खूप दिवस रोहिंग्या मुसलमान यांच्या बद्दल टीव्हीवर बघत होतो, पण नेमकी बातमी कळत नव्हती, म्हणून या बातमी बद्दल वाचायला, बघायला सुरुवात केली, माझ्या सारखे अजून कोणीही असतील, तर कदाचित त्यांच्यासाठी खालील माहिती उपयोगी असू शकते.
इथे माझे वैयक्तिक मत द्यायचे नसून, बातमी सोप्या शब्दात मांडायची आहे
रोहिंग्या मुसलमान कोण आहेत?
म्यानमार देशातून निर्वासित झालेले मुस्लिम बांधव, त्यांना भारतात आश्रय हवा आहे.
म्यानमार मधून निर्वासित का झाले?
कारण रखाइन बुद्ध लोकांनी रोहिंग्या मुसलमान लोकांवर वारंवार प्राणघातक हल्ले केले.
अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष डानल्ड टृंप यांच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी हा धागा. राष्ट्राध्यक्षाच्या निर्णयाचा परिणाम तळागाळातल्या माणसांपासुन "टू बिग टु फेल" संस्थांवर होत असल्याने इथे अगदि एलिमेंटरी शाळेच्या बाकापासुन ते इमिग्रेशनच्या डाका पर्यंत आणि झालंच तर रशियन कॉल पासुन मेक्सिकन वॉल पर्यंत चर्चा करायला हरकत नाहि.
जाहिराती आणि जबाबदारी
पुर्वी म्हणत चार वेद, सहा शास्त्रे, चौदा विद्या, अठरा पुराणे आणि चौसष्ट कला प्रत्येकाला माहित असायला पाहिजेत. बाकी वेद, विद्या, पुराणे यात काही बदल झाला नाही पण नंतरच्या काळात चौसष्ट कलांमधे पासष्टाव्या एका कलेचा भर पडली, ती म्हणजे जाहिरात.
हल्ली टीव्ही वर कोणत्याही चँनलवर सफर करा, तुम्हाला बातम्या, कार्यक्रम कमी व जाहिरातीच जास्त दिसतील. दाखवा बापडे, त्यामुळेच तर चँनल वाल्यांची दुकाने सुरू आहेत. परंतु कधी कधी या जाहिराती पाहताना त्या जाहिराती तयार करणाऱ्या कंपन्यांच्या कल्पकतेची किव येते.
खास तुमच्यासाठी फेसबुक रेडीमेड स्टेटस गणेशोत्सव धमाका ऑफर! स्टेटस प्रत्येकी २९९ रूपये
तुम्हाला स्टेटस करण्याचा कंटाळा आहे पण खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याची ईच्छा तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रेडीमेड स्टेटस जे तुम्हाला मिळवून देईल हजारो लाईक्स, कमेंट्स सोबत फेसबुकवर अफाट प्रसिद्धी. तुम्हाला फक्त एवढच करायच आहे की तुमचं यूजर नाव व पासवर्ड आम्हाला द्यायचा आहे त्याच्या दहा मिनीटांतच तुमचं स्टेटस पोस्ट झालेलं असेल.
"शेवटी तुमचा विश्वास हीच आमची कमाई."
त्वरा करा ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध.
संपर्क-http/rambharosefbstatus.com
'रंगरसिया' रंगीबेरंगी शू पॉलिशः फक्त रंग नव्हे मूड देखिल.

हल्ली एखादी नवीन वादग्रस्त घटना घडली की ती मला तरी पहिले व्हॉटसपवरच समजते. मग तिचा शोध घेतला जातो. शोध घेताना परस्परविरोधी अश्या बरेच बातम्या सापडतात. काही ठिकाणी तर चक्क व्हॉटसपवर फिरणारया खोट्या पोस्टच शहानिशा न करता छापल्या आहेत असे वाटते. आता हा निष्काळजीपणाही असू शकतो किंवा ते कोणाच्यातरी दबावाखाली वा विकले गेल्याने खोटी बातमी देत असावेत.
डिस्क्लेमर: लिहिताना माणूस कुठल्या टोन मध्ये बोलत आहे हे कळत नसल्याने अनेक गैरसमज होऊ शकतात. तसे झाले तरी ते स्वतःजवळच ठेवावेत. या पोस्टमधून कुणालाही दुखवण्याचा काडीमात्रही हेतू नाहीये. माझ्या चिकित्सक स्वभावामुळे पडणारे प्रश्न मोठया व्यासपीठावर मांडण्याचा हा छोटा प्रयत्न आहे इतकंच.
पुर्वी " नोटबंदीचे सु-परीणाम " असा ऐक धागा काढलेला होता. त्या धाग्यावर आता प्रतिक्रीया सुविधा बंद केलेली असल्याने नविन धागा उघडलेला आहे.
टीव्ही व मालिका
माणुस एक तर आक्रमक असावा किंवा फार दुबळा असावा, या दोघांनाही अनुक्रमे सर्वांचे लक्ष केंद्रित करता येते वा सहानुभुती मिळवता येते. असलेच विषय हल्लीचे हिंन्दी व मराठी मालिका तयार करणारे निवडतात, ज्या मधुन समाजाला कोणताच सकारात्मक संदेश दिला जात नाही. उलटपक्षी नैतिकतेच्या चिंद्या करीत, अनैतिक संबंधाचं बटबटीत चित्रण दाखवून केवळ साचेबद्ध नातेसंबधांच उदात्तीकरण केलेलं दाखवतात, जवळचेच काहि नातेवाईक, मित्र खलनायक दाखवत कथानक तयार करून प्रायोजक मिळवून प्रसारीत करायचे व गल्ला वाढवित रहायचे. या सार्यात केवळ टी.आर.पी. वाढवायच्या नावाखाली मुळ कथेचं पार मातेरं केलं जातं.