाही का ? इफ इट मीन्स डेथ फॉर बॅक्टेरिया, व्हाय वूड इट बी डिफरंट ऑन अ ह्युमन सेल ? यावर तो नेचर मधला लेख काही भाष्य का नाही करत.

लाँग टर्म हेवी मेटल एक्स्पोजर चे नर्व्हस सिस्टमवर काय परिणाम होतात हे शोधून पहा एकदा ..

"तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?" >>> कदाचीत स्टेनलेस स्टीलची त्या काळात मिळत नसावीत म्हणुन . Proud Light 1
बादवे चांगली माहीती मिळाली.

चर्चेच्या प्रस्तावकाने समारोप केलेला वाचला, पण राहवत नाही म्हणून प्रतिक्रिया.

>>
विवेक नाईक | 25 September, 2011 - 23:04

इब्लिस & जमोप्या,

सर्व प्रथम तुम्ही मी दिलेली लिंक वाचलेलीच नाही.
<<

विवेकजी,
तुम्ही लिंक वाचून लिहिले असेल हो. मी (अन त्यां जामोप्या अन मेधा यांनी देखिल.. बहुधा )वैद्यकिय शिक्षणानंतर अधिक अनुभवातून लिहिले आहे, हे मी माझ्या पुरते तरी नम्रपणे नमूद करु इच्छीतो.

पाणी शुद्धीकरणाची तळमळ योग्यच, पण त्यासाठी सारासार विचार हवाच. फक्त पुर्वज चांगले हे झापड योग्य नव्हे.

क.लो.अ.हे.वि.

मेधा.>>

<<<मग याचा परिणाम माणसाच्या शरीरातल्या पेशींवर पण तसाच होणार नाही का ? इफ इट मीन्स डेथ फॉर बॅक्टेरिया, व्हाय वूड इट बी डिफरंट ऑन अ ह्युमन सेल ? यावर तो नेचर मधला लेख काही भाष्य का नाही करत.>>>>

याचा परिणाम माणसाच्या शरीरातल्या पेशींवर पण तसाच होणार असता तर त्यांनी पुढे असे लिहिले नसते...

..The amounts that circulate into the brass water vessels would not harm humans, Reed adds. According to the researchers, even a person drinking 10 litres of such water in a single day would take in less than the daily recommended dose of copper or zinc.....

DO YOU THINK NATURE WOULD WRITE ARTICLE WITH OUT CONSIDERING ALL ASPECTS OF IT !!!

इब्लिस ...

फक्त पुर्वज चांगले हे झापड योग्य नव्हे ????

मी कुठेही लेखात अस म्हणालो नाहीय.
आपले पुर्वज जर फक्त झिंक किन्वा तांब्याच्या शोधा पर्यंत थांबले नाही तर पुढे जाउन त्यांनी पितळ सुध्दा
शोधुन काढल.

सारासार विचार कोणी करवा? let our people die of E-Coli Bacteria, Govt cant provide drinking water
to famine affected areas then how can we expect them to provide drinking water for all
population of India?

अल्पकाळ पाणी साठवण्यासाठी तांबे पितळ धोकादायक नसेल असे वाटते. अन्न शिजवण्यासाठी वापरताना मात्र पितळ उघडे पडू नये ( म्हणजे कल्हई करावी Proud ) हे उत्तम.

विवेक,
सांगून समजत नसेल, किंवा समजून घ्यायचेच नसेल तर नाईलाज आहे.
कल्हई नसलेल्या तांबे, पितळीच्या भांड्यात पाणी साठवणे वा स्वयंपाक हा करू नये, हे मी मघाच पासून सांगतो आहे ते माझ्या मेडिसिन विषयातील पोस्ट्ग्रॅज्युएट डिग्रिच्या व सुमारे ३० वर्षांच्या या क्षेत्रातील अनुभवाच्या आधाराने. तुम्ही वाद घालत आहात तो कुण्या एकट्याच अर्धवट रिसर्च पेपरच्या आधाराने.
आनंद आहे.
तुमचे इतरही धागे पाहिले. याच प्रकारचे आहेत, ज्या मुळे तुमच्या डोळ्यांवर 'पूर्वज ग्रेट ही झापडे' अत्यंत पक्की आहेत हेच दिसले.
तुमचं चालू द्या.

दिलेल्या दुव्यात नेचरमधला 'लेख' नसून 'नेचर न्यूज'मधली एक बातमी आहे. बातमी म्हणजे १००% विश्वासार्ह पिअर रीव्ह्यूड पेपर नव्हे.

वर नमूद केलेल्या याप्रकाराच्या परिणामाला 'ऑलिगोडायनॅमिक इफेक्ट' म्हणतात. हा परिणाम आणि बर्‍याच धातू (मुख्यत्त्वे सोनं आणि चांदी) यांच्यामुळे पण होतो. यावर बरंच संशोधन झालंही आहे. पण पूर्वजांचं(च) बरोबर मानायला निव्वळ बातमी उपयोगी नाही. नामांकित जर्नल्समधून प्रकाशित झालेले रीसर्च पेपर्स महत्त्वाचे आहेत असं वाटतं.

<<<दिलेल्या दुव्यात नेचरमधला 'लेख' नसून 'नेचर न्यूज'मधली एक बातमी आहे. बातमी म्हणजे १००% विश्वासार्ह पिअर रीव्ह्यूड पेपर नव्हे.

वर नमूद केलेल्या याप्रकाराच्या परिणामाला 'ऑलिगोडायनॅमिक इफेक्ट' म्हणतात. हा परिणाम आणि बर्‍याच धातू (मुख्यत्त्वे सोनं आणि चांदी) यांच्यामुळे पण होतो. यावर बरंच संशोधन झालंही आहे. पण पूर्वजांचं(च) बरोबर मानायला निव्वळ बातमी उपयोगी नाही. नामांकित जर्नल्समधून प्रकाशित झालेले रीसर्च पेपर्स महत्त्वाचे आहेत असं वाटतं.>>>>

नेचर न्यूज हा नेचरचाच भाग आहे हे ह्या दुव्यातच सिद्ध होतय, www.nature.com/new/2005/......
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे अश्या प्रकारची बिनबूडाची बातमी प्रसीद्ध करायच्या मागे नेचर न्यूज कडे काय कारण असाव ?

तुमच म्हणण बरोबर आहे की हा परिणाम आणि बर्‍याच धातू (मुख्यत्त्वे सोनं आणि चांदी) यांच्यामुळे पण होतो. पण जन सामान्याना सोनं आणि चांदी परवडणार नाही हे तुमच्या ल क्षात नाही आले बहूद्दा.

पण ज्या काळात भारतात refining of Zinc after mining of zinc व ज्या काळात पितळ बनवायची प्रक्रीया सिद्ध केली गेली ही नक्कीच विचार करण्या सारखी गोष्ठ आहे.

" गरज ही शोधाची जननी आहे" अस म्हणतात पण बहूदा हे फक्त परदेषी संशोधकासाठीच असाव अस मला प्रतीक्रीया वाचून वाटू लागलय. म्हणजे भारतात ज्या पण Development त्या काळी झाल्या होत्या त्या सर्वाना पिअर रीव्ह्यूड करूनच सिद्ध कराव लागेल.

अनेक बाबतीत हे असेच आहे बाहेरच्या लोकांनी सांगितले तर खरे वाटते पण आपलेच पुर्वज अशाच प्रकारच्या गोष्टी वापरत होते ते चुकीचे वाटते. या अशा न्यूनगंडावर दुर्दैवाने काही उपाय नाही. Sad

>>>बिनबूडाची बातमी प्रसीद्ध करायच्या मागे नेचर न्यूज कडे काय कारण असाव
बातमी बिनबुडाची आहे असं कधी म्हंटलंय? एक्स्ट्रापोलेट करू नका. याच बातमीवरचा संशोधनात्मक, पिअर रिव्ह्यूड पेपर जास्त खात्रीलायक वाटेल हा मुद्दा आहे.

>>पण जन सामान्याना सोनं आणि चांदी परवडणार नाही हे तुमच्या ल क्षात नाही आले बहूद्दा.
सोन्या-चांदीचा मुद्दा जनसामान्यांच्या वापरात येणार्‍या किंवा न येऊ शकणार्‍या भांड्यांच्या बाबतीत नसून निव्वळ ऑलिगोडाअयनॅमिक अ‍ॅक्शनच्या संदर्भात होता हे आपल्या लक्षात नाही आलं बहुदा.

>>>म्हणजे भारतात ज्या पण Development त्या काळी झाल्या होत्या त्या सर्वाना पिअर रीव्ह्यूड करूनच सिद्ध कराव लागेल.
यात ऑफेंसिव्ह काय आहे? पूर्वजांच्या या आणि अशा प्रकारच्या गोष्टीं नुस्त्याच अंधळेपणानं 'पूर्वक ग्रेट! त्यांनी केलं आपण पाळलं' असा दृष्टीकोन न ठेवता आपण्च रिव्ह्यू केलं, तपासलं, त्यावर आणखी संशोधन केलं तर ते किती योग्य होतं, का योग्य होतं, त्यात आजच्या काळानुसार काय बदल करता येतील या सगळ्याचाच विचार होऊ शकतो. आणि हे करायला भारतीय समर्थ आहेत. परदेशस्थांनीच डोळ्यांपुढे आणलं की मान्य होतं असा काही अट्टहास नाही त्यात!

महेश, यात न्यूनगंड काय आहे? सार्थ अभिमान बाळगण्यात हशील आहे. पण निव्वळ 'आपल्याकडे अमुक होतं म्हणून आपण ग्रेट' असे गोडवे गात बसण्यापेक्षा 'आपल्याकडे हे होतं, ते का होतं, यावर आपण जशी इंप्रुव्हमेंट करू शकतो' असा दृष्टीकोन का नसावा?

असो, मायबोलीवर अशा चर्चा अखंड होतात. किती दळण दळायचं?

म्रुण्मयी,

आपल्या पुर्वजांच राहुद्दा,

माझा प्रश्न हा आहे कि, भारतातील दुषित पाण्याच्या समस्यांना आपल्या कडे काही अद्यावत तंत्रज्ञान
आहे का ?

ह्या अद्यावत तंत्रज्ञानाची किमान पात्रता खालील पात्रता खालील प्रमाणे असावी.

१. हे उपकरण इतके स्वस्त असावे कि जन सामान्याना परवडू शकेल.
२. हे उपकरण कुठल्याही उर्जे शिवाय चालावे.
३. हे उपकरण हाताळायला सोप्पे असावे. अगदी अशिक्षित सुद्धा याचा वापर करू शकावेत.

अर्थात ह्या उपकरणच्या डेवलोपमेंट साठी आपल्याकडे खुप सारा वेळ नाहीय.

ज्या देशात सुलभ सौच्यालया शेजारीच लोक रस्तावर प्रातः विधी साठी बसतात, त्याच्या कडून अशा उपकरणाची खरेदी व वापर मला अपेक्षित नाही. ह्याचा अर्थ शासनाने अशी उपकरणे जन सामान्याना फुकटात
वाटावीत !. आणी ह्या सर्व कार्यकमा साठीचा लागणारा अधिक आर्थिक भार हा करदात्यानी उचलावा.

गेल्या चार महीन्यापुर्वी जर्मेनी मध्ये ह्याच E-Coli Bacteria ची लागण झाल्याची बातमी आली होती.
त्यात काही जर्मन नागरीकांचा म्रूत्यू झाला. लगेचच जर्मनानी सर्व प्रथम भारतातून येणार्या फळे व
भाज्यांवर बंदी केली होती.

आज अजून ही ग्रामीण भागात लोक पितळेची भांडी वापरतात. ही जनता हळूहळु प्लास्टीक भांडी वापरू लागली आहे. आणखी एक गोष्ठ ह्या प्लास्टीक भांडी वापरावर ही खुप काही विवाद आहेतच त्यावर ही
संशोधन गरजेच आहे.

तुम्ही सर्वानी पितळेची भांडी वापरावर बरेच दोषारोप केले पण कोणी अस म्हणाले नाही की जनतेने
प्लास्टीक भांडी वापरू नये, किंवा त्या वापरा पुर्वी संशोधन होणे गरजेच आहे.

अगदी ह्याच प्रकारे आपल्या लोकांनी DALADA VANASPATI (Halogeneted Transfat) ला आपलेसे केले होते आपल्या देशी तुपाला स्वस्त पर्याय म्हणून, पण आता हे सर्व ज्ञात आहे की DALADA VANASPATI is very bad for health.

<ह्या अद्यावत तंत्रज्ञानाची किमान पात्रता खालील पात्रता खालील प्रमाणे असावी.

१. हे उपकरण इतके स्वस्त असावे कि जन सामान्याना परवडू शकेल.
२. हे उपकरण कुठल्याही उर्जे शिवाय चालावे.
३. हे उपकरण हाताळायला सोप्पे असावे. अगदी अशिक्षित सुद्धा याचा वापर करू शकावेत. >

आहे, आणि आम्हीच तयार केलं आहे. Proud

>>महेश, यात न्यूनगंड काय आहे? सार्थ अभिमान बाळगण्यात हशील आहे. पण निव्वळ 'आपल्याकडे >>अमुक होतं म्हणून आपण ग्रेट' असे गोडवे गात बसण्यापेक्षा 'आपल्याकडे हे होतं, ते का होतं, यावर >>आपण जशी इंप्रुव्हमेंट करू शकतो' असा दृष्टीकोन का नसावा?

आपले पुर्वीचे लोक ग्रेट होते यात मला तरी अजिबात शंका नाही, त्या काळात प्रॉपर वैज्ञानिक संशोधन, रिसर्च पेपर अशा गोष्टी आपल्याकडे नव्हत्या त्यामुळे आपण आज अनेक गोष्टी प्रूव्ह करू शकत नाही, तसेच जे काही लिखित स्वरूपात होते ते बाह्य आक्रमणांमधे नष्ट झाले आणि बरेचसे चोरीला गेले. यातल्या चोरलेल्या गोष्टी आमच्या आहेत असे पाश्चिमात्त्य जगाने जाहिर करून स्वतःची वाहवा करून घेतली.
तुम्ही म्हणता तसे "आपण" इंप्रूव्हमेण्ट करू शकतो असा दृष्टिकोन नक्की असावा, पण त्यामधे "आपण" असणे हे खुप महत्वाचे आहे.

<जे काही लिखित स्वरूपात होते ते बाह्य आक्रमणांमधे नष्ट झाले आणि बरेचसे चोरीला गेले. यातल्या चोरलेल्या गोष्टी आमच्या आहेत असे पाश्चिमात्त्य जगाने जाहिर करून स्वतःची वाहवा करून घेतली.>

हा एक जबरदस्त प्रचार सर्वत्र सुरू असतो. नक्की कुठलं वाङ्मय चोरीला गेलं? आणि कुठल्या ग्रंथांतून या पास्चिमात्यांनी शोध लावले? Happy

Pages