श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 September, 2011 - 04:00

श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

( एवढाच विषय लिहिल्याने सुरुवातीच्या काही प्रतिसादांमध्ये लोकांचा गैर्समज झाला आहे.. हा विषय खरे तर असा आहे.... >> श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण ब्राह्मण किंवा सवाष्ण म्हणून बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

अर्थात इतर लोकही अशा जेवणाला टाळतातच, त्याबाबतही काही लिहिले तरी हरकत नाही.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेवल्यास सुस्ती येते. तांदुळाची खीर, भाजणीचे वडे, आळूची भाजी, आमसुलाची चटणी, रव्याचे लाडू वगैरे मेन्यू असल्याने ताणून द्यावीशी वाटते जेवल्यावर! तीनच दिवसांपुर्वी आईचे भरणी श्राद्ध (पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध) केल्यामुळे इतके नक्की माहीत आहे. कोणी बोलावले तर जाऊ नये असे म्हणतात हेही खरेच! अर्थात, किती जवळचे नाते होते यावर ते अवलंबून आहे. असेही पाहिले आहे की ब्राह्मणेतरांमध्ये यासाठी आग्रहाचे निमंत्रण केले जाते व कोणी न गेल्यास त्याच्यावर रागावतातही! ब्राह्मणांमध्ये मात्र तितकेसे आमंत्रण 'बिमंत्रण' करत नसावेत.

-'बेफिकीर'!

तुमच्या (कडे) असल्यास सांगा.........आम्ही येउ.... Happy

जामोप्या करमत नाही का हो........एक कॉमिक्स ची साइट देउ का.....मस्त फुकटात वाचत बसा दिवस भर........
खास तुमच्च्या साठी काहीच्या काही कविता या च्या सारखी काहीच्या काही मुद्दे...... हे नविन बीबी चालु करा.....आणि तुमचे काहीच्या काही मुद्दे एकत्रीत रितीने टाका.........:)

आपली गेलेल्या व्यक्तीशी किती जवळीक आहे त्यावर आहे. जरूर जावे त्याने उरलेल्या नातेवाईकाना आधार मिळाल्यासारखे होते. आमच्या बिल्डिन्ग मध्ये अश्या जेवणाच्या वेळी एक गाय व एक गोट आणून बांधले होते व त्यांना पण जेवण दिल्हे - गुजराती पटेल लोकांनी.

>>> श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते? <<<
असे म्हणतात म्हणजे काय? पुरावा काये? Proud
असो.
खरतर श्राद्धाच्या जेवणाला "बालावणे" करण्याची मूळात पद्धतच नाहीये. तरिही बदलत्या शहरी जीवनमानाप्रमाणे.....
तुम्हाला काय म्हणून बोलावले आहे यावर ते अवलम्बुन आहे. तुम्हाला "श्राद्ध जेवणारे" ब्राह्मण समजुन बोलावले असेल, व तुम्ही तसे नसाल तर जाऊ नये. जर तुम्ही श्राद्ध जेवणारे ब्राह्मण अस्ता तर हा प्रश्नच विचारला नस्तात, नै का? Wink
जर तुम्ही (देव करो वेळ येऊ नये) मृताचे जवळचे नातेवाईक असाल तर जाणे भाग आहे. लाम्बचे नातेवाईक असाल, त्यातुनही तुम्ही पुणेरी असाल, तर नै गेलात तरी चालेल.
मात्र तुम्ही मृताचे नातेवाईकही नाही वा ब्राह्मणही नाही असे असुनही जर खान्देकरी असाल, तर मात्र बोलावणे आले नाही तरी जरुर जावे.
आता श्राद्धाचे जेवण जेवणारे ब्राह्मण नसताना तसे समजुन बोलावले तर का जाऊ नये हे समजुन घ्यायची आन्तरिक इच्छा झालीच तर मला प्रत्यक्ष भेटा, सान्गिन समजावुन!

श्राद्धाचे किंवा तेराव्याच्या जेवणाला काही लोक जायचं टाळतात हे मी पण पाहिलय. पण त्यात काही तथ्य नाही ते मानसिक आहे. ते टाळतात म्हणण्यापेक्षा घाबरतात जास्तय.. ते अशुभ वगैर मानणारे पण पाहिलेत. आपण तसे जेवलो तर आपल्याला पण लवकर बोलावणं येईल वगैरे अस असाव वाट्ट :P.. काही नाही बिनधास्त जावं एवढे साग्रसंगीत जेवणाचे आमंत्रण मिळतय तर ते अज्जिबात अव्हेरु नये. Happy

श्राद्धाला पक्षाला ब्राह्मण किंवा सवाष्ण म्हणून बोलावल्यास काय करावे याबाबत हा प्रश्न आहे. कारण आमच्या गावात असे श्राध जेवणारे ब्राह्मण व सवाष्णी कमी आहेत. तसे ब्राह्मण भरपूर आहेत. पण या कामाचे काही खास आहेत. .. नातेवाईक, मित्र असे म्हनून बोलावल्यास त्यानी जेवावे, त्यांच्या अंगात आत्मे येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रश्न नाही...

सनातनवालेही बहुतेक असे जेवण टाळावे असे म्हणतात.. ( आणि त्याच वेळी पक्ष श्र्रध आपल्या नातेवाईकाचे करा असेही सांगतात ! आपण दुसर्‍याकडे गेलो नाही तर आपल्याकडे कोण येणार? आणि कुणाकडेच कुणी न गेल्यास मग काय करायचे , या सामाजिक प्रश्नाची जाणीव झाल्यानेच हा धागा प्रसवला आहे. यात विनोदी अशी काही इच्छा नव्हती.. पण प्रतिसाद देणार्‍याना मायबोलीच्या शिरस्त्यानुसार विनोदी प्रतिसाद द्यायला बंदी नाही. Happy )

तुम्हाला "श्राद्ध जेवणारे" ब्राह्मण समजुन बोलावले असेल, व तुम्ही तसे नसाल तर जाऊ नये

म्हनजेच सर्व लोक जात नाहीत, काही जण टाळतात, हे खरेच आहे.

आता श्राद्धाचे जेवण जेवणारे ब्राह्मण नसताना तसे समजुन बोलावले तर का जाऊ नये हे समजुन घ्यायची आन्तरिक इच्छा झालीच तर मला प्रत्यक्ष भेटा, सान्गिन समजावुन!

तेच तर विचारायला हा धागा आहे.. Proud सरसकट कुणीही ब्राह्मण का नाही जात?

वास्तविक पहाता टाळण्याचे तसे काही कारण नाही, पण अशुभ मानत असल्याने लोक जात नाहीत. पुर्वी लोकांना फारसे उद्योग नसत आणि लोक फार शहाणे नव्हते. आजकाल सर्वजण खुप बिझी झाले आहेत आणि हुशार पण झाले आहेत, मग कमीपणाचे वाटते म्हणुन नाही जात.

आमच्याकडे तेराव्याला घरोघरी जाऊन लाडू वाटतात, तेही काही लोक खात नाहीत, निर्माल्यात टाकतात.. हादेखील प्रकार मी पाहिलेला आहे... न खाल्यास मेलेल्या व्यक्तीला वाइट नाही का वाटणार? Proud

जामोप्या खरेतर हा मोठा चर्चेचा विषय आहे. तुर्तास एवढेच सांगतो की या असल्या प्रथा चालू करण्यामागे समाजातील गरजू लोकांना मदत व्हावी हा पण एक चांगला उद्देश होता. पण आजकाल एवढा खोलवर जाऊन विचार करायला वेळ कुणाला आहे ?

समाजातील गरजू लोकाना मदत? कसली मदत? वर्षातले एक जेवण आणि ११ रु दक्षिणा यात कसली आली आहे मदत? मदत हाच उद्देश होता तर विशिष्ट दिवस, विषिष्ट जात हे बंधन कशाला?

कमालच करता तुम्ही समाजात एकाच घरी पुजा, श्राद्ध, पक्ष होत नव्हते आणि नाहीत. असंख्य लोक असल्याने प्रत्येक दिवशी कोणाकडे ना कोणाकडे काहीतरी असणारच.

पाणिनीनं आमंत्रण आणि निमंत्रण या शब्दांमधला फरक स्पष्ट करताना श्राद्धाचं आणि यज्ञाचं जेवण कधीही चुकवू नये, असं लिहिलं आहे. या जेवणांना नकार देणं, अनुपस्थित राहणं योग्य समजलं जात नसे. लग्न, व्रतबंध या कार्यप्रसंगी नाही गेलं तरी हरकत नसे.

लिंबूला अनुमोदन.
या जेवणाचे आमंत्रण द्यायची प्रथा नाही. आणि जाऊ नये असा समजही नाही.
माझ्या वडीलांची लोकप्रियता एवढी अफाट होती कि त्या दिवशी जेवण कमी पडले इतकी माणसे, प्रसाद म्हणून जेवून गेली.
शेवटी आपल्या भावनांना महत्व द्यावे.

दिनेशच्या मताशी मी सहमत आहे. काही होत नाही जेवायला गेले तर. गैर समजुत बाकी काही नाही . उलट मी म्हणेन दु:खद प्रसंगी जो जवळ येतो तो खरा मित्र, खरा नातेवाईक.

हा विषय सुक्ष्म आणि गहन आहे.

श्राध्दाला जेवणे आणि श्राध्दाचे ब्राम्हण म्हणुन जेवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे प्रथम लक्षात घ्यावे.

जे नुसतेच श्राध्दाला जेवतात त्यांना कोणताही दोष नसतो असे मला वाटते.

श्राध्द चालवणारे ब्राम्हण बर्‍याच वेळा जेवायला न थांबता आम्ही श्राध्दाचे जेवत नाही असे म्हणतात म्हणुन इतरांना ( नातेवाईकांना , आप्तांना ) आपण इथे जेवणे म्हणजे काहीतरी चुकीचे करतो की काय असा प्रश्न मनात येतो.

श्राध्दाचे ब्राम्हण जेवल्यावर त्यांना जी दक्षीणा द्यावी ती इतर विधी पेक्षा जास्त द्यावी असेही म्हणले जाते.

माझ्या माहितीत ज्या व्यक्तीने श्राध्दाचे ब्राम्हण म्हणुन जेवण केले आहे त्याने १००० गायत्री मंत्राचे जप स्वतःचे शुध्दी साठी करणे अपेक्षीत असते. अश्या वेळी दुपारचे श्राध्दाचे जेऊन संध्याकाळी अन्य धार्मिक कर्म करणे यास वेळ उरत नाही व भिक्षुकी करणार्‍या गुरुजींची संध्याकाळी एखादी पुजा केल्याने मिळणारी दक्षीणा बुडते सबब श्राध्दाच्या ब्राम्हणांना दुप्पट दक्षीणा द्यावी असे काही लोक सांगतात.

श्राध्दाच्या ब्राम्हणांचे काही पुण्य कमी होते का ? बुध्दीमत्ता कमी होते का ? या कारणासाठी १००० गायत्री मंत्राचा जप सांगीतला आहे हे माझ्या वाचनात नाही. असे काही होत असेल तर त्याचे संशोधन हे आजच्या प्रगत शात्राच्या क्षमतेच्या बाहेरचे आहे.

नेहमीचे श्राध्दाचे ब्राम्हण न मिळाल्यास जे ब्राम्हण वैदीक कर्म ( भिक्षुकी ) करतात त्यांच्यावर अशी वेळ आल्यास ( नेहमीच्या यजमानाचे मन मोडावे लागु नये म्हणुन श्राध्दाचे ब्राम्हण म्हणुन जेवावे लागल्यास) १००० गायत्री जप सांगीतला असावा.

पिढ्यान पिढ्या श्राध्दाचे जेवणारे ब्राम्हण मात्र त्याच कामाचे असतात असे पहाण्यात आले आहे. त्यांना वेद अध्ययनात गती किंवा रस रहात नाही. श्राध्दाची दक्षीणा किंवा त्या निमीत्ताने मिळणारे दान इतके जास्त असते की ज्ञान संपादनाची इच्छा रहात नाही असे घडत असावे.

वर लिहीलेले प्रमाण आहे अस नाही. या विषयावर चर्चा चालु होती म्हणुन उपलब्ध्द माहिती व तर्काच्या आधाराने लिहले आहे.

नितिन थोडेसे अनुमोदन.

>> पिढ्यान पिढ्या श्राध्दाचे जेवणारे ब्राम्हण मात्र त्याच कामाचे असतात असे पहाण्यात आले आहे. त्यांना वेद अध्ययनात गती किंवा रस रहात नाही. श्राध्दाची दक्षीणा किंवा त्या निमीत्ताने मिळणारे दान इतके जास्त असते की ज्ञान संपादनाची इच्छा रहात नाही असे घडत असावे.

<< ह्या बाबत अनुमोदन नाही.

मर्तिकाचे विधी/जेवण करणारे ब्राह्मण सहसा इतर शुभ कार्यासाठी बोलावले जात नाहीत. मर्तिकाच्या विधीला कोणत्या विशिष्ठ समाजाचा म्हणून नाही म्हणत नाहीत आणि इतर समाजांबरोबर जेवणे निषिद्ध मानले जात असे, त्यामुळे कदाचित मर्तिकाच्या गुरुजींना ब्राह्मण समाजात पूर्वी रोटी बेटीत प्रॉब्लेम होत असावा, म्हणूनही मर्तिकाला/श्राद्धाला जेवणे त्याज्य मानत असावेत.

आमच्या इथले गुरुजी जे श्राद्धाला येतात ते त्यानंतरच्या नवरात्रात पूर्ण उपवास नि शुद्धीमंत्र करतात. ह्यावेळी कसलेही कार्य ते घेत नाहीत. त्यामुळे दसर्‍यानंतरच ते शुभ कार्याला हात लावतात.

बाकी एक्स्पर्ट जाण्कार सांगतीलच बैजवार.

यार
मला खरंच हे समजत नाही.
श्रद्धेने केलेली आठवण ते श्राद्ध. ती आठवण -आपल्या प्रियजनांची- जर गोड असेल तर जरूर गोडधोड करून खावे.
पण ते अमुक च स्वयंपाक कर, सोवळे ओवळे सांभाळ. अमक्यांसच बोलाव. ते जेवीपर्यंत घरातील लहानग्यांससुद्धा उपाशी ठेव. ही असली कर्मकांडे अत्यंत फालतू आहेत असे माझे स्पष्ट मत.

जामोप्या,
तुमच्या श्राद्धास मला ब्राह्मण / शिंपी / सोनार / महार इ. इ. काहीही म्हणून बोलवा, नक्की येईन. ते काय पाप पुण्य लागेल त्याची चिंता पुनर्जन्म वाल्यांनी करावी. मी चार्वाक वाला, आप मरे, जग डूबा. तोपर्यंत ऋण न काढता फुकट जेवायला मिळतेय ना?
आलोच हात धुवून!!

ता.क. सवाष्ण म्हणून बोलावलेत तरी चालेल. हिच्या सोबत डब्बा पाठवून देईन रिकामा. मला वडे फार आवडतात, थोडे जास्त पाठवावेत ही न.वि.

ता.क. २ इतक्यातच कुणीतरी माझ्याकडे तु.क. टाकून 'हा शिवला तर कावळ्याने वेगळे शिवायची गरज नाही' असे बोलल्यासारखा भास झाला.

माझा श्राद्ध , पुनर्जन्म, कावळा वगैरे वर कधीच विश्वास नसल्यामुळे मी कवा पण कुठे पण "ते" जेवण जेवायला येईन Happy खास करुन वडे-चटणी तर बेश्टच !! लहानपणी इतर दिवशी मधल्या वेळेस "खायला काय करु" या आईच्या प्रश्नावर श्राद्धाचे वडे आणि चिंचेची ती मस्त चटणी अशी "फर्माईश" केल्यामुळे ओरडा खाल्ला होता... माझा मुद्दा होता की हा "मेन्यू" कुणी ठरवला? तर याला कुणाकडेच उत्तर नाही .. मग म्हटलं काय बिघडणार आहे केले तर? त्यात दुसरा मुद्दा माझा असायचा की ते गेलेले लोक परत (तुमच्या मते) पुनर्जन्म घेउन कुठेतरी जगत असले तर त्यांना काय उचकी लागणार आहे का? मग त्या हिशोबानी आपला पण पुनर्जन्म झालेला असेल तर आपल्याला आपल्या गेल्या जन्माचे कुणि श्राद्ध घालत असेल तर का उचकी लागत नाही? माझ्या या प्रश्नांमुळे घरच्यांना उचकी लागायची Happy बहुतेक वेळा उत्तर नसल्यामुळे "मोठ्यांशी असं बोल्तात का?" किंवा "गप्प बस.. चहाटळ कुठला" अस्ल काही तरी ऐकायला लागायचं ..

मी मात्र श्राद्ध वगैरे घातलेले नाही वडिलांचे..कधी घालणार पण नाही .. त्यांची आठवण मात्र नेहमी ठेवतो !!

जाता जाता - आपल्या लोकांनी पिंड, पूजा, लग्न यात होणारी तांदळाची अक्षम्य उधळपट्टी थांबवली तर तांदळाची १०-१५% गरज कमी होईल Wink कुणी पूजा, लग्न या साठी रिसायकल होउ शकणा-या मटेरिअलच्या इको-फ्रेंडली अक्षता का नाही तयार करत? अखंड बिझनेस मिळेल Happy

श्राद्धाचे वडे फक्त त्याच दिवशी का करायचे यावरून माझीही फार चिडचिड होत असे. कुणीतरी पाकृ टाका रे!

नितिन, अगदी बरोबर लिहीलत
>>>> श्राध्दाच्या ब्राम्हणांचे काही पुण्य कमी होते का ? बुध्दीमत्ता कमी होते का ? या कारणासाठी १००० गायत्री मंत्राचा जप सांगीतला आहे हे माझ्या वाचनात नाही. असे काही होत असेल तर त्याचे संशोधन हे आजच्या प्रगत शात्राच्या क्षमतेच्या बाहेरचे आहे. <<<<
श्राद्धाचे जेवणच नव्हे तर पित्रुपन्धरवड्यात शिधा घेतला तरी जप करावा असे सान्गितले आहे. याचे कारणच मुळी असे आहे की जेवायला उत्तरेकडे तोन्डकरुन बसलेला देवस्थानी व दक्षिणेकडे तोन्ड करुन बसलेला ब्राह्मण पितरस्थानी त्यान्च्या "भुमिकेत" जाऊन अन्न ग्रहण करीत असतो असे मानलेले आहे. दैहिक जीवनात भोजनानिमित्ते, आधिदैविक शक्तिन्चा स्पर्श्/अन्तर्भाव करुन घेतल्याने, काही दोष राहू नये म्हणून जप आवश्यक आहे. न करणार्‍यांस त्याची वाईट फळे अनुभवास येतातच येतात. यात विशेष ते काही नाही, साधे बाहेरुन आले, खास करुन दैहिक विसर्जनविधी करुन आल्यावर टाचान्सहित पाय धुण्याच्या नियमा इतकेच जपाचे हे साधे नित्य वर्तन आहे.
या भोजनानन्तर, त्या दिवसात म्हणण्यापेक्षाही, ते अन्न पचन होईस्तोवर, अन्य कोणत्याही धार्मिक कृत्यात भाग घेणे वर्ज्य मानले गेले आहे, शिवाय, त्या ब्राह्मणान्नी त्या भोजनानन्तर ते दिवशी पुन्हा भोजन ग्रहण करणेही वर्ज्य मानले गेले आहे. अर्थातच, विधी चालविणारे/चालवु शकणारे शिक्षित गुरुजी, जर जेवायास बसले, तर त्यान्चा उरलेला सम्पुर्ण दिवस वाया जातो तसा जाऊ नये, म्हणून श्राद्धाला जेवणारे ब्राह्मण स्वतन्त्र असतात जे सहसा शुभ धार्मिक कार्य चालविण्याची कामे करित नसतात.
मात्र, मनात मुलतःच मृत व्यक्तिबरोबरचा वैरभाव वसत नसेल (वसुही नये, पण....), तर, कुणाच्याही श्राद्धाचे जेवण हे सत्यनारायणाच्या प्रसादाइतकेच पवित्र आहे, ते घेण्यास कसलीच आडकाठी असू शकत नाही. अर्थातच, वैरभाव जागृत असेल, तर मात्र बर्‍याचदा, जेवण न जेवण्यामागे बाकी धार्मिक वृथा भित्यान्च्या कुबड्या घेतल्या जातात असाही अनुभव आहे.
(मी काही जवळच्या परिचित/नातेवाईकान्कडे अडीअडचणीला "श्राद्धाचे" जेवण जेवायला "ब्राह्मण" म्हणून गेलो आहे. स्वगतः अनुभव वा अनुभुतीशिवाय काही लिहू नये हा नियम पाळतोय हे सान्गण्याकरता हे ही सान्गावे लागते, असो.)

चिनुक्सचा मुद्दा तर महान महत्वाचा आहे. आम्हालाही लहानपणापासून हेच शिकवले गेले आहे की एकवेळ लग्नमुन्ज कार्यात गेला नाहीत तरी चालेल, पण दिवसवारे करण्यात जरुर सहभागी व्हा!

>>>> जामोप्या,
तुमच्या श्राद्धास मला ब्राह्मण / शिंपी / सोनार / महार इ. इ. काहीही म्हणून बोलवा, नक्की येईन. ते काय पाप पुण्य लागेल त्याची चिंता पुनर्जन्म वाल्यांनी करावी. मी चार्वाक वाला, आप मरे, जग डूबा. तोपर्यंत ऋण न काढता फुकट जेवायला मिळतेय ना?
आलोच हात धुवून!! <<<<
च्यामारी इब्लिसा, अरे हो हो, धीराने घे, की आपला मिळाला कीबोर्ड बदडुन ओकले डोक्यातले विचार असे नको करु!
>>>तुमच्या श्राद्धास>>><<<
"त्यान्च्या श्राद्धास" तेच कसे काय बोलावणे पाठवतील? काहीही बोलतो काय?
की तुझ्यामते आता अमक्यातमक्या कुणास बोलवावे, याचेही विवेचन मृत्युपत्र करुन ठेवावे की काय? Proud
अन आलोच हात धुवून काय? सवाष्ण म्हणून बोलावले तरी चालेल काय? इत्कीही चार्वाकगिरी बरी नै हो!
(तुझ्या या बोलण्याने मला मात्र त्या गाजलेल्या फोटोतील ते लहान मरतुकड आफ्रिकन बाळ अन मागे टुकत बसलेल्या गिधाडाची आठवण झाली)

बाकी तुझ्या ताक २ मधे जर तू शिवलास तरी कावळा शिवणे भाग आहेच, तुजसारख्या नास्तिकाचे शिवणे मान्य नाही. तू शिवल्यामुळे हव तर कावळा दोनदा शिववुन घेऊ! काय समजले? Proud

जामोप्या, तरी तुला नीटपणे समजावत होतो की अधिक माहिती प्रत्यक्ष भेटीत(च) सान्गेन, तू ऐकले नाहीस.... तर घे आता या इब्लिसादिक चार्वाकान्ची फौज अन्गावर, अन दे आवतणं त्यान्ना, ते वाटच बघताहेत! कधी कोण गचकतं अन त्यान्ना वडेचटणी गिळायला मिळते!
[माझ्या डोक्यात मात्र वेगळाच किडा वळवळतोय, त्याचे समाधान कोण करु शकेल बर? अस हे की अशा अन्नावरच्या वासनेने युक्त बुभुक्षित खपले, तर त्यान्चे श्राद्धाचे जेवण जेवणार्‍या ब्राह्मणान्ना भस्मासुर्‍या वगैरे जडत नसेल ना? अपचन होत नसेल ना? तसे असेल तर १००० गायत्रीजपाबरोबरच शतपावलीदेखिल आवश्यक असेल ना? Proud ]

जामोप्या, जेवायला जायच कि नाहि हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला जावस वाटल तर जा, नाहितर राहिल.
मला वाटत कि आपल्या दु:खात आपल्याला जे भेटायला आले त्याना thanks म्हणण्याचा प्रकार असेल.
जावु दे, आज दुनिया कुठ्च्याकुठे गेलिय आणि जेवणाने काय होते असले प्रश्न काय विचारता? आमची आजि बर्याचदा म्हणायची, लोक गेले चन्द्रावर आणि तुम्हि अजुन बन्द्रावर.

मी म्हणते आहे तो पर्यंत सेवा करा. नंतर श्राध्द-पित्र नाही केले तरी चालेल. माझ्या माहीतीत असेही लोक आहेत जे म्हतार्‍या आई-वडीलांना नीट वागणुक देत नव्हते आणी गेल्यावर मोठे श्राध्द वगैरे केले.

Pages